Type Here to Get Search Results !

होळी सणाची माहिती | Information about Holi festival | Holi

होळी (Holi) हा सण जगभरामध्ये अति उत्साहाने सर्व धर्माचे लोक साजरा करतात. होळी हा सण फाल्गुनी पौणिमेदिवशी साजरा केला जातो 

 होळी holi (toc)

होळी हा सण जगभरामध्ये अति उत्साहाने सर्व धर्माचे लोक साजरा करतात. होळी हा सण फाल्गुनी पौणिमेदिवशी साजरा केला जातो . होळी हा सण दोन दिवस साजरा करतात पहिल्या दिवशी होळी चेअग्निदहन आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंगांची उधळण करतात. या सणाला ग्रामीण भागात 'शिमगा ' असे म्हणतात.
English मध्ये -  Holi festival of Colour
हिंदी मध्ये - होलि का दहन , होलिकोत्सव म्हणून ओळखले जाते.


होळी सण म्हणजे काय  

हा सण म्हणजे एक वसंत उत्सव आहे . या दिवशी रंगांची उधळण केली जाते.हा सण भारत ,पाकिस्तान ,नेपाळ मध्ये साजरा केला जातो.
रंगपंचमी माहिती

होळी कधी व कशी सुरू झाली ? 

पुराण कथेनुसार श्री शंकराने फाल्गुन पौर्णिमेला मदनाला जाणले होते. त्यानंतर त्यांनी रंगरुपाने त्याला पुन्हा जिवंत केल्याचा आनंद व्यक्त करणे हा देखील या उत्सवा मागचा हेतू असण्याची शक्यता आहे. पूर्ण निवांत मान पुण्याच्या पद्धतीमध्ये होळी पौर्णिमा ही वर्षाची अखेरची तिथी ठरल्यामुळे होळीनंतर नव्या वर्षाचा प्रारंभ होतो व त्यानुसार रंगपंचमी हा नववर्षाच्या स्वागताचा उत्सव असण्याची शक्यता आहे.


होळी साजरी का करतात ?

वसंत ऋतूच्या रंगबेरंगी रंगाचा आंनद घेण्यासाठी हा सण साजरा करतात.

होळी सणाचा इतिहास

होळी हा सण बंगाल मध्ये खेळला जातो. हा सण ब्रज या प्रदेशात भगवान श्री कृष्णांच्या मथुरा ,वृंदावन ,बरसाना आणि नंदा गाव या भागात मोठया प्रमाणात साजरी केली जात असे.

होळी  खेळणे यामागील पौराणिक कथा


होळी हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जाणार उत्सव सण आहे. हा सण वसंत ऋतू च्या आगमनाच्या वेळी साजरा करणारा एक सण ,उत्सव आहे.
या सणाविषयी काही पौराणिक कथा आहेत.
हिरण्यकश्यपू या आसुराला आपला मुलगा प्रल्हाद याचे नारायण वेळ सहन झाले नाही यासाठी त्याला मारायचे ठरवले त्यासाठी त्याने ने आपल्या बहिणीला पाचारण केले तिचे नाव होते होलिका . ती खूप क्रूर होती प्रल्हादाला मारण्यासाठी होलिका जीने एक अग्निकुंड प्रज्वलित केला आणि त्या मध्ये प्रल्हादाला ढकलायला लागली पण त्या प्रयत्नात ती स्वतः त्या अग्निकुंडात जळाली. त्यावेळी प्रल्हादाच्या पाठीराख्यांनी आनंद व्यक्त केला.
या होलीके वरून आणि त्या घटनेवरून होळी सण प्रारंभ झाला. हा सण म्हणजे सृष्टीचा दुष्टांवर विजय होय.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad