Type Here to Get Search Results !

अकरावी प्रवेश प्रक्रिया 2022 भाग 2 कसा भरावा | 11 th pravesh prakriya bhag 2 kasa bharava

अकरावी प्रवेश प्रक्रिया 2022 भाग 2 कसा भरावा | 11 th pravesh prakriya bhag 2 kasa bharava 

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या पूर्वीच्या लेखामध्ये अकरावी प्रवेश भाग १ कसा भरावा हे पाहिले आहे आज आपण अकरावी प्रवेश प्रक्रिया 2022 भाग 2 कसा भरावा हे पाहाणार आहोत .

अकरावी प्रवेश प्रक्रिया 2022 भाग 2 कसा भरावा


 
अकरावी प्रवेश 2022 (toc)

अकरावी प्रवेश भाग 1 

अ) सर्वसाधारण बाबी :

१) प्रत्येक विद्यार्थ्यास एकच अर्ज भरता येईल. त्यासाठी प्रथम ऑनलाईन विद्यार्थी नोंदणी करावी. 
२) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा अर्ज वेब पोर्टलवर दोन टप्यांमध्ये भरावयाचा आहे भाग १ (वैयक्तिक माहिती) व भाग २ ( पसंतीक्रम).
३) अर्जाचा भाग-१ भरण्याची सुविधा विद्यार्थी नोंदणीनंतर उपलब्ध होईल. या भागातील माहिती एकदाच भरून प्रमाणित (verfy) करून घ्यावयाची आहे. ही प्रक्रिया इ.१० वी परीक्षेच्या निकालापूर्वीच सुरू होऊ शकते. ४) अर्जाचा भाग-२ भरण्याची सुविधा भाग-१ प्रमाणित करून घेतल्यानंतर उपलब्ध होईल. तसेच प्रत्येक फेरीपूर्वी भाग-२ मधील माहिती / पसंतीक्रम अद्ययावत करता येईल.

(ब) ऑनलाईन नोंदणी कशी करावी :

(१) प्रवेश प्रक्रियेची माहितीपुस्तिका वेब पोर्टलवर उपलब्ध आहे त्याचे वाचन करा.

(२) नमुना अर्ज भरण्यापूर्वी माहितीपुस्तिका काळजीपूर्वक वाचा व संपूर्ण प्रवेश प्रक्रिया समजून घ्या. यासाठी आपल्या शाळेची अथवा मार्गदर्शन केंद्राची मदत घ्या.

(३)प्रवेशासाठी क्षेत्र निश्चित करा व योग्य वेब पोर्टल / वेबसाईट उघडा (STUDENTS REGISTRATION)

(४) वेब पोर्टलवर नोंदणी करताना तुमचा इ.१० वीचा बैठक क्रमांक व मोबाईल नंबर टाकल्यानंतर लॉगीन

आयडी तुम्हास प्राप्त होईल, पासवर्ड तुम्हास स्वतः तयार करावयाचा आहे. मिळालेले लॉगीन आयडी व

पासवर्ड लॉगीन करण्यासाठी वापरा. (लॉगीन आयडी व पासवर्ड जपून ठेवा.)

(५) तुमचा लॉगीन आयडी व पासवर्ड एसएमएस द्वारे तुमच्या मोबाईलवर सुद्धा पाठविला जाईल. जर

एसएमएस आला नाही, तर नोंदणीनंतर स्क्रीनवर दाखवलेला लॉगीन आयडी नोंदवून ठेवा.

(६) नोंदणी करताना निवडलेल्या सिक्युरिटी प्रश्नाचे उत्तर लक्षात ठेवा. सिक्युरिटी प्रश्न व पासवर्ड याची प्रिंट घ्या व जपून ठेवा (आपला पासवर्ड इतर कोणासही सांगू नका.)

क) प्रवेश अर्ज कसा भरावा (भाग-१) :


(७) तुम्हाला मिळालेल्या लॉगीन आयडी व पासवर्डच्या सहाय्याने  लॉगीन करा व संगणकावर दिलेल्या
सूचनांप्रमाणे टप्प्याटप्प्याने ऑनलाईन अर्ज भरा.
अर्ज कसा भरावा हे सविस्तर पाहण्यासाठी व वाचण्यासाठी   खालील लिंक ला भेट द्या ⬇️


अकरावी प्रवेश प्रक्रिया 2022 भाग 2 कसा भरावा

*प्रवेश अर्ज भाग २ (पसंतीक्रम नोंदविणे) :* 


राज्य मंडळ इ.१० वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्ज भाग २ भरण्याची कार्यवाही वेळापत्रकानुसार सुरू होईल. 
 वरीलप्रमाणे भाग १ मधील माहिती प्रमाणित (Verify ) केल्यानंतरच प्रवेश अर्जाचा भाग २ ( पसंतीक्रम)
विद्यार्थ्यांना भरता येईल.
भाग २ सुरू झाल्यावर राज्य मंडळाच्या (चालू वर्षीच्या) नियमित विद्याथ्यांचे इयत्ता *दहावीचे सर्वोत्तम पाच (Best of Five) विषयांचे मिळालेले गुण व शेकडा गुण आपोआप दिसतील.* 
 
ज्या विद्याथ्यांचे गुण आपोआप येणार नाहीत त्यांनी तसेच इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे इयत्ता दहावीचे एकूण गुण स्वतः (Manually) अचूक नोंदवावेत. 

 प्रवेशासाठी एका शाखेची व एका माध्यमाची निवड करावी, त्यानंतर ती शाखा / माध्यम असणाऱ्या सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांची यादी (अनुदानित / विनाअनुदानित / स्वयंअर्थसहायित) विद्यार्थ्यास दर्शविलो जाईल. त्यानुसार पसंतीक्रम ठरवावा. 
 प्रवेशासाठी आपल्या पसंतीची किमान १ व कमाल १० उच्च माध्यमिक विद्यालये निवडा व त्यांचा प्राधान्य क्रम निश्चित करा. त्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या व जपून ठेवा.

त्यासोबतच कोटा प्रवेशासाठी इच्छित विद्यालयांसाठी ऑनलाईन पसंती नोंदवावी,

 प्रत्येक फेरीत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची निवड करताना विद्यार्थ्याची गुणवत्ता (इ. १० वीचे गुण), आरक्षण व विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक विद्यालयाचा दिलेला पसंतीक्रम विचारात घेतला जाईल.

 वेळापत्रक व प्रवेशाची कार्यपद्धती वेळोवेळी वेब पोर्टलवर जाहीर करण्यात येईल. त्यासाठी वेब पोर्टलस सतत भेट देत राहा.

 *विशेष फेरीसाठी संमती नोंदविणे -* 


प्रत्येक फेरीपूर्वी विद्यार्थ्यास पसंतीक्रम देण्याची अथवा त्यामध्ये बदल करण्याची संधी दिली जाईल. जर विद्यार्थ्याने एखाद्या फेरीपूर्वी आपले पसंतीक्रम बदलले नाहीत तर त्याचे मागील फेरीचे पसंतीक्रम पुढे ग्राह्य धरण्यात येतील. ही सुविधा फक्त (३) नियमित फेऱ्यांसाठी लागू असेल. प्रत्येक विशेष फेरीपूर्वी विद्यार्थ्याने ऑनलाईन संमती नोंदविणे अनिवार्य असेल. जे विद्यार्थी संमती नोंदविणार नाहीत त्यांचा त्या विशेष फेरीसाठी विचार केला जाणार नाही.

11 th pravesh prakriya bhag 2 भरताना *विद्यार्थ्यांनी घ्यावयाच्या दक्षता* 

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना (ऑनलाईन नोंदणी व अर्ज करणे) (१) अर्जात भरलेल्या माहितीची व अर्जदारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करावयाची असल्याने विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज आपापल्या घरूनच (संगणकावर किंवा मोबाईल अॅपमधून) भरावा व आपल्या माध्यमिक शाळेतून अथवा निवडलेल्या मार्गदर्शन केंद्रातून प्रमाणित करून घ्यावा. (अर्ज केवळ विद्यार्थी लॉगीनमधूनच भरला जाणार आहे त्यामुळे आपला अर्ज भरताना दक्ष राहा.)

