Type Here to Get Search Results !

फिनलँड व आपले शिक्षण | Finland and our education

फिनलँड व आपले शिक्षण | Finland and our education

फिनलँड मधील शिक्षण जगात सर्वोत्कृष्ट मानले जाते. जगातील सर्वात आनंदी देश फिनलँड आहे.

या देशाची लोकसंख्या फक्त 55 लाख आहे .रत्नागिरी तालुक्यातील लोकसंख्या साडेचार पाच लाख आहे व तसे भारतात 5650 तालुके आहेत. त्यावरून  फिनलँड  किती चिमुकला देश आहे याची कल्पना येते तिथली शिक्षण व्यवस्था जगातील सर्वात चांगली मानली जाते. इंग्लंड ,अमेरिका , फ्रान्स , जर्मनी या देशांना ही त्याने मागे टाकले आहे इंग्लंड हा शंभर टक्के साक्षर देश आहे.

फिनलँड व आपले शिक्षण  Finland and our education (toc)

 या देशातील विद्यार्थी जगात सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून गणले जातात यांच्या नापास होण्याचे प्रमाण जवळजवळ शून्य  असते  .पीआयएसए( प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडन्ट असेसमेंट ) नावाची संस्था जगातील 15 वर्षाच्या शिकणाऱ्या मुलाचे गणित विज्ञान आणि इतर विषयांच्या अनुषंगाने परिषद परीक्षण  तर त्या संस्थेच्या निश्चित फिनलँडचे  विद्यार्थी कायम सर्वोच्च स्थानी असतात.

फिनलँड व आपले शिक्षण | Finland and our education



फिनलँडचे शिक्षण 

  • फिनलँड मध्ये शिक्षण पूर्णपणे मोफत आणि अनिवार्य सुद्धा आहे.
  • शिक्षणासाठी  एक पैसाही खर्च करावा लागत नाही.
  • शाळेकडून प्रत्येक विद्यार्थ्याला लागणारी सर्व पुस्तके वह्या संगणक कला-क्रीडा याकरता लागणाऱ्या सर्व शैक्षणिक साहित्य मोफत दिले जाते .
  • देशातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या सर्व खर्च सरकार उचलते .
  • या देशात एकही शाळा खाजगी नाही .
  • शाळा महाविद्यालयांमध्ये मुलांना चांगल्या दर्जाचे दुपारचे जेवणही मोफत दिली जाते.
  • विद्यार्थ्यांना गणवेश असतो .
  • फिनलँड मध्ये सात वर्षाच्या आधी मुलांना शाळेत टाकणे हा गुन्हा समजला जातो.
  • सात वर्षापर्यंत मुलांना आपलं बालपण जगून घेतले पाहिजे,  असे तिथे मानले जाते.
  • छोट्या मुलांना पुस्तकी शिक्षण दिले जात नाही तर तिथे त्यांना खेळणं मोकळेपणाने जगणं इतरांशी मैत्री करणे परस्पर सहकार्याची भावना त्यांच्यात निर्माण होईल अशा सर्व गोष्टी त्यांच्या शाळेत जाण्याची पूर्वतयारी म्हणून शिकवल्या जातात.
  •  सात ते सोळा या वयोगटासाठी तिथले शिक्षण अनिवार्य आहे हे प्रवेश परीक्षा नसतात केवळ इच्छा व अभ्यासाची प्रेरणा जाणून घेतली जाते.
  • प्रत्येक वर्गात वीस मुलं आणि तीन शिक्षक असतात.
  • प्रत्येक वर्गात दर 45 मिनिटानंतर मुलांना पंधरा मिनिटाची सुट्टी दिली जाते.
  • दिवसातील चार तासात दुपारची जेवणाची सुट्टी असते घरी जाताना मुलांना गृहपाठ दिला जात नाही त्यांनी आपल्या घरी अभ्यास करावा असं तिथल्या शाळांना, सरकारला आणि त्यांच्या पालकांनाही वाटत नाही.
  • शाळेत स्वच्छता असते ते अभ्यासातील कच्च्या मुलांना कुणी नावं ठेवत नाही अशा मुलांवर शिक्षकांनी शाळा विशेष लक्ष देतात.
  • वातावरण मोकळे व अनौपचारिक असते शिस्त धाकामुळे नव्हे तर वागण्यातून आतून येते विद्यार्थ्यांच्या वेगळेपणाचा आदर केला जातो .

   
फिनलँडमध्ये शिक्षकाची निवड कशी केली जाते.


फिनलँडमध्ये शिक्षक होणे हे फारच महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे समजले जाते.

   निवडून आणि पारखून घेतलेले शिक्षकांची निवड केली जाते शिक्षकाची पदवी क बरोबर इतरही सवय वर्तणूक योग्य असावी लागते .शिक्षणाबरोबरच त्यांना शिक्षक होण्याच्या वेगळा आणि विशेष अभ्यास करावा लागतो त्यामध्ये अभ्यासू वृत्ती ,कल्पकता, ज्ञान ,नावीन्याची ओढ आणि विद्यार्थ्यांची वागण्याचा स्वभाव तपासला जातो.

   या देशात प्रत्येक शिक्षकाला स्वतःची शैक्षणिक प्रयोग करण्यासाठी पूर्ण मुभा दिले जाते.

    प्रत्येक शिक्षकाने जुन्या गोष्टींचा घाण्याचा बैल होण्यापेक्षा अभ्यासात शिकवण्याच्या पद्धती सतत नावीन्य आणावे आणि नियमितपणे काळाच्या पुढे राहावे अशी अपेक्षा असते एका अर्थाने तिथला प्रत्येक शिक्षक हा संशोधक असतो.

  फिनलँड शिक्षण व्यवस्था

  •    मुलांच्या शिक्षणव्यवस्थेत मुलांची परीक्षा नसल्याने मुलांवर परीक्षा ताण अजिबात नसतो.तिथे मुलांनी शिकणे महत्त्वाचे मानले जातात .
  •     परीक्षा देणे नाही वयाच्या सोळाव्या वर्षी प्रत्येक मुलाची राष्ट्रीय स्तरावर पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेता येण्यासाठी चाचणी महत्वाचे असते आणि तिच्यात उत्तीर्ण व्हावे लागते. पुढे मुली कोणत्या क्षेत्रात जाणार हे या चाचणीत ठरते.
  • शाळांमध्ये आणि शिक्षणात ज्ञान आणि इतरांशी सहकार्याची भावना या गोष्टीवर भर दिला जातो .मुलांना आपापसात स्पर्धा करू दिली जात नाही .सोबतच मुलांना पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष जगण्यातला आणि व्यावहारिक गोष्टी शिकवल्या जातात 
  • तिथल्या शिक्षण पद्धती त मुलांना नुसतं शिक्षित बनवत नाही तर सुशिक्षित बनवते आणि त्याचबरोबर प्रत्येक मूल चांगला माणूस होईल हेही शिकवते इथल्या शिक्षणात जास्त भर असतो गणित आणि विज्ञानावर. त्यातही  आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला जातो आणि शिक्षक विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणितात प्रगत राहिले पाहिजेत याची दक्षता घेतली जाते.
  • चांगल्या शाळा आणि खराब शाळा यांच्या गुणवत्तेत सीमारेषा स्पष्ट असतात वर्गातल्या अभ्यासाचे तास ही बंधनकारक नसतात कोणतंही मूल त्याला हवा तेवढा वेळ वर्गात बसू शकत. त्याला वाटलं खेळावं व मस्त आराम करावा तर ते मूल तसं करू शकतं.
  • सर्व शाळांमध्ये मुलांचा अभ्यास सोडून  खेळण्याच्या किंवा आराम करण्याच्या सोयी असतात .
  • प्रत्येक वर्गात दर 45 मिनिटानंतर मुलांना पंधरा मिनिटाची सुट्टी दिली जाते.
  • मुलं त्या वेळात खेळू बागडू शकता तर थात वर्ग चालू असताना ही मुलं हवंते करू शकतात आणि बाहेर जाऊ शकतात .
  • वर्गात शिक्षकांशी किंवा इतर मुलांची गप्पाही मारू शकतात .
  •  वर्गात मुलांचे आणि शिक्षकांची बसण्याची व्यवस्था मजेशीर असते शिक्षक सहसा टेबल-खुर्ची वापरत नाहीत त्यांनी बाकड्यावर बसलं पाहिजे असे बंधन नाही .
  • वर्गाला वाटलं तर वर्ग शिक्षकाच्या भोवती गोल करून जमिनीवर बसतो .
  • कधीकधी वर्ग शाळेच्या गच्चीत किंवा बागेतही बसतो. मुलं आणि शिक्षक मित्र होऊन ती गोष्ट ठरवतात .

      सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षक मुलांची चांगले मित्र असतात .प्रसंगी विद्यार्थी शिक्षकांचे मूल्यमापन करतात निकृष्ट असल्यास ते आपलं स्थान गमवू शकतात.

       आज फिनलंड श्रीमंत देशांमध्ये खूप वरच्या स्थानावर आहे .

   शांत आणि सुखी जगण्याच्या बाबतीत क्रमांक एक वर आहे.

    भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था लैंगिक समानतेत , सुरक्षितेत व शांततेत फिनलँड  जगात एक नंबर देश आहे , म्हणुनच जगात सर्वात आनंदी देशांमध्ये  फिनलँड क्रमांक एक वर आहे. आणि फिनलॅँडच  नेतृत्व करताहेत जगातील सर्वात तरुण पंतप्रधान सना मरीन.


फिनलँड मधील शिक्षणाची वैशिष्ट्ये

  • शिक्षकाला समाजाची सन्मानाने वागणूक .
  • खेळातून शिक्षण.
  • समानते मधून उत्कृष्टता .
  • अभ्यासाचे ओझे नाही .
  • प्रत्यक्ष अनुभवावर आधारित  ज्ञान .
  • शिक्षण मूल्यांकनावर आधारित परीक्षा.
  • शिक्षक प्रयोगशील व संशोधक .
  • सात वर्षाच्या आत मुलांना शाळेत टाकणे गुन्हा.
  • विद्यार्थ्याला शिक्षकाचे मूल्यमापन करण्याचा अधिकार.



हे नक्की वाचा ⬇️


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad