छंद वर्ग | chhand varg
रिकामा किंवा फुरसतीचा वेळ घालवण्यासाठी मनोरंजनासाठी त्याचप्रमाणे हाऊस किंवा विरंगुळा म्हणून माणूस जे जे काही करतो ते सर्व शब्दात मोडते बहुतेक माणसांना कसलातरी छंद असतो छायाचित्र काढणे ,पोस्टाची तिकिटे जमा करणे, चोरांच्या स्वाक्षऱ्या गोळा करणे, बाहुली तयार करणे ,पुरातन वस्तूंचा संग्रह करणे ,शिकार करणे ,बागकाम करणे, हस्तकला करणे, लाकूड काम करणे यासारखे छंद सामान्यपणे आढळून येतात.
मोकळा वेळ योग्य रीतीने कारणे लागण्यासाठी एखादा छंद असणे चांगले असते छंदामुळे मनोरंजन होते ज्ञानात भर पडते मित्रही मिळवता येतात व श्रमामुळे आलेला थकवा घालवून मन उल्हासित करता येते यांत्रिक पद्धतीच्या त्यास त्या कार्यात लाभलेले मानसिक समाधान किंवा निर्मितीचा आनंद छंदाच्या द्वारे मिळवता येतो काम आणि खेळ यांच्यात पोषक असा समतोल ही छंदामुळे साधता येतो फार कष्ट केल्यानंतर प्रकृतीच्या स्वास्थासाठी त्याचा उपयोग होतो शारीरिक आणि मानसिक व्याधी पासून मुक्त होण्यासाठी छंदाचा चांगला उपयोग होतो असे आधुनिक वैद्यकीय मत आहे.
छंदाचे प्रकार
साधारणता छंद हे चार प्रकारात विभागता येतात
१)वस्तू जमाविण्याचा व प्राणी पाळण्याचा छंद -
पोस्टाची तिकिटे किंवा स्वाक्षऱ्या जमवणे ग्रंथसंग्रह करणे निरनिराळ्या चित्रविचित्र वस्तूंचा संग्रह करणे (उदा. ऐतिहासिक वस्तू, चित्रे , फुलपाखरे ,काचा ,दिवे ,खेळ इत्यादी) कुत्रा, मांजर ,कबुतरे, पोपट, ससे हरिण यासारखे पशुपक्षी पाहणे याच प्रकारात येतात.
२) स्वतः वस्तू तयार करणे-
आपले हस्तकौशल्य वापरून काही आवडत्या वस्तू स्वतः तयार करण्याचे हाऊस असली तरी त्यामधून करमणूक होते आणि मनाला विरंगुळा मिळतो आपण तयार केलेली वस्तू स्वतः वापरण्याचे मानसिक समाधान काही वेगळेच असते वस्तू तयार कशा कराव्यात त्या तयार करताना बाजारातील नवीन साधन सामग्री नंतर घरातील जुनी सामग्री कशी वापरावी जोड कसे तयार करावेत तयार वस्तू आकर्षक कशा कराव्यात हे त्यांचे मार्गदर्शन करणारे अनेक पुस्तके बाजारात मिळेल टेबल खुर्ची कपाट कसे उपयोगी फर्निचर तयार करणे विणकाम शिवणकाम करणे रंग रंगोटी करणे चित्र काढणे घरातील दिवे बसवणे इ. छंद या मध्ये येतात.
३)कला कौशल्यांचे छंद :
नृत्य संगीत चित्रकला यासारख्या कला प्रकारांची हौसेने साधना करणे या प्रकारात मोडते नाट्यनिर्मिती किंवा नाटकातून काम करणे हेदेखील हौसेची छंद ठरतात अशा प्रकारचा छंद असल्यामुळे माणसातील सुप्त शक्तींना वाव मिळतो त्याचप्रमाणे तो इतरांचीही करमणूक ही करू शकतो .
४) खेळ आणि व्यायाम :
या प्रकारात मोकळ्या वातावरणाचा लाभ होतो तसेच प्रत्यक्ष कृती ला वाव मिळतो. बॅडमिंटन ,क्रिकेट, टेनिस बॉल , पोहणे इत्यादी खेळ लोकप्रिय आहेत. काही लोकांना पत्ते कॅरम यासारखे बैठे व टेबल टेनिस सारखे खेळ आवडतात.
आपल्या भोवतालच्या परिस्थितीप्रमाणे छंद निवडण्याकडे माणसाचा कल असतो असे नाही समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्याला समुद्रकाठी सापडणार्या शंक शिंपल्यांचे महत्त्व वाटत नाही. समुद्र कधी तरी पहावयास मिळणार्याला समुद्रकिनारे मिळणार्या वस्तूंचा संग्रह करण्याची मौज वाटते.
छंद निवड करणे
आपल्या आवडीनिवडीप्रमाणे आणि मानसिक कला प्रमाणे छंदाची निवड करावी हे खरे असले तरी बैठी व एका जागेवर कामे करणाऱ्यांनी जर मैदाने व मोकळ्या हवेची छंद लावून घेतले तर ते हितकारक होते एकलकोंड्या स्थितीत ज्याला बराच काळ घालवावा लागतो त्याने चारचौघांत सहवास येणारा छंद लावून घेतला तर ते त्याला लाभदायक होते याच्या उलट अनेकांच्या संगतीत आणि संबंधात काम करावे लागणार.या साठी मन शांत होईल व गडबडी पासून दूर जात येईल असे वाचनाचे लेखनाचे संग्रहाचे छंद लावून घेणे लाभदायक असते.
उदा. जहांगीर बादशहाला शिकारीचा आणि मातलेले हत्ती वठणीवर आणण्याचा छंद होता.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांनी पोस्टाची साडेबारा लाख तिकिटे जमवलेली होती विंस्टन चर्चिल यांना चित्र काढण्याचा लेखनाचा आणि वीट काम करण्याचा छंद होता.
छंद वर्ग तयार करणे
उन्हाळी सुट्टीमध्ये किंवा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये हे वर्ग घेऊ शकतो. या मुळे मुलांचा मानसिक ताण कमी होतो व मुले आपल्या आवडीच्या कामात मग्न राहतात.
छंद वर्गामध्ये कार्यानुभव , संगीत ,चित्रकला ,शारीरिक शिक्षण या विषयांचा समावेश असेल. प्रत्येक विषयानुसार काही छंद मुलांना देणे जेणेकरून त्या मध्ये त्यांची रुची निर्माण होईल.
विषयानुसार छंद
शारीरिक शिक्षण
योगासने, काथ्याचे विणकाम
कवायत
प्राणायाम , नृत्य ,गीतगायन , विज्ञान प्रयोग
https://youtu.be/4E7xMTAofgY
https://youtu.be/4E7xMTAofgY
सूर्यनमस्कार
लेझीम नृत्य गीत गायन उत्पादक उपक्रम
झांज लाटी काटी नृत्य पोवाडा व्हर्च्युअल ट्रिप्स ट्रिप्स
जिम्नॅस्टिक्स
संगीत
नृत्य ,गीतगायन
एरोबिक्स नृत्य
झांज लाटी काटी नृत्य पोवाडा व्हर्च्युअल ट्रिप्स ट्रिप्स
कार्यानुभव
बांबू काम
आभूषण कला
https://youtu.be/pHt_ELrxLBw
कागद काम
https://youtu.be/J9tzKIEhmeI
रांगोळी , सुगंधी उटणे, फुलांचे तोरण व भेट कार्ड तयार करणे
https://youtu.be/pHt_ELrxLBw
कागद काम
https://youtu.be/J9tzKIEhmeI
रांगोळी , सुगंधी उटणे, फुलांचे तोरण व भेट कार्ड तयार करणे
शिवकाम
राखी तयार करणे
कागद काम , ठसे काम
चित्रकला
कॅलिग्राफी