शाळा प्रवेशोत्सव 2022 | Shala praveshutsav 2022 | shala pravesh utsav 2022 शाळा प्रवेश उत्सव 2022
दिनांक १५ जून २०१५ रोजी राज्यात शाळा प्रारंभ होत आहेत. हा प्रारंभ चैतन्यमय आणि उत्साहवर्धक झाल्यास शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन राज्यात "शाळा प्रवेशोत्सव 2022 " शाळा प्रवेश उत्सव 2022 मोठया उत्साहात पार पाडणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
शाळा बालकांचे भावविश्व घडविते सामाजिक विकासात आणि राष्ट्राच्या जडण घडणीत शाळेचे अव्दितीय स्थान मान्य करावेच लागेल. उक्त अधिनियम २००९ नुसार बालकांना शाळेत प्रवेशीत करून त्याला हसत खेळत आनंददायी शिक्षण देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. शाळातुन दिले जाणारे शिक्षण हे जीवनदायी आहे अशी शिक्षण हक्क कायद्याची फलनिष्पत्ती आहे. दर्जेदार शिक्षणासाठी शासन कटिबध्द असून प्रत्येक मुल पटावर नोंदवले जाऊन ते नियमित शाळेत येणे यासाठी राज्यभर
विविध स्तर आणि पातळ्यांवर नवोपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
शाळा प्रवेशोत्सव 2022 Shala praveshutsav 2022 |
शाळा प्रवेशोत्सव 2022 तयारी कशी करावी ?शाळा प्रवेश उत्सव 2022 | shala pravesh utsav 2022
दीर्घ सुटयांच्या आनंदानंतर विद्यार्थी जेव्हा शाळेत येतील तेव्हा त्यांना त्यांची शाळा हवीहवीशी वाटली पाहिजे. शाळा परिसर स्वच्छ, सुंदर आणि प्रेरणादायी असल्यास सुट्टयानंतर बालकांना शाळेची ओढ लागेल. शिक्षक आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शाळा पूर्व दिनी शालेय व्यवस्थापन समिती आणि गावातील / वार्डातील युवक युवती मंडळे बचतगट यांच्या सहकार्यातून उपलब्ध संसाधनाच्या साहयाने शाळा परिसर स्वच्छ करून, सडा टाकून, रांगोळी काढून गावातील उपलब्ध फुले आणि पानाची तोरणे बांधून वर्ग खोल्यांना सुशोभित करून शाळा सुशोभित केल्यास विद्यार्थ्यांना शाळा अधिकाअधिक आवडू लागतील.
Shala praveshutsav 2022 कार्यक्रम स्वरूप
- शाळा सुरू होण्याच्या पुर्वदिवशी शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था तसेच स्थानिक सेवाभावी संस्था (युवक मंडळे, क्रीडा मंडळे, बचत गट, महिला मंडळे, जेष्ठ नागरिक संघ ) यांच्या सहकार्याने शाळेत नव्याने प्रवेशित होणाऱ्या बालकांच्या घरी भेट देणे, पदयात्रा व शाळा परिसर स्वच्छता / सुशोभीकरण करावे.
- शाळा सुरू होण्याच्या दिवशी शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहुन प्रभातफेरी आयोजन, विद्यार्थ्यांचे फूले देवून स्वागत, मोफत पुस्तक वितरण इ. कार्यक्रम आयोजित करावेत.
- शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था तसेच स्थानिक सेवाभावी संस्था ( युवक मंडळे, क्रीडा मंडळे, बचत गट, महिला मंडळे, जेष्ठ नागरिक संघ) यांचे सहकार्य घ्यावे.
- शाळा सुरू होण्याच्या दिवशी शिक्षक, क्षेत्रीय अधिकारी यांनी वेळेवर उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची विनंती शाळा असणाऱ्या गाव / प्रभागात निवास असणाऱ्या स्थानिक ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व महानगरपालिका यांच्या सदस्य / पदाधिकाऱ्यांना करण्यात यावी. या प्रमाणे सदस्यांचे निवासस्थान परिसरात शाळा असणाऱ्या गाव/ प्रभागात नसल्यास स्थानिक ग्रामपंचायतीचे सरपंच / उपसरपंच तसेच जेष्ठ सदस्य यांचेव्दारा स्वागत करावे.
- जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी जिल्हयाचे संसद सदस्य, पालकमंत्री महोदय व स्थानिक मंत्री महोदय यांना जिल्हयातील एका शाळेत या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची विनंती करावी.
- गट शिक्षणाधिकारी / शिक्षणाधिकारी म.न.पा. यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील संसद सदस्य व विधीमंडळ सदस्य यांना जिल्हयातील एका शाळेत या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची विनंती करावी.
- या कार्यक्रमाची व्यापक प्रसिध्दी करण्यात यावी.
- सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी, उपसंचालक, सहसंचालक, संचालक, डायट प्राचार्य यांनी किमानएका शाळेवर उपस्थित राहावे.
- शिक्षण विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या इतर विभागातील वर्ग २ व त्यावरील अधिकाऱ्यांना या कार्यक्रमासाठी शाळा निहाय निमंत्रित करावे.
- शाळेच्या प्रथम दिवशी मध्यान्ह भोजन योजनेतील जेवणात गोड पदार्थाचा समावेश करावा.
- शाळेच्या प्रथम दिवशी स्थानिक कलाकार अथवा माजी विद्यार्थी यांनी शिक्षणाबाबत सांस्कृतिक
- कार्यक्रम करणार असतील तर त्यास प्रोत्साहन दयावे.
शाळा प्रवेशोत्सव 2022 घोषवाक्य
एकाने शिकवूया एकाला साक्षर करूया जनतेला.
“अज्ञानात आपली अधोगती शिक्षणात आहे खरी प्रगती”
”चला शाळेत जाऊया सारे शिकूया ”
शाळा प्रवेशोत्सव 2022 शासन निर्णय
शाळा प्रवेशोत्सव 2022 कार्यक्रम खर्च कोणत्या निधीतून करावा .
शाळा प्रवेशोत्सव 2022 - शाळा पूर्व तयारी आणि पूर्वदिनी घरभेटी शैक्षणिक पदयात्रा
शाळा प्रवेशोत्सव 2022 Shala praveshutsav 2022 |
Shala praveshutsav 2022 - शाळेच्या पहिल्या दिवशी करावयाची तयारी
शाळा प्रवेशोत्सव 2022 Shala praveshutsav 2022 |
हे नक्की वाचा ⬇️