(२) विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज शक्यतो स्वतः पालकांच्या मदतीने भरावा. इतर ठिकाणाहून अर्ज भरल्यास त्यामध्ये अपूर्णता/ त्रुटी राहू शकतील व त्यामुळे तुमच्या प्रवेश प्रक्रियेत अडथळा येऊ शकेल.

३)प्रवेश अर्ज सादर ( Submit Lock) केल्यानंतर त्याची एक छापील प्रत (Print out) विद्यार्थ्याने स्वतःकडेघेऊन ठेवावी. या प्रिंटवरून विद्यार्थ्यास अर्जात भरलेली माहिती पुन्हा पडताळून पाहता येईल. अधिक माहितीसाठी वेब पोर्टलवर देण्यात आलेल्या टोल फ्री हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा. शंकांचे निरसन न झाल्यास आपल्या शाळेची अथवा मार्गदर्शन केंद्राची फोनवरून मदत घ्या किंवा आपली अडचण वेब पोर्टलवर विद्यार्थी लॉगीनमध्ये शंका-समाधानमध्ये नोंदवा.

 *पसंतीक्रम ठरविण्यासाठी मार्गदर्शन सूचना:* 


● पसंतीक्रम निश्चित करताना त्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे मागील कट ऑफ, आपणास मिळालेले गुण, हवी असलेली शाखा, फी, माध्यम, अनुदान प्रकार, शिकविले जाणारे वैकल्पिक विषय, निवासापासूनचे अंतर, जाण्यायेण्याची सोय, वसतिगृह सुविधा, क्रीडांगण, इ. बाबींचा साकल्याने विचार करून पसंतीक्रम ठरवा.

● विद्यार्थ्यास प्रवेशासाठी त्याच्या पसंतीनुसार किमान एक व कमाल दहा उच्च माध्यमिक विद्यालयांचे

पसंतीक्रम देता येतील. प्रथम पसंतीक्रम मिळाल्यास प्रवेश घेणे सक्तीचे असेल. (नियमित फेन्यांमध्ये)

* पसंतीक्रम ठरविण्यासाठी अगोदर शाखा व माध्यम निश्चित करा व त्यानंतर येणाऱ्या यादीतील आपणास योग्य वाटत असणाऱ्या उच्च माध्यमिक विद्यालयांची यादी करा व त्यामधील सर्वात योग्य पसंतीचे उच्च माध्यमिक विद्यालय

प्रथम घेऊन त्याप्रमाणे क्रम काळजीपूर्वक ठरवा व नंतरच ऑनलाईन पसंतीक्रम नोंदवा.

ज्या विद्यालयात आपणास प्रवेश घ्यावयाचा नाही अशा उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंतीक्रमामध्ये समावेश करू नका.

● प्रत्येक फेरीला पसंतीक्रम बदलण्याची मुभा असल्यामुळे प्रत्येक फेरी स्वतंत्र असणार आहे. पसंतीक्रम ठरविताना मागील फेरीचे Cut Off तपासा.

● यासाठी वेब पोर्टलवरील Know your Eligibility या सुविधेचा वापर करा.

● सर्व दहा पसंतीक्रम भरलेच पाहिजेत असे नाही. तसे शक्य नसल्यास दहापेक्षा कमी पसंतीक्रम दिले तरी चालतील.
एकाच उच्च माध्यमिक विद्यालयातील शाखा, अनुदान प्रकार माध्यम विचारात घेऊन त्याला स्वतंत्र सांकेतांक (Code) दिलेले आहेत. त्यामुळे एकाच विद्यालयाला शाखा, अनुदान प्रकार, माध्यम यानुसार एकापेक्षा अधिक कोड असू शकतात त्यामुळे विद्यालय/ शाखा कोड निवडताना दक्षता घ्या.

 *उच्च माध्यमिक विद्यालय/तुकडी कोडची रचना :* 


विद्यालयाचा कोड नऊ अक्षरी (Characters) असून त्यात अक्षरे व अक समाविष्ट आहेत.

उदा. पुणे

विज्ञान अनुदानित इंग्रजी माध्यम PN1023SGE कला विनाअनुदानित उर्दू माध्यम PN1023ANU HSVC स्वयंअर्थसहायित मराठी माध्यम PN1023HEM

 *नियमित फेऱ्यांसाठीचे नियम* - अकरावी प्रवेश प्रक्रिया भाग 2 


(९) दिलेल्या मुदतीत एखादया विद्यार्थ्याने पसंतीक्रम न बदलल्यास त्या विद्यार्थ्याचे मागील फेरीचे

पसंतीक्रम कायम राहतील. (फक्त नियमित फेऱ्यांसाठी)

विशेष फेरीसाठी ऑनलाईन संमती नोंदविणे (भाग-२ पुन्हा लॉक करणे) सक्तीचे असेल. (१०) पहिला पसंतीक्रम दिलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यास प्रवेश मिळाला असल्यास सदर उच्च माध्यमिक विद्यालयात निर्धारित कालावधीत विद्याथ्यनि प्रवेश घेणे बंधनकारक असेल. 
पहिला पसंतीक्रम मिळालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील नियमित फेऱ्यांसाठी प्रतिबंधित (Restrict) करण्यात येतील. (प्रवेश घेवो अगर न घेवो).

 *प्रवेश अर्ज मागे घेणे :* 


ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर आयटीआय (ITI), तंत्रनिकेतन (Polytechnice) सारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या अथवा ह्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणार नसलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज मागे घेण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. तरी ज्यांना ११ वी प्रवेश प्रक्रियेमध्ये पुन्हा यायचे नाही त्यांनी Withdrawal of Application हा पर्याय वापरून प्रक्रियेमधून बाहेर पडावे. यामुळे इतरांना संधी मिळेल.

 *प्रवेश फेरीची यादी जाहीर झाल्यावर* 


प्रवेश फेरी यादी जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयाची माहिती विद्यार्थी लॉगीनमध्ये दर्शविण्यात येईल. ती तपासून पाहावी व पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी.

(अ) प्रथम प्राधान्यक्रम मिळाल्यास :


प्रवेश फेरीची यादी जाहीर झाल्यावर प्रवेश फेरी यादी जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयाची

माहिती विद्यार्थी लॉगीनमध्ये दर्शविण्यात येईल. ती तपासून पाहावी व पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी.

 *(अ) प्रथम प्राधान्यक्रम मिळाल्यास :* 


((५.१) विद्यार्थ्यास पहिला पसंतीक्रम दिलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश मिळाला असल्यास त्या उच्च

माध्यमिक विद्यालयात आपली मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती वेळापत्रकाप्रमाणे विहित मुदतीत

दिलेल्या सूचनेनुसार सादर करून, फी भरून प्रवेश घेणे अनिवार्य राहील, (५.२) पहिल्या पसंतीक्रमाचे उच्च माध्यमिक विद्यालय मिळूनही प्रवेश घेतला नाही, तर अशा विद्याव्यांची नावे (संबंधित शाखेसाठी) पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित (Restrict) करण्यात येतील. मात्र अशा विद्यार्थ्याना ऑनलाईन संमती नोंदवून त्यापुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होता येईल.

 *(ब) अन्य (२ ते १० पैकी एक) प्राधान्यक्रम मिळाल्यास :* 


(५.३) पहिल्या पसंतीक्रमाव्यतिरिक्त अन्य पसंतीक्रमांकाचे उच्च माध्यमिक विद्यालय मिळाल्यास व ते विद्यार्थ्यास मान्य असल्यास असे विद्यार्थी निर्धारित कालावधीत सदर उच्च माध्यमिक विद्यालयात आपली मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती सादर करून व फी भरून आपला प्रवेश निश्चित करू शकतील. तत्पूर्वी उच्च माध्यमिक विद्यालयाने दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावी.

 *प्रवेशासाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे* 
इ. ११वी मध्ये प्रवेशासाठी आवश्यक पात्रता :


(६.१) राज्य मंडळाच्या इयत्ता ११ वी मध्ये प्रवेशासाठी इयत्ता १० वी किंवा समकक्ष परीक्षा इंग्रजी विषयासह किमान पाच विषय घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. (६.२) इ.११वी मध्ये विज्ञान शाखा निवडता येण्यासाठी विद्यार्थी ज्या मंडळामार्फत इ.१०वी उत्तीर्ण झाला

असेल त्या मंडळाच्या निकषानुसार तो विज्ञान विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 
 इ.११वी मध्ये गणित विषय निवडता येण्यासाठी इ.१०वी मध्ये विद्यार्थ्याने सामान्य गणित विषय निवडला असेल असे विद्यार्थी (कला, विज्ञान, वाणिज्य व एचएसव्हीसी) कोणत्याही शाखेसाठी अर्ज करू शकतात. तथापि, त्यांना गणित विषय घेता येणार नाही..

 *इ. ११वी मध्ये द्विलक्षी विषय निवडता येण्यासाठी*
  - इ.११वी मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, हे तीन विषय घेतलेले नसताना तांत्रिक गटातील द्विलक्षी अभ्यासक्रमास प्रवेश देता येत नाही आणि इ. ११ वी मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र हे तीन विषय घेतलेले नसताना पैरामेडिकल गटातील द्विलक्षी अभ्यासक्रमास प्रवेश देता येत नाही.


(५.४) अशा विद्याथ्र्यांनी निर्धारित कालावधीत संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश निश्चित न केल्यास

त्यांना पुढील फेरीसाठी पसंतीक्रम बदलण्याची मुभा देण्यात येईल. आणि पसंतीक्रम न बदलल्यास

यापूर्वीच्या फेरीचे पसंतीक्रम गृहीत धरून कार्यवाही केली जाईल.
((५.१) विद्यार्थ्यास पहिला पसंतीक्रम दिलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश मिळाला असल्यास त्या उच्च

माध्यमिक विद्यालयात आपली मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती वेळापत्रकाप्रमाणे विहित मुदतीत

दिलेल्या सूचनेनुसार सादर करून, फी भरून प्रवेश घेणे अनिवार्य राहील,  पहिल्या पसंतीक्रमाचे उच्च माध्यमिक विद्यालय मिळूनही प्रवेश घेतला नाही, तर अशा विद्याव्यांची नावे (संबंधित शाखेसाठी) पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित (Restrict) करण्यात येतील. मात्र अशा विद्यार्थ्याना ऑनलाईन संमती नोंदवून त्यापुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होता येईल.

(ब) अन्य (२ ते १० पैकी एक) प्राधान्यक्रम मिळाल्यास :

 *पहिल्या पसंतीक्रमाव्यतिरिक्त अन्य पसंतीक्रमांकाचे* 
उच्च माध्यमिक विद्यालय मिळाल्यास व ते विद्यार्थ्यास मान्य असल्यास असे विद्यार्थी निर्धारित कालावधीत सदर उच्च माध्यमिक विद्यालयात आपली मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती सादर करून व फी भरून आपला प्रवेश निश्चित करू शकतील. तत्पूर्वी उच्च माध्यमिक विद्यालयाने दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावी.

 अशा विद्याथ्र्यांनी निर्धारित कालावधीत संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश निश्चित न केल्यास

त्यांना पुढील फेरीसाठी पसंतीक्रम बदलण्याची मुभा देण्यात येईल. आणि पसंतीक्रम न बदलल्यास

यापूर्वीच्या फेरीचे पसंतीक्रम गृहीत धरून कार्यवाही केली जाईल.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे -


६.५ इ. ११ वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक विद्याथ्यनि पुढील प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहेत. पुढील दोन कागदपत्रे हो इ.११वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्याथ्यांसाठी आवश्यक आहेत. त्यामध्ये खुल्या प्रवर्गातील तसेच विविध आरक्षणाच्या लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याचा समावेश होतो.

९) इ. १०वी / समकक्ष परीक्षेचे मूळ गुणपत्रक

२) इ.१० वी शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत ).

अकरावी प्रवेश माहिती पुस्तिका 2022 

अकरावी प्रवेश माहिती पुस्तिका DOWNLOAD करा ⬇️




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad