Type Here to Get Search Results !

गुढीपाडवा माहिती मराठी मध्ये | Gudhipadawa information in Marathi|गुढीपाडवा २०२२ | Gudhipadawa 2022

  

गुढीपाडवा माहिती मराठी मध्ये | Gudhipadawa information in Marathi|गुढीपाडवा  २०२२ | Gudhipadawa 2022

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक त्यामुळे नवीन उद्योगाचा व्यवसायाचा आरंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो .यामधून नूतन संवत्सराची  सुरुवात म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस हा महत्वाचा व शुभ दिवस  मानला जातो   आहे.या दिवशी गुढी उभारून नव्या संकल्पनांचा शुभारंभ केला जातो.
गुढीपडवा माहिती मराठी मध्ये | Gudhipadawa information in Marathi
गुढीपाडवा माहिती मराठी मध्ये | Gudhipadawa information in Marathi





गुढीपाडवा माहिती Gudhipadawa information (toc)

भारतीय आणि सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र आहे. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस भारतीय सौर चैत्र महिना सुरू होतो.चैत्र महिन्यात वसंत ऋतू ची सुरुवात होते. नवीन शकसंवत्सर हे चैत्र शुद्ध  प्रतिपदेला ,गुढी  पाडव्याच्या दिवशी सुरू होते. या दिवशी आपण मराठी नव वर्षाचे स्वागत गुढी उभारून   करतो.

मराठी नवीन वर्ष 

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक त्यामुळे नवीन उद्योगाचा व्यवसायाचा आरंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो .यामधून नूतन संवत्सराची  सुरुवात म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस हा महत्वाचा व शुभ दिवस  मानला जातो   आहे.या दिवशी गुढी उभारून नव्या संकल्पनांचा शुभारंभ केला जातो.

नवीन शकसंवत्सर हे चैत्र शुद्ध  प्रतिपदेला ,गुढी  पाडव्याच्या दिवशी सुरू होते. या दिवशी आपण मराठी नव वर्षाचे स्वागत गुढी उभारून   करतो.

साडे तीन मुहूर्त कोणते ?( sade tin muhurt)

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वर्षभरात साडेतीन मुहूर्त आहेत. ते  मुहूर्त 
१) गुढीपाडवा
२) अक्षयतृतीया
३) दसरा 
हे तीन पूर्ण मुहूर्त आहेत.
 तर दिवाळीचा पाडवा कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त आहे

गुढीपूजन कसे करावे ( gudhipujan kase karave)

 पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करून दरवाजाला तोरण बांधावे. एका वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घालावे. नंतर एका टोकाला केशरी वस्त्र बांधावे. अगदीच काही नसेल तर  नवीन रेशमी साडी निऱ्या काढून बांधावी. कलशाला पाच गंधाचे पट्टे ओढावे , स्वस्तिक काढावे व गजरा बांधावा .काठीला आंब्याची डहाळी ,निंबाचा पाला बांधावा व फुलांची माळ बांधणे.   बत्ताशाची माळ घालावी. घरातून उजव्या बाजूला दिसेल, अशा पद्धतीने गुढी उभारावी.

गुढी उभाराताना कोणता मंत्र म्हणावा ( गुढी ubhartana mantr )


गुढीची 'ओम ब्रह्मध्वजाय नमः', असे म्हणून ‘ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभीष्ट फलप्रद। प्राप्तेऽस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु।’ हा मंत्र म्हणून पूजा करावी. 
हळद-कुंकू वाहा ,धूप-दीप ,नैवेद्य दाखवावा व नंतर नमस्कार करावा.

गुढीपाडव्याचा मुहूर्त ( gudhipadva muhurt)


फाल्गुन अमावस्या ०१ एप्रिल २०२२  रोजी सकाळी ११.५३(अकरा वाजून त्रेपन्न )मिनिटांनी संपते अमावस्या संपल्यानंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल व  दुसऱ्या दिवशी २ एप्रिल २०२२ च्या रात्री ११:५८ पर्यंत राहील .तिथीनुसार हा उत्सव दोन तारखेला साजरा केला जाईल.

 गुढीपाडव्याचे  महत्व ( gudhipadhva mahatva)


आपण मराठी लोकांनी हा दिवस केवळ आनंदाचाच नव्हे तर अभिमानाचा म्हणून साजरा केला पाहिजे.आपल्याकडे साडेतीन मुहूर्तांपैकी विशेष महत्व आहे. त्या पैकी गुढीपाडवा हा एक शुभ मुहूर्त आहे.
गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे अनेक श्रद्धा आहेत नियती विषयी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला परत आले होते त्यांच्या स्मरणात गुढीपाडवा साजरा केला जातो. अशी  धार्मिक श्रद्धा आहे. या दिवशी ब्रह्मदेवाने विश्‍वाची निर्मिती केली होती असे देखील धार्मिक मान्यता आहे त्यामुळे गुढीला ब्रह्मध्वज देखील म्हटले जाते.

काठी पूजन 

चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक व आंध्र प्रदेशात चेटी -  चांद उगादी नावाने व वेगवेगळ्या पद्धतीने ही साजरा केला जातो. जगातील विविध देशांमध्ये काठी पूजन नावाने हा सण साजरा केला जातो उदाहरणार्थ -" इव्हाल्युशन ऑफ गोड " या ग्रंथात ग्रेट  अॕलेन यांच्या नोंदी प्रमाणे सायबेरियातील 'सामो यीडस '
दक्षिण आफ्रिकेतील - ' दामारा ' या जमाती मध्ये काटे पूजन करण्याची परंपरा होती.




Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad