रामकृष्ण परमहंस जयंती Ramakrishna Paramhansa Jayanti
रामकृष्ण परमहंस यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या कार्याची माहिती पाहाणार आहोत.
आपल्याला माहिती आहे की रामकृष्ण परमहंस (Ramakrishna Paramhansa Jayanti) म्हटले की आपणांस स्वामी विवेकानंद यांचे गुरु एवढेच माहीत आहे. स्वामी विवेकानंद यांना त्यांनी दीक्षा , ज्ञान दिले व मार्गदर्शन केले हे सर्व आपल्याला माहीत आहे.
आज आपण रामकृष्ण परमहंस यांचे कार्य व विचार जाणून घेणार आहे.
रामकृष्ण परमहंस Ramakrishna Paramhansa (toc)
रामकृष्ण परमहंस यांचे बालपण Ramakrishna Paramhansa Jayanti
रामकृष्ण परमहंस यांचा जन्म १८ फेब्रुवारी १८३६ रोजी पश्चिम बंगालमध्ये कामारपुरकर मध्ये झाला.
मूळ नाव - गदाधर चट्टोपाध्याय.
जन्म - १८ फेब्रुवारी १८३६.
वडिलांचे नाव - क्षुदीराम
आईचे नाव - चंद्रमणीदेवी.
आवड -
मातीच्या चिखला पासून मूर्ती बनवणे . व इतर ज्ञान घेणे याची जिज्ञासा वृत्ती भरपूर आहे. गायन ,वादन , अध्यात्मा चे आवड.
घरची परिस्थिती -
कुटुंब गरीब होते घरांमध्ये पैसांची आर्थिक चणचण सतत भासत असे.
तंत्रसाधनेत पारंगत
गदाधर यांची साधना वाढत गेल्यामुळे त्यांना अनेक त्रासातून जावं लागत होते म्हणून भैरवी ब्राह्मणे यांनी ही जी अवस्था आहे ती भावतन्मयता आहे भगवंताच्या दर्शनाची आस लागलेले आहे भगवंताच्या ज्ञानामध्ये तल्लीन होऊन गेलेले आहेत त्यामुळे ही अवस्था झाली आहे. हा त्यांचा वेडेपणा नसून अध्यात्मिक महाभाव त्याच्या अंगी निर्माण झाला आहे असे सांगितले.
तांत्रिक साधना त्यांनी चालू केल्या त्यावेळी त्यांच्या शारीरिक पीडा गेल्या ते शांत राहिले .त्यांनी अशा 64 साधना अभ्यासल्या, मंत्रसाधना केली यामुळे त्यांचे चित्त शुद्ध झाले आणि आत्मनियंत्रण करायला शिकले. महत्त्वाचा जो मार्ग त्यांनी त्यांना सांगितला तो म्हणजे वामाचार ज्ञान मार्ग .