विद्यार्थ्यांचे हक्क व सुरक्षितता काळाची गरज | Students' rights and safety need time
विद्यार्थ्यांचे हक्क व सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. तरी काही समाज विघातक घटकांपासून कोणतीहीआक्षेपार्ह घटना शाळेच्या प्रांगणात, घडू नयेत आणि विद्यार्थी विद्यार्थिनींचे मनोधैर्य खचू नये यासाठी विभागीय स्तरावर करावयाच्या कार्यवाहीबाबत पुनश्चः पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
विद्यार्थ्यांचे हक्क व सुरक्षितता (toc)
महत्त्वपूर्ण सूचना - विद्यार्थ्यांचे हक्क व सुरक्षितता
१. विद्याध्यांना विभागीय कार्यालयात शिक्षणाधिकारी कार्यालयात/शाळेत थेट तक्रार करता येईल असा व्हॉटस अॅप नं/ हेल्पलाईन नं. देण्यात यावा तसेच शाळेतील विद्यार्थ्यावर होणाऱ्या अत्याचाराची तक्रार दाखल करण्याबाबत पॉस्को, इंवीक्स, राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या सुविधा महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या चिराग अॅप याची माहिती सर्व विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणण्यासाठी सूचना फलक लावावेत. पॉस्को ई बॉक्स व चिराग या अॅपवर तक्रारी नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत करावी बालकांवर होणाऱ्या लैंगिक अपराधा बाबत माहिती असणान्या व्यक्तीने त्याबाबत तात्काळ विशेष किशोर पोलीस पथक अथवा स्थानिक पोलिस स्टेशनला कळविणे बंधनकारक आहे. कलम २७६ POCSO ची माहिती सर्व अधिकारी व शाळेतील संबंधित कर्मचारी यांनाही देण्यात यावी.
Students' rights and safety विद्यार्थ्यांचे हक्क व सुरक्षितता |
२. विद्याच्यांना शाळेत व समाजात सुरक्षित असल्याची खात्री पटवून देण्यासाठी हक्क व कायदे विषयक जाणीव-जागृती करावी. शालेय परिसर तसेच विद्याव्यांचा वावर जिथे जास्त प्रमाणत आहे त्याठिकाणी दर्शनी भागात विविध पोस्टर्स, फलक लावावेत. उदा. चाईल्ड हेल्पलाइन नं १०९८ पोलोस सुरक्षा १०० महिला सुरक्षा १०१० तात्काळ सेवा १९२
३. प्रत्येक शाळेत तक्रार पेटी असावी. सदर तक्रार पेटीत प्राप्त तक्रारीवर उचित कार्यवाही तात्काळ करावी.शाळेत आवश्यक आंतरदेशीय पत्रे, जिल्हा कार्यालयाचा पत्ता टाकून ठेण्यात यावीत. म्हणजे विद्यार्थी /विद्यार्थीना आवश्यक वाटल्यास पत्राद्वारे त्या गोपनीयरित्या तक्रार नोंदवू शकतील.
४. अनुदानित शाळेचे विविध निकषांच्या आधारे मुल्यमापन करून त्यांना योग्य तो श्रेणी देण्यात यावी आणि विद्यार्थी लाभाच्या अनुषंगाने प्रसिद्ध होणाऱ्या शासन सूचना / परिपत्रके/ शासन निर्णय याचे शाळेत वाचन करणेबाबत सूचित करावे.
५. शाळेतील मुख्य प्रवेशद्वार, वर्ग खोल्या प्रयोगशाळा व्यायाम शाळा, कालागृह, स्वच्छतागृह सर्व खिडक्या,दरवाजे योग्य प्रकारे बंदिस्त असल्याची खात्री करावी. निखलेले लॉक / कड़ी/ दरवाजे यांची तात्काळ दुरुस्ती करावी.
६.शाळेतील सर्व प्रांगण, कॉरिडॉर, प्रयोगशाळा, व्यायाम शाळा, कालागृह, स्वच्छतागृह सर्व ठिकाणी
सी.सी.टी.व्ही. कैमरे बसवून ते सुस्थितीत चालू अवस्थेत असावेत. त्याचे रेकाडर्डींग शाळेने जतन करूनठेवावे.
जागोजागी विद्यार्थी/विद्यार्थीनी यांचे हात पोहोचतील अशा उंचीवर सेक्युरीटी अलास बसवून तो अलार्म वाजण्याची व्यवस्था शाळा कार्यालय स्टाफ केबीन, मुख्याध्यापक केबीन मध्ये असावी. सदर अर्लाम ज्या ठिकाणी बसविण्यात आलेले आहेत, त्या ठिकाणी सी.सी.टी. की. कमरे बसवावेत.
आरोग्य शिबिर
७. कुमारवयात होणान्या शारीरिक, मानसिक, भावनिक बदलांना सामोरे जाण्यासाठी शाळा/तालुका/जिल्हा/ विभाग स्तरावर विद्यार्थ्यांना वैज्ञानिक माहिती देणारे आरोग्य शिविर आयोजि करावे. त्यामध्ये नामांकित डॉक्टर, समुपदेशक यांना आमंत्रित करावे. शाळेतील विद्यार्थ्यांना Good Touch, Bad Touch यांची माहिती देण्यात यावी. तसेच विद्याथ्यांना बोलते करण्यासाठी अनोपचारीक कार्यक्रमांचे उपक्रमांचे आयोजन करावे.
८. शाळेतील प्रत्येक इयत्तेला विद्यार्थीनीसाठी एक विद्यार्थीनी सखी आणि विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मित्र नेमण्यात यावा. यामध्ये शाळेतील वरिष्ठ इयत्तेतील विद्यार्थी/विद्याधीनींचा समावेश असावा. वरिष्ठ गटातील विद्यार्थ्यासाठी एका शिक्षकाची/ शिक्षिकेची नेमणूक करण्यात यावी. सदर सखोना/मित्रांना काही वेगळे जाणवल्यास लगेच संबंधित शिक्षक (सखी) यांच्या निर्देशनास आणावे.
९. जिल्हा स्तरावरील शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिला दक्षता समिती स्थापन करावी...
१०. सदर सदस्य निवडताना त्यांच्या सामाजिक प्रतिमा, चारित्र्य पडताळणी करुनच त्यांची निवड करावी.
११. शाळेत योणाऱ्या प्रत्येक अभ्यांगताची/पालक/इतर भेटीसाठी आलेले अनोळखी व्यक्तों यांच्या येण्या जाण्याच्या वेळेची नोंद रजिस्टर मध्ये घेण्यात यावी.
१२. पालकांच्या लेखी परवानगीशिवाय विद्यार्थ्यांना अनोळखी व्यक्तीस भेट घेता येणार नाही. शक्य असल्यास अशा वेळी त्या इयत्तेची सखी अथवा एक शिक्षक यांच्या समक्ष सदर भेट व्हावी. तसेच शाळा सुटण्याच्या वेळेआधी पाल्यास घेवून जाणे पालकास अपेक्षित असल्यास शाळेने संबंधित पालकास ओळखपत्र द्यावे,
सदर ओळखपत्राच्या पडताळणीनंतरच पाल्यास ताब्यात द्यावे. शाळेच्या सुटीच्या कालावधीत विद्यार्थी /विद्यार्थीनी शाळेबाहेर जाणार नाहीत याची दक्षता घेणेबाबत सुरक्षाव्यवस्थेस सूचित करावे.
Police Verification चारित्र्य पडताळणी शिक्षकेतर कर्मचान्यांचे
१३. शाळेतील सर्व शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचान्यांचे दर ५ वर्षांनी (Police Verification) चारित्र्य पडताळणी करणेबाबत सूचना देण्यात याव्यात. सदर पडताळणी अहवाल प्रतिकूल नसल्यास अशा कर्मचान्यास वेळीच योग्य समज/ शिक्षा देण्यात यावी आणि त्याबाबत वरिष्ठ कार्यालयास अवगत करण्यात यावे.
१४. शाळेने / मुख्याध्यापकाने अध्यापनाचे आवश्यकतेनुसार जादा तासिका वर्ग घेण्याचे निश्चित करताना विभागाची पूर्व परवानगी घ्यावी, तसेच अशा जादा तासिका/वर्गाचे वेळी गरजेनुरूप सुरक्षा व्यवस्था ठेवावी.
