प्रज्ञाशोध परीक्षा 2022 - 23| NTS EXAM 2022 - 23
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने
(एनसीईआरटी) पुढे ढकललेली तारीख, परीक्षेच्या प्रक्रियेसंदर्भात खासगी कंपनीची न्यायालयातील याचिका अशा कारणांनी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची (एनटीएस) नोंदणी राज्य परीक्षा परिषदेने डिसेंबरमध्ये थांबवली होती. मात्र पालकांकडून मागणी होत असल्याने पाच महिन्यांनी पुन्हा नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना नियमित विलंब शुल्कासहऑनलाइन अर्ज भरता येईल यंदा राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची राज्यस्तर १६ जानेवारीला, तर राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा १२ जूनला घेण्यात येणार होती. या परीक्षेसाठीची नोंदणी प्रक्रिया राज्य परीक्षा परिषदेकडून नोव्हेंबरमध्ये सुरू करण्यात आली होती. मात्र परीक्षा परिषदेकडे आता पुन्हा नियमित शुल्कासह २२ एप्रिलपर्यंत आणि विलंब शुल्कासह २६ एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता यईल.
महत्त्वाच्या दिनांक
नियमित शुल्कासह २२ एप्रिलपर्यंत
विलंब शुल्कासह २६ एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येईल.
परीक्षा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, की राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा एनसीईआरटीमार्फत घेतली जाते. १६ होणारी ही परीक्षा एनसीईआरटीने प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलली होती. राज्य परीक्षा परिषदेने या परीक्षेच्याप्रक्रियेचे काम खासगी कंपनीला दिले। होते. या कंपनीने तांत्रिक कारणास्तव न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या निकालानंतर हेप्रकरण मिटले आहे. एनसीईआरटीने परीक्षेची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. काही विद्याथ्यांचे अर्ज भरायचे राहिले असल्याने पालक, विद्यार्थ्यांकडून नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संधी पुन्हा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
अधिक माहिती व तपशील..
परीक्षेची तारीख एनसीईआरटीकडून प्राप्तझाल्यावर संकेतस्थळावर जाहीर परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
हे नक्की पाहा ⬇️
सी .बी. एस. ई . बोर्ड दहावी बारावी अभ्यासक्रम