रामनवमी | RamNavami
राम या शब्दाचा याचा अर्थ अतिशय सुंदर असा आहे. राम म्हणजे स्वयंप्रकाश !अंत: प्रकाश ! आपल्या आत्म्याचा प्रकाश चैत्र शुद्ध नवमी तिथीला रणरणत्या उन्हात दुपारी सूर्य माथ्यावर असताना बारा च्या सुमारास प्रभु श्रीराम जन्माला आले आणि ही भूमी पावन झाली . तो दिवस म्हणजे श्री रामनवमी shri RamNavami
चैत्र नवरात्रात नवव्या दिवशी भगवान विष्णू चा सातवा अवतार म्हंटले जाणारे प्रभू श्रीराम या धर्तीवर जन्मला आले. दुपार राम या शब्दाचा अर्थ अतिशय सुंदर असा आहे. राम म्हणजे स्वयंप्रकाश! अंतःप्रकाश! आपल्या आत्म्याचा प्रकाश.रामनवमी RamNavami |
श्रीराम जन्मोत्सव
चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला रामनवमी असे म्हणतात. या दिवशी दुपारी बारा वाजता श्रीरामाचा जन्म झाला त्या दिवशी मंदिरात श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. पाळण्यात श्रीरामाची मूर्ती ठेवून पाळणा गातात कीर्तन होते लोकांना सुंठ साखरेचा प्रसाद वाटला जातो रामनवमीचा इतिहास पृथ्वीवर पाप वाढले दृष्ट दृष्ट शक्ती लोकांना त्रास देऊ लागला की त्यांचा नाश करण्यासाठी श्री विष्णू अवतार घेतात असे मानतात श्री राम हा दशावतारातील सातवा अवतार आहे. लंकेचा राक्षस राजा रावण याने श्री शंकराकडून वर मिळवला आणि तो गर्विष्ठ होऊन सर्वांना त्रास देऊ लागला रावणाला मारण्यासाठी भगवान विष्णूच श्रीरामाच्या रूपाने या पृथ्वीतलावर अवतरले.श्रीरामनवमी इतिहास
अयोध्येचा राजा दशरथ याला कौशल्या सुमित्रा व कैकेयी अशा तीन राण्या होत्या पण त्यांना मूलबाळ नसल्याने तो दुःखी होता एकदा दशरथ राजा शिकारीला गेला असताना रात्रीच्या वेळी तलावाच्या काठी बसला होता तेव्हा श्रावण नावाच चा ब्राह्मण कुमार आपल्या वृद्ध आई-वडिलांना तीर्थयात्रेला घेऊन निघाला होता आई-वडिलांना तहान लागल्यामुळे तो पाणी आणून देण्यासाठी तलावापाशी आला. दशरत राजा यांनी केवळ आवाज ऐकून अचूक बाण मारता येत असे. श्रावणाच्या तलावातील पाणी घेण्याचा आवाज ऐकून दशरत राजा यांनी त्या दिशेने बाण मारला तो श्रावण बाळाला लागला आणि तो मरण पावला. त्याच्या आई-वडिलांनी दुकाने प्राण सोडले व मरता मरता राजा दशरथाला शाप दिला कि तू ही पुत्र शोकाने प्राण सोडशील.
राजा दुःखी होऊन परत आला आणि त्याने आपले कुलगुरू वशिष्ठ मुनी यांना सर्व हकीकत सांगितली वसिष्ठ मुनी दशरथ त्याच्या हातून नकळत घडलेल्या पापाचा दोष जाण्यासाठी त्यांच्याकडून अश्वमेध यज्ञ करवला त्यानंतर त्यांनी श्रुष्य शृंग ऋषींना गुरु त्यांच्याकडून पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ केला तेव्हा अग्नी देवाने प्रसन्न होऊन राजाला प्रसाद दिला तो त्याने कौशल्या, सुमित्रा व कैकेयी तिन्ही राण्यांना दिला .त्या प्रसादाने त्यांना चार मुलगे झाले राणी कौशल्य आईला जो मुलगा झाला तो श्रीराम .सुमित्रा राणी यांना लक्ष्मण आणि कैकयीचा भरत व शत्रुघ्न .
श्रीराम - अवतार कार्य
मोठे झाल्यावर श्रीराम वडिलांचे वचन पूर्ण करण्यासाठी पत्नी सीता व भाऊ लक्ष्मण यांच्यासह 14 वर्षे वनवासाला गेलेली ही कथा सर्वांना माहित आहेच त्यानंतर राजा दशरथाचा पुत्र शोका मुळे मृत्यू झाला.
वनवासात असताना रावणाने सीतेला पळवून नेले त्या वेळी श्रीरामाने युद्धात रावणाचा वध केला व आपले अवतार कार्य पूर्ण केले.
आदर्श राजा श्रीराम
श्रीराम आदर्श पुरुष होते श्रीरामांना मर्यादापुरुषोत्तम असेही म्हणतात मातृपितृभक्ती बंधुप्रेम सतत वचनाचे व्रत प्रजा प्रेम असे अनेक आदर्श गुण त्यांच्यामध्ये होते ते एक वचनी होते त्यांच्या राज्यातील प्रजा अत्यंत सुखी आणि समाधानी होते म्हणूनच आदर्श राज्याला रामराज्य असे म्हणतातश्रीरामांचा आदर्श आपल्या मुलांसमोर असावा म्हणून मुलांना रामायणातील कथा सांगतात व संध्याकाळी राम रक्षा स्त्रोत त्यांच्याकडून म्हणून घेतात. श्रीरामाच्या महिमा मुळेच आपण सारे उत्साहाने आणि भक्तीने रामनवमी साजरी करतो. इतकेच काय एकमेकांशी कुठेही गाठ पडली तरी लोक यात राम नामाने एकमेकांना अभिवादन करतात व रामराम असे म्हणतात.
FAQ
प्रश्न. १.२०२२ मध्ये राम नवमी कधी आहे
➡️ १० एप्रिल
प्रश्न .२.रामनवमीचा शुभ मुहूर्त कोणता आहे.
➡️ शुभ मुहूर्त - सकाळी ११.०६ ते १३.३८
प्रश्न.३ राम नवमी कधी येते.
➡️ रामनवमी चैत्र महिन्याच्या नवरात्रीच्या नव्या तारखेला असते.
प्रश्न.४ राम नवमीला राम नवमी असे का म्हणतात ?
➡️ कारण याच दिवशी भगवान रामाचा जन्म झाला होता.
प्रश्न .५.चैत्र नवरात्र कधी सुरू होते .
➡️ 2 एप्रिल