१५. शाळाव्यवस्थापनाने विद्यार्थी/विद्यार्थीनीची कुठलीही सहल शैक्षणिक भेट/क्रीडा स्पर्धा / शैक्षणिक चित्रपट यांचे •आयोजन केल्यास संबंधित विद्यार्थी/विद्यार्थीनी यांना एकटे न रहाता गटातच राहण्यास सूचित करावे, अशा नियोजनाची जेष्ठ शिक्षकांनी जबाबदारी द्यावी,
१६. विद्यार्थ्यांसाठी शासकीय विमा सुरक्षा योजनांची अंमलबजावणी करावी.
१७. विद्यार्थ्यांमध्ये स्वयं सुरक्षिततेसंदर्भाने परिस्थिती कशी ओळखावी त्या परिस्थितीपासून कोणता धोका संभवतोव त्याचा प्रतिकार कसा करावयाचा याबाबतीत काही प्रात्यक्षिक प्रसंग देऊन व कोणास संपर्क साधावा याबाबत जाणीव-जागृती निर्माण करावी, वरील सर्व प्रकारे उपाययोजना अंमलात आणल्यानंतरही काही अघटीत घटना घडल्यास
विद्यार्थ्यांचे हक्क व सुरक्षितता शासन निर्णय
जाणीव-जागृती निर्माण विद्यार्थ्यांचे हक्क व सुरक्षितता
१. पिडीत विद्यार्थी/विद्यायोनी यांची माहिती गोपनिय ठेवावी आणि त्रयस्थ घटकांकडे पोहोचणार नाही याची दक्षता घ्यावी.
२. उपाययोजना म्हणून डॉक्टर समुपदेशक यांना ताबडतोय बोलावून घ्यावे, जेणेकरून विद्यार्थ्यावरील मानसिक ताण कमी होईल,
३. अपराधी व्यक्तीचा विद्याध्यांशी संपर्क येऊ देऊ नये,
४. सक्षम प्राधिकान्याशी तसेच पोलिसांशी तात्काळ संपर्क साधावा,
५. अशी घटना घडल्यास शाळा व्यवस्थापन विद्याव्यांच्या बाजूने उभे राहील्याने शाळेचा आदर वाटेल वअशी घटना घडूनही दडपणेचा प्रयन्त केल्यास शाळा व्यवस्थापनास अशा प्रकरणात सहआरोपी करणेत येईल याची जाणीव करून द्यायो.
६. विद्यार्थी/विद्यार्थ्यानांच्या कुटुंबास यथोचित न्याय मिळण्याच्या दृष्टीने सर्व न्याययंत्रणेबाबत (पोलिस यंत्रणा, न्यायालय, महिला / बाल हक्क आयोग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग इ.) मार्गदर्शन करावे.
महिला दक्षता समिती -
समितीची रचना
शिक्षणाधिकारी अध्यक्ष (१)
केंद्र संपर्क अधिकारी (डायट) सदस्य सचिव (१)
वर्ग २/वर्ग ३ महिला अधिकारी कर्मचारी सदस्य (१)
जिल्ह्यातील नामांकित महिला डॉक्टर सदस्य (१)
जिल्ह्यातील नामांकित महिला वकील सदस्य (१)
जिल्ह्यातील नामांकित निवृतत महिला मुख्याध्यापक सदस्य (१)
उपलब्ध असल्यास माजी विद्यार्थिनी सदस्य (१)
समितीची कार्य Students' rights and safety
• समिती सदस्यांनी महिन्यातून एकदा परिक्षेत्रातील काही शाळांना अचानक भेट द्यावी.
भेटीदरम्यान विद्याथ्यांबरोबर स्वतंत्रपणे चर्चा करणे, काही तक्रारीचा आढावा घ्यावा.
- तक्रार दूर करणेबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करावा.
- विद्यार्थ्यांना येणाऱ्या शारीरिक, मानसिक, भावनिक अडचणी सोडविण्यात मदत करणे, समुपदेशन करणे,
• लाभाच्यांना त्यांच्या अधिकारांची माहिती उपलब्ध करून द्यावी.