Type Here to Get Search Results !

जागतिक महिला दिन भाषण | World Women's Day speech

 जागतिक महिला दिन भाषण | World Women's Day speech

जगाला दृढता , साहस , सृजनशीलता व आत्मनिर्भर हे सर्व गुण ज्यांच्या मुळे शिकायला मिळतात अश्या सर्व  महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अश्या सर्व महिलांचे कर्तृत्व जाणून घेण्यासाठी  त्यांच्या विषयी  भाषण (जागतिक महिला दिन भाषण  World Women's Day speech ) कसे असावे ते आज आपण पाहाणार आहोत.

जागतिक महिला दिन भाषण | World Women's Day speech


जागतिक महिला दिन भाषण (toc)

भाषण सुरुवात -

सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग तसेच येथे उपस्थित स्वतःच्या अस्तित्वासाठी आजही लढणा-या सर्व तमाम महिला भगिनींनो, प्रथम तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या' हार्दिक शुभेच्छा! दरवर्षी ८ मार्च हा दिवस जगभर जागतिक महिला दिन' म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

जागतिक महिला दिन कधी पासून सुरू झाला ?

८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे वस्त्रोद्योगात काम करणाऱ्या महिलांनी सामूहिकपणे मोठी ऐतिहासिक अशी निदर्शने केली. त्यांनी कामाचे तास कमी करणे, सुरक्षितता इ. मागण्या केल्या जगाच्या इतिहासात अशाप्रकारे स्त्रियांनी संघटित होऊन केलेला हा पहिला मोठा संघर्ष मानला जातो. पुढे १९१० मध्ये विविध देशातील महिला प्रतिनिधीसह कार्यकर्त्या क्लारा झेटकिन यांनी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करावा असे ठरवले.

प्रेरणादायी स्त्री / महिला

सृष्टीचे जीवनचक्र अविरतपणे चालू ठेवण्य कार्य करते. ती सृजनशील आहे. प्रत्येक कुटुंबाचा पाया व कणा स्त्री असते. स्त्रीग शिवाय कुटुंब नाही व कुटुंबाशिवाय समाज नाही. सासर व माहेरच्या दोन्ही घरांना ती नकळतपण जोडते. स्त्री आपले मूल संस्कारशील, अद्वितीय घडावे म्हणून जीवाचे रान करते. 

 World Women's Day speech

मूल पोटात वाढवण्यापासून ते सुसंस्कृत व्यक्ती घडवण्यापर्यंत संपूर्ण जबाबदारी स्त्री विनातक्रार पार पाडते. त्यामुळेच सानेगुरुजी व शिवाजी महाराजांसारखे अनेक महान पुरुष घडले. प्रत्येक यशस्वी पुरु षाच्या मागे एक स्त्री असते. ती संकटात पुरु बाची ढाल बनते. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यासारखे थोर पुरुष महान कार्य करू शकले. स्त्री फक्त कुटुंबासाठी झटत नाही; तर झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर यासारख्या अनेक यासारख्या अनेक स्त्रिया मायभूमीच्या रक्षणासाठी रणरागिनी झाल्या. सावित्रीबाई फुले लग्नानंतर शिकून भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी अतुलनीय योगदान दिले.

महिलांची कामगिरी 

आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. गावच्या सरपंच पदापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत ती आघाडीवर आहे. भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, अंतराळवीरांगना कल्पना चावला, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, स्त्री सुधारक व समाजसेविका रमाबाई रानडे,पहिल्या महिला पोलिस अधिकारी किरण बेदी, समाजसेविका मदर तेरेसा, गायिका लता मंगेशकर  पहिल्या महिला पायलट सरला ठाकराल तसेच महिला खेळाडू पी.टी. उषा, सायना नेहवाल, सानिया मिर्झा इ. अनेक स्त्रियांनी आपआपल्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केले आहे. 

जागतिक महिला दिन भाषण | World Women's Day speech

स्त्री समस्या आणि गौरव 

आज स्त्रीचा गौरव केला जातो पण तरी देखील महिलांच्या समोर अनेक समस्या आ वासून आहेत. स्त्री भ्रूणहत्या, लैंगिक अत्याचार, अंधश्रध्दा, जुन्या चालीरीती इ.समस्या पदोपदीअंधश्रध्दा, लैंगिक अत्याचार, , जुन्या चालीरीती इ.समस्या पदोपदी महिलांना भेडसावतात. त्या समस्या जर दूर. केल्या तर नक्कीच स्त्रियांचे कार्यक्षेत्र विस्तारेल महिलांनो, आजच्या आधुनिक युगात तुम्ही स्वत: पासून बदल करा. 

कारण पुढची पिढी कशी घडावी  हे तुमच्याच हातात आहे. तुम्ही अखंड प्रेमाचा  कधीही वाईट गोष्टींचा संग धरू नका: कारण जगण्यासाठीच नव्हे तर या पृथ्वीतलावर जन्म घेण्यासाठीदेखील तुम्हाला संघर्ष करावा लागतोय स्त्री शक्तीचा पुरेपूर वापर करून एक चांगली व्यक्ती, माणूस म्हणून बनून दाखवा. आपले वाचन, लेखन इ. छंद जोपासून नेहमी आनंदी रहा. कोणत्याही क्षेत्रात आपला चांगला ठसा उमटवा. आत्मनिर्भर बना: ईश्वराने दिलेल्या सुंदर स्त्री जन्माचा उपयोग करताना कधीच पंखातल बळ कमी होवू देवू नका. थोर स्त्रियांचे विचार, चरित्र सदैव स्मरणात ठेवा.

“नारी तू घे अशी उंच भरारी 

फिरून पाहू नकोस माघारी.”

एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो/ संपवते.

।। जय हिंद जय महाराष्ट्र ।।










Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad