Type Here to Get Search Results !

जागतिक कामगार दिन मराठी माहिती | jagtik kamgar din marathi mahiti

जागतिक कामगार दिन मराठी माहिती |  jagtik kamgar din marathi mahiti  

श्रम ही जगातील संपत्ती आहे श्रम केल्यामुळे आपण येथे आहोत आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या जागतिक कामगार दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जगभरातील कामगार चळवळीच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष म्हणजे १ मे .

दरवर्षी 1 मे रोजी जगभरातील 80 हून अधिक देशांमध्ये कामगार दिन व जागतिक कामगार हा दिवस राष्ट्रीय सुट्टीचा दिवस म्हणून पाळला जातो .

जागतिक कामगार दिन मराठी माहिती 


जागतिक कामगार दिन माहिती (toc)

 जागतिक कामगार दिन |  jagtik kamgar din 

१ मे या दिवसाला महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे. कारण या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली एवढेच नाही तर १ में आंतरराष्ट्रीय(जागतिक कामगार दिन  महत्त्व देखील आहे कारण जगभरात हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो अठराव्या शतकात झालेल्या एका कामगार चळवळीच्या गौरवासाठी आज जगभरात साजरा करण्यात येणारा हा एक खास दिवस आहे.


इतिहास - जागतिक कामगार दिन jagtik Kamgar din 

एक १  मे दिन हा १९  एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर कामगार चळवळीतून सुरू झाला त्याची मुख्य मागणी दिवसाचे  आठ तास काम असावे अशी  होती .पहिली मागणी २१ एप्रिल १८५६ रोजी ऑस्ट्रेलियातील कामगाराकडून आली. तेव्हापासून हा दिवस येथे सुट्टी म्हणून जाहीर झाला .ऑस्ट्रेलियातील कामगारांच्या मार्गाने जात अमेरिका आणि कॅनडातील अरजाकातावादी संघटनांनी १ मे १८८६  रोजी मोर्चे आणि धरणे यांची मालिका सुरू केली अशाच एका मोर्चाला पांगवता ना ४  मे १८८६  रोजी शिकागो  मध्ये सहा आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला.

याचा परिणाम पोलिसांच्या कृत्ये विरोधातील एका मोठ्या निषेधार्थ झाला त्यात एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांवर बॉम्ब  टाकला ज्या मध्ये काही पोलिसांचा व लोकांचा मृत्यू झाला .

घटनेच्या स्मरणार्थ १ मे १८९० रोजी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी रेमंड लेविन यांनी दुसऱ्या अंतरराष्ट्रीय च्या १९८९ च्या पॅरिस परिषदेत केली.

या परिषदेत  १ मे १८९०  हा जागतिक कामगार एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित झाले .

भारतातील कामगार कायदे

कामगार कायदे माहिती साठी व पुस्तक Download करण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या.
https://mahakamgar.maharashtra.gov.in/acts-rules-mr.htm

 ज्या लोकांकडे पुरेसे शिक्षण नाही किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशा लोकांना आयुष्यात भरपूर कष्टाची कामे करावी लागतात जगण्यासाठी पुरेसा पैसा कमाने याची चिंता करण्यात त्यांचे आयुष्य जाते कामगार चोरीनंतर कामगारांच्या हितासाठी प्रत्येक देशात काही कायदे करण्यात आले आहेत भारतीय कामगार कायदा म्हणजे भारतातील कामगारांचे नियम करणारा कायदा.

भारतातील कामगार कायद्यांची व्याख्या एकसंध नाही कारण सरकार स्थापन आणि भारतीय घटनेच्या समवर्ती यादीत कामगार हा एक विषय असल्यामुळे ते प्रत्येक राज्यात भिन्न आहे मात्र भारतात या संदर्भात एक महत्त्वाचा कायदा नक्कीच करण्यात आला जो आहे दि चाईल्ड लेबर ॲक्ट ऑफ १९८६.

आंतरराष्ट्रीय कामगार दिनाची थीम ( Theme of international labour Day)

जगभरात दरवर्षी कामगार दिन साजरा करण्याबाबत एक खास थीम ठरवण्यात येते.

२०२२ आंतरराष्ट्रीय कामगार दिन - बाल मजुरी विरुद्ध जनजागृती करणे आणि बालमजुरीचे प्रमाण कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करणे.

२०२१ - आत्ताच कृती करा बालमजुरी बंद करा

२०२० - कोरोनाव्हायरस महामारी मुळे कामाच्या ठिकाणी संरक्षण आणि सुरक्षितता राखणे ही थीम ठेवण्यात आली होती.

२०१९ - सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी कामगारांना एकत्र आणणे.

कामगारांचे खरे नेते 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कामगार

  • कामगारांचे कामाचे तास १२ तासावरून ८ तास केले.
  • पीएफ योजना सर्व कामगारांना लागू केली.
  • भरपगारी सुट्टीची तरतूद केली.
  •  वेतन आयोग लागू केला .
  • पेन्शन योजना लागू केली .
  • सी एल /  इ .एल / पी. एच एल सर्वांना लागू केली.
  • कर्मचारी चा मृत्यू झाला तर वारसास नोकरीची तरतूद 
  • इ . एस . आय . सी . योजना लागू केली.
  • आठवडी सुट्टी सर्वांना सत्तेची .
  • महिलांना भरपगारी प्रसुती रजा ..











Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad