Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२१-२२ | NMMS EXAM 2022

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२१-२२ | NMMS EXAM 2022

NMMS EXAM 2022 

 सन २००७-०८ पासून इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी, आर्थिक दुर्बलतेमुळे प्रशावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.म्हणून ही परीक्षा घेतली जाते . इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न रु.१,५०,०००/- पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल.




राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा (toc)

  राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२१-२२

NMMS 2022 परीक्षेसाठी  पात्रता :

खालील विद्यार्थी NMMS परीक्षेसाठी पात्र आहेत 

a) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते..

b) पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न १,५०,०००/- पेक्षा कमी असावे, नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठ्यांचा सन २०२०-२१ च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवावा.

c) विद्यार्थी/विद्यार्थ्यांनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (SC/ ST चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)

NMMS 2022 परीक्षेसाठी अपात्र विद्यार्थी कोण ?

 खालील विद्यार्थी NMMS परीक्षेसाठी अपात्र आहेत.

  • विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.
  • केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
  • जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
  • शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.
  • सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.

 NMMS 2022 परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची निवड

  • विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल. 
  • संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.

  NMMS 2022 परीक्षेचे वेळापत्रक 

अनु. क्र विषयाचे नाव एकूण गुण एकूण प्रश्न कालावधी वेळ पात्रता गुण (एकत्रित)
१. बौद्धिक क्षमता चाचणी Mental Abilily Test  ९० ९० दीड तास (फक्त दृष्टी अपंगांसाठी ३० मिनिटे जादा वेळ) १०.३० ते१२.००  ४०% *
२. विश्रांती विश्रांती  १२.३० ते १.३० विश्रांती विश्रांती विश्रांती
३. शालेय क्षमता चाचणी Scholastic Aptitude test (SAT) ९० ९० दीड तास (फक्त दृष्टी अपंगांसाठी ३० मिनिटे जादा वेळ) १.३० ते३.००  ४०%*

महाराष्ट्रातील विविध केंद्रावर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किंवा  शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांचे मार्फत दिनांक १९ जून २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार आहे. 

सदर परीक्षेचे वेळापत्रकं खालील प्रमाणे आहे.


• सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यासाठी पात्रता गुण ४०% मिळणे आवश्यक आहेत.

 (SC, ST, व दिव्यांग विद्याथ्यांसाठी पात्रता गुण ३२१४ मिळणे आवश्यक आहेत.)

NMMS 2022  परीक्षेसाठी विषय:-

 सदर परीक्षेसाठी २ विषय असतील,

(a) बाध्दिक क्षमता चाचणी (MAT):- 

हो मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव विश्लेषण, संकलन इत्यादी संकलानांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.

 (b) शालेय क्षमता चाचणी (SAT) :- 

ही सामान्यतः इयत्ता ७ वी व इयत्ता ८ वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. त्यामध्ये

 १. सामान्य विज्ञान एकूण (गुण-३५).

 २ .समाजशास्त्र (एकूण गुण -३५).

 ३. गणित (एकूण गुण २०) असे तीन विषय असतील या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात.

उपविषय व गुण विभागणी 

उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.

 1. सामान्य विज्ञान ३५ गुण:-

 भौतिकशास्त्र १९ गुण, 

रसानशास्त्र १९ गुण, जीवशास्त्र १३ गुण 

b. समाजशास्त्र ३५ गुण:

 इतिहास १५ गुण, 

नागरिकशास्त्र ०५ गुण, 

भूगोल १५ गुण

c. गणित २० गुण. 

 माध्यम: 

  • प्रश्नपत्रिका मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दू, सिधी, कन्नड व तेलुगू या आठ माध्यमातून उपलब्ध असतील. (सर्व विद्यार्थ्यांना मूळमाध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येणार आहे.) यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल.
  •  दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील .
  • प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी वर्तुळे असतील, योग्य पर्यायाचे चतुळ निळे काळे बॉलपेनने पूर्णतः रंगवून उत्तर नोंदवायचे आहे. 
  • पेन्सिलचा वापर केलेली अपुरी/अशत: रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. 
  • एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली/उत्तरे चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली.उत्तरे/ व्हाईटनर/खाडाखोड करून नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.
  •  आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या अखिल भारतील पातळीवर NMMS शिष्यवृत्तींची संख्या एक लाख इतकी आहे. 
  • महाराष्ट्रासाठी १९६८२ इतका कोटा निश्चित करून दिलेला आहे. कोटयानुसार व राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसार गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. 
  • दिव्यांगासाठी अपंगासाठी प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण  असेल. जिल्हयासाठीचा कोटा व विद्यार्थ्यांच्या जातसंवर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या प्रदान करण्यात येतील.

अर्ज कसा करावा ?

१. अर्ज करण्याची पध्दत : दिनांक ०६/०४/२०२२ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in/व https://nmmsmsce in 

या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील.

शुल्क 

अनु. क्र तपशील दिनांक शुल्क  शाळा संलग्नता
१. ऑनलाईन नियमित आवेदनपत्रे भरणे ०६/०४/२०२२ ते २६/०४/२०२२  १०० संलग्नताफी रु. २००/- प्रति संस्था शैक्षणिक वर्षासाठी
२. ऑनलाईन विलंब आवेदनपत्रे भरणे २७/०४/२०२२ ते०१/०५/२०२२  २०० वरील प्रमाणे
३. ऑनलाईन अतिविलंब आवेदनपत्रे(शाळा/संस्था जबाबदार असेल तर) ०२/०५/२०२२ ते
०६/०५/२०२२ 
 ३००
४००
वरील प्रमाणे



निकाल घोषित करणे:- 

  • सदर परीक्षेचा निकाल साधारण ऑगस्ट २०२२ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडयात जाहीर करण्यात येईल. 
  • सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल. 
  • जिल्हयांनी शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढावयाचा आहे.


 शिष्यवृत्ती दर:-

  •  शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास इ. ९ वी ते १२ वी पर्यंत दरमहा रु. १,०००/ ( वार्षिक रु. १२,०००/-) शिष्यवृत्ती दिली जाते..
  •  शिष्यवृत्ती प्राप्त विद्याथ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इ.९ वी व इ. ११ वी मध्ये किमान ५५% गुण मिळणे आवश्यक आहे (SC/ST विद्यार्थ्यांना किमान ५०% गुणांची आवश्यकता आहे.) 
  •  इ. १० वी मध्ये किमान ६०% गुण मिळणे आवश्यक आहेत. (SC/ST   विद्यार्थ्यांना  किमान ५५%गुणांची आवश्यकता आहे.) 
  • सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य.) यांचे मार्फत केले जाते. 

अनधिकृततेबाबत इशारा -

मानव संसाधन विकास मंत्रालय (MHRD), नवी दिल्ली / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे शिवाय अन्य कोणत्याही संस्थेस या प्रकारची परीक्षा किंवा पूर्व परीक्षा घेणे, प्रमाणपत्र देणे, शिष्यवृत्ती देणे या करिता महाराष्ट्रात प्राधिकृत करण्यात आलेली नाही. 

अशा संस्थाबाबतची कोणतीही जबाबदारी मानव संसाधन विकास मंत्रालय (MHRD), नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेवर राहणार नाही.


हे नक्की वाचा ⬇️

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी RIMC परीक्षा 2022

विद्यार्थ्यांचे हक्क व सुरक्षितता काळाची गरज

राम नवमी माहिती

KEEEL APP














Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad