महाराष्ट्र दिन 1 मे मराठी भाषण | Maharshtra din 1 May Marathi bhashan
आज आपण महाराष्ट्र दिन व कामगार दिन या विषयी माहिती पाहाणार आहोत.
महाराष्ट्र दिन कामगार दिन (toc)
महाराष्ट्र दिन भाषण
आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणी आज एक मे महाराष्ट्र राज्याचे स्थापना दि दिवस आज सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा केला जातो सर्वांना सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक.
मंगल देशा । पवित्र देशा । महाराष्ट्र देशा ।।
प्रणाम घ्यावा माझा , हा श्री महाराष्ट्र देशा ।।
राकट देशा , कणखर देशा , दगडांच्या देशा ।।
नाजुक देशा , कोमल देशा , फुलांच्या देशा ।।
असे महाराष्ट्राचे सुंदर वर्णन राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या लेखनातून केले आहे .
महाराष्ट्र दिन इतिहास - थोडक्यात
अशा महाराष्ट्राच्या मातीत अनेक साहित्यिक कलाकार गायक वादक संत कलावंत असे अष्टपैलू जन्म ले व वाढले .हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या मातीतच लढले आणि त्यांनी मराठ्यांचे तोरण उभारले.
या दिवशी १९६० चाली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली त्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली.
कामगार दिवस
महाराष्ट्र दिना सोबतच हा दिवस जागतिक कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो कामगारांना अल्प मजुरीच्या बदल्यात १२ ते १४ तास राबवून घेतले जात होते या विरोधात सर्व कामगारांनी एकत्र येऊन आंदोलन केलं तेव्हापासून एक मे हा कामगार दिन म्हणून ही साजरा करतात.
महाराष्ट्रास लाभलेल सांस्कृतिक वारसा
महाराष्ट्राचा सांस्कृतिक सामाजिक आणि ऐतिहासिक वाटा फार मोठा आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीत अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहाने पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात प्रत्येक सण हा मराठी माणसाला एक संदेश देऊन जातो
महाराष्ट्राचा गौरव अनेक नेत्यांनी व महापुरुषांनी विविध उपाधी देऊन केला आहे. महाराष्ट्र म्हणजे भारताच्या सिंह घराच्या प्रहरी आहे या शब्दात गौरव केला आहे .महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहोळ या शब्दात महात्मा गांधीजींनी महाराष्ट्राची प्रशंसा केली आहे
महाराष्ट्राच्या मातीत संत तुकाराम संत रामदास संत एकनाथ संत ज्ञानेश्वर संत जनाबाई यासारखे अनेक संत होऊन गेले त्यांनी अनेक ओव्या भारुडे श्लोक रचले आणि एक चांगला संदेश आपल्या लेखनातून महाराष्ट्राला व संपूर्ण जगाला दिला आहे.
कला शिक्षण चित्रपट संगीत साहित्याचा वारसा अशा विविध क्षेत्रांमध्ये सुद्धा महाराष्ट्राने उत्तुंग भरारी घेतलेली आहे अशा वैभवशाली महाराष्ट्रात मराठी मातीत जन्माला आल्याचा मला फार मोठा अभिमान आहे आपण महाराष्ट्रीयन असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे.
राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर वासुदेव बळवंत फडके यासारखे अनेक देशभक्त इंग्रजांविरुद्ध लढा या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे.
समाजजागृती व संदेश
राजश्री शाहू महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले लोकशाहीर आण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात जनजागृती चे काम केले लेखक कवी साहित्यिक यांनी आपल्या लेखनातून महाराष्ट्राला चांगला संदेश दिला अशी अनेक रत्ने महाराष्ट्रात होऊन गेली हे महाराष्ट्राचे मोठे भाग्य आहे.
आपल्या महाराष्ट्र राज्याचा खरा विकास झाला आहे आता हा विचार आपण करायला हवा ह्या गोष्टी महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येतात त्या गोष्टींचा विचार करायला भ्रष्टाचार गरिबी लिव्हरचा अत्याचार या गोष्टींचा नायनाट केला पाहिजे व त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवली पाहिजे आणि प्रगतीची नवी शिखरे करण्याचा निर्धार केला पाहिजे जाताजाता शेवटी मी एवढेच म्हणतो की ...
महाराष्ट्राची यशो गाथा,
महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लावू कपाळी
धरती मातेच्या चरणी माथा
जय महाराष्ट्र !!
हे नक्की वाचा ⬇️