Type Here to Get Search Results !

दहावी बारावी परीक्षेस विलंबाने आल्यास प्रवेश नाही |If you come late for 10th and 12th exams, you will not be admitted

 दहावी बारावी परीक्षेस विलंबाने आल्यास प्रवेश नाही |If you come late for 10th and 12th exams, you will not be admitted  

या वर्षी मार्च-एप्रिल २०२२ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेसाठी परीक्षा दालनात विलंबाने येणा-या परीक्षार्थ्यांना प्रवेश नाकारणे.

 कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवरआयोजित मार्च-एप्रिल २०२२ च्या उपरोक्त परीक्षांसाठी संबंधीत घटकांना विशेष मार्गदर्शक सूचना देखील मंडळामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.



लेखी परीक्षेस उशिराने प्रविष्ठ होण्याची सवलत बंद

  • सवलतीचा लाभ घेवून लेखी परीक्षेस उशिरा प्रविष्ठ होणा-या विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये गैरमार्गाने प्रसारीत झालेला प्रश्नपत्रिकेतील आशय असल्याचे निदर्शनास आले आहे.
  • सदर बाब अतिशय गंभीर असून अशा प्रकरणांमध्ये संबंधीतांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
  •  या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी लेखी परीक्षेस उशिराने प्रविष्ठ होवू देण्याची सवलत दि. १६/०३/२०२२ पासून बंद करण्यात येत आहे.

प्राचार्य /मुख्याध्यापक / केंद्रासंचालक /उपकेंद्रसंचालक / परीक्षक यांना सूचना

  •   सर्व संबंधीत विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर येणे आवश्यक आहे.
  •  विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी १० मिनिटे अगोदर (प्रश्नपत्रिका बाटप करण्याच्या वेळेपर्यंत) म्हणजेच सकाळच्या सत्रामध्ये स. १०.२० पर्यंत
  •  दुपारच्या सत्रामध्ये दु. २.५० पर्यंत परीक्षा कक्षामध्ये हजर राहणे बंधनकारक राहील .
  • विद्यार्थी अपरिहार्य कारणामुळे परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होतेवेळी म्हणजेच सकाळच्या १०.३० वा. व दुपारच्या सत्रामध्ये दु. ३.०० वा. पर्यंत आल्यास त्याचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी त्यांची तपासणी करून विद्यार्थ्यास विभागीय मंडळाच्या मान्यतेने परीक्षेस बसण्यास परवानगी देण्यात यावी.
  • परीक्षा सुरू झाल्यानंतर म्हणजेच सकाळच्या सत्रामध्ये स. १०.३० नंतर व दुपार सत्रामध्ये दु. ३.०० नंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश देण्यात येवू नये.
  • सर्व मा. विभागीय आयुक्त व मा. जिल्हाधिकारी यांना जास्तीत जास्त दक्षता पथके कार्यान्वीत करून परीक्षा केंद्र / उपकेंद्रांना वारंवार भेटी देवून परीक्षा काळात होणा-या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी यथोचित कार्यवाही करावी.

विद्यार्थांसाठी सूचना

  • सर्व संबंधीत विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर येणे आवश्यक आहे.
  •  विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी १० मिनिटे अगोदर (प्रश्नपत्रिका बाटप करण्याच्या वेळेपर्यंत) म्हणजेच सकाळच्या सत्रामध्ये स. १०.२० पर्यंत
  •  दुपारच्या सत्रामध्ये दु. २.५० पर्यंत परीक्षा कक्षामध्ये हजर राहणे बंधनकारक राहील .

गैरप्रकार झाल्यास गुन्हा नोंद होणार

प्रश्नपत्रिकांची सीलबंद पाकिटे विद्यार्थी व संबंधीत पर्यवेक्षकाच्या उपस्थितीत त्यांची स्वाक्षरी घेवून उघडण्याची कार्यपध्दती निश्चित करण्यात आलेली आहे. त्यासाठी निर्धारित केलेल्या सूचना व वेळेचे बंधन यांचे काटेकोर पालन करण्यात यावे. प्रश्नपत्रिका फोटो काढून वा अन्य मार्गाने प्रसारीत होवू नये यासाठी मोबाईल व अन्य तत्सम साधने सर्व संबंधीत घटकांना बाळगण्यास व वापरण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. याचीही प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच परीक्षेदरम्यान संबंधीत घटकांच्य मोबाईल क्रमांकाचे आवश्यकतेनुसार CDR तपासण्यात येवून गैरमार्गाशी संबंधीत मोबाईलचा वापर आढळून आल्यास संबंधीत घटकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, याचीही जाणीव संबंधीत घटकांना करून देण्यात यावी.

महत्त्वपूर्ण सूचना 

१) उत्तरपत्रिका लेखन प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षागृहात center वर  प्रवेश देवू नये .

२)अपवादात्मक परिस्थितीत सदर वेळेनंतर १० मिनिटे

 उशिरा येणा-या विद्यार्थ्यांला ( परीक्षा देणारा) विलंबाच्या कारणाची खातरजमा करून केंद्रसंचालक स्तरावर परवानगी द्यावी. 

३) १० मिनिटानंतर अतिशय अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ होण्यास केंद्रावर आल्यास  त्यामागचे कारण केंद्रसंचालकांना रास्त वाटल्यास त्यांनी विभागीय अध्यक्ष किंवा विभागीय सचिव यांची दूरध्वनीवरून पूर्वमान्यता घेवूनआणखी १० मिनिटे (एकूण २० मिनिटांचा) बिलंब क्षमापित करून परीक्षार्थ्याला परीक्षेस प्रविष्ठ करून घेता येईल अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

 बोर्डाचे परिपत्रक

अधिक माहिती साठी परिपत्रक Download करा ⬇️

https://bit.ly/3IcJINu


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad