पत्रलेखन | Letter writing
पत्रलेखन letter writing या कृती मध्ये मागणी पत्र व विनंती पत्र या औपचारिक पत्र पैकी एक आणि अभिनंदन पत्र व तत्सम कौटुंबिक पत्र या अनोपचारिक पत्रा पैकी एक अशा पत्रलेखनाचा दोन कृती दिल्या जातील या दोन पैकी कोणते एका कृतीनुसार पत्र लिहिणे अपेक्षित असते किंवा आहे हे आकृतिबंधात त्याला पत्र लिहायचे आहे त्याचे नाव पत्ता जो पत्र लिहीत आहे त्याचे नाव पत्ता आणि विषय दिला जातो दिलेल्या बाबींचा योग्य उपयोग करून पत्र लेखन करावयाचे असते या परीक्षेत ईमेल प्रारुपानुसार पत्र लिहिणे अपेक्षित आहे हे लक्षात ठेवावे
पत्रलेखन लिहिताना घ्यावयाची काळजी .
पत्राचा विषय नीट समजून घ्या .
पत्राचा विषय औपचारिक पत्रात लिहिणे अपेक्षित आहे.
योग्य मायना व समारोप करावा.
आपले म्हणणे मुद्देसूदपणे मांडावे.
पत्राची भाषा पत्र स्वरूपानुसार असावी.
पत्रलेखन (toc)
विनंती पत्र (Request letter)
( विद्यार्थी या नात्याने सुलेखन वर्गात प्रवेश देण्याची विनंती करणारे पत्र लिहा)
दिनांक : २० मार्च २०२१
प्रति
मा. श्री .सागर गायकवाड
विनय अकॅडमी ०३ मंगळवार पेठ ,
कराड
विषय - मराठी सुलेखन वर्गात प्रवेश देण्याबाबत.
महोदय,
आपल्या संस्थेने आयोजित केलेल्या मराठी सुलेखन वर्गाची जाहिरात मी पाहिली दिनांक 1 मे ते 31 मे या कालावधीत पहिल्या तुकडी मध्ये मी प्रवेश घेऊ इच्छितो आहे कृपया माझा प्रवेश निश्चित करावा.
तुम्ही सुलेखनाचे विविध साधने कोणती व त्यांचा उपयोग कसा करावा याबाबत दूरदर्शनवर चांगले मार्गदर्शन केले होते त्याप्रमाणे मी सरावही केला त्यामध्ये मला काही प्रमाणात यश आले आहे मी आपल्या सुलेखन वर्गामध्ये प्रवेश देऊ इच्छितो कृपया माझा प्रवेश निश्चित करावा ही पुन्हा एकदा आपणास नम्र विनंती.
कळावे,
आपला नम्र,
अ. ब. क.
ओम निवास ,
सह्याद्री नगर ,कराड.
xyz@gmail. com
अभिनंदन पत्र (felicitation letter)
( धाकट्या बहिणी महाराष्ट्र हस्ताक्षर स्पर्धेत राज्यपातळीवर प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल तिला अभिनंदन पत्र लिहा)
दिनांक १५ जून २०२१
प्रिय सायली,
सप्रेम नमस्कार,
सायली , तुझे मनापासून अभिनंदन ! सुलेखन वर्गात तुला उत्कृष्ट सुलेखनकार हे पारितोषिक मिळाले , याबद्दल तुझे पुन्हा पुन्हा अभिनंदन !
आज आमच्या शाळेत सुलेखन वर एक कार्यक्रम झाला पाहुणे होते श्री विनायक गायकवाड त्यांनी सुलेखनाचे महत्त्व समजावून सांगितले याप्रसंगी त्यांनी तुझे खूप कौतुक केले त्यावेळी मला तुझा खूप खूप अभिमान वाटला श्री विनय गायकवाड यांनी तुझ्या हस्ताक्षराचे खूप कौतुक केले तुझ्या हस्ताक्षराची काही वैशिष्ट्य सुद्धा त्यांनी आम्हाला समजावून सांगितले .अक्षराची उंची किती असावी , दोन अक्षरांमधील अंतर किती असावे या विषयी त्यांनी माहिती दिली. यासर्व कौशल्यामुळे तुझी सर्व अक्षरे देखणे व डोलदार बनतात.
हे सर्व तुझ्या विषयक ऐकताना मला खूप खूप आनंद होत होता .
तुझा अभिमान वाटत होता. सायली , तू खूप मोठी सुलेखनकार होणार हे निश्चित ! माझ्या तुला खूप खूप शुभेच्छा !
पुन्हा एकदा तुझे अभिनंदन !
तुझी बहीण ,
आशा
आशीर्वाद ,
१०२ ,अभिनव नगर
सांगली.
Asha@gmail.com
मागणी पत्र (Demand letter )
( क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र लिहा)
दिनांक: १० जून २०२१
प्रति ,
मा. व्यवस्थापक चॅम्पियन,
स्पोर्टस जलाराम नगर सातारा.
विषय - शाळेच्या क्रिकेट संघासाठी क्रीडा साहित्याची मागणी..
महोदय,
मी आदर्श शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी आहे आमच्या शाळेच्या क्रिकेट संघासाठी पुढे दिलेल्या यादीप्रमाणे क्रीडा साहित्य हवे आहे कृपया हे साहित्य आमच्या शाळेच्या वरील पत्त्यावर पाठवावे त्यासोबत क्रीडा साहित्याचे बिलही पाठवावे ते म्हणजे रक्कम त्वरित पाठवून देता येईल हे साहित्य शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी हवे आहे तेव्हा कृपया किमतीवर योग्य ती सवलत द्यावी ही नम्र विनंती
क्रीडासाहित्याची यादी
प्रकार नग
१) बॅट १०
२) हेल्मेट ०५
३) चेंडू २ डझन
४) सेप्टि गार्ड १४
५) पॅड १० जोड्या
६) हँड ग्लोज ६ जोड्या
७) स्टॅम्प १२
कृपया वरील साहित्य शक्य तितक्या लवकर पाठवावे ही नम्र विनंती कळावे
आपला कृपाभिलाषी ,
अ .ब .क .( विद्यार्थी प्रतिनिधी, आदर्श शाळा)
विद्यार्थी प्रतिनिधी ,
क्रीडा भांडार ,आदर्श शाळा ,
23 रुईकर कॉलनी सातारा.
abc@gmail.com