छत्रपती राजर्षी शाहू महाराज भाषण मराठी | Chatrapati Rajarshi Shahu Mahararaj Bhashan marathi
नमस्कार आज आपण लोकराजा कर्तव्यदक्ष, आरक्षणाचे जनक, बहुजनांचा आधार .. कुशल व्यवस्थापक जलनीती तज्ञ .. छत्रपती राजश्री शाहू महाराज भाषण मराठी मध्ये सहज व सोप्या भाषेत कसे करावे ते पाहाणार आहोत.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज (toc)
छत्रपती राजर्षी शाहू महाराज -भाषणाची सुरुवात
छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व समोर बसलेल्या माझ्या मित्र मैत्रिणी यांचे सहर्ष स्वागत ..
आज छत्रपती राजर्षी शाहू महाराज असते तर त्यांना खूप आनंद झाला असता कारण की त्यांनी पेरलेले शिक्षणाचे रोप आज वटवृक्षाप्रमाणे मोठे झाले आहे .
छत्रपती राजर्षी शाहू महाराज भाषण मराठी |
आधुनिक काळात महाराष्ट्राची जडणघडण करणाऱ्या महान नेत्यांमध्ये कोल्हापूरचे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे एकोणिसाव्या शतकात महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्वाभिमानाचे व समतेचे बी पेरून चे झाड लावले त्याला खतपाणी घालून काळजीपूर्वक वाढवले ते शाहू छत्रपतींनी या झाडाला कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव जेधे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाच्या रुपाने पुढील काळात नवनवीन धुमारे फुठले. शेकडो वर्षे ज्ञान ,सत्ता, संपत्ती या पासून वंचित राहिले त्यांना माणूस म्हणून स्वाभिमानाने जगता यावे शिकता यावे आणि विकासाच्या वाटा खुल्या व्हाव्यात असा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी आयुष्यभर ध्यास घेतला होता.
राजर्षी शाहू महाराज संपूर्ण माहिती
बहुजनांचा आधार .. कुशल व्यवस्थापक ,
जलनीती तज्ञ ..
छत्रपती राजश्री शाहू महाराज.
यांना मानाचा मुजरा
राजर्षी शाहू महाराजाचे व्यक्तिमत्व तपासण्यासाठी आज आपण लेखनाच्या फुटपट्टया वापरतो. परंतु या लेखनाच्या फुटपट्टयांनी या 'माणसा'चे व्यक्तिमत्व तपासता येईल का ? हाच खरा प्रश्न उभा राहतो. 'राजर्षी छपती शाहू महाराज' हे लेखनाचे विषय होण्याइतपत मर्यादित नाहीतच! त्यांचे कर्तृत्व हे संत तुकारामांच्या भाषेत सांगायचे झाले तर,
“अणुरेणुया थोकडा 'शाहू' आकाशा एवढा ”
राजघराण्यात राहून सुद्धा लोकांसाठी जगलेला हा माणूस नुसता 'राजा' उरला नाही तर लोकराजा रवतेचा राजा ठरला. छत्रपती शिवरायाचे वंशज म्हणून जगताना 'छत्रपती' ही बिरुदावली नुसती लावली नाही तर खऱ्या कर्तृत्वाने सार्थ केली. 'छत्रपती, राजर्षी शाहू महाराज' हे लांबलचक बिरूद घेवून अद्यापही शे-सव्वासे वर्षांपासून अनेकांच्या मनाचा ठाव घेत शाहू महाराज सर्वसामान्यांकरिता अजूनही जिवंतच आहे; नव्हे, आम्ही ते त्यांच्या कर्तृत्वाने सिद्ध करू शकतो. म्हणूनच तर, शाहू महाराजांच्या त्या कर्तृत्वाला, त्या विचारांना केवळ मुजरा म्हणून नव्हे; केवळ सलाम म्हणून नव्हे; प्रणाम म्हणून नव्हे तर त्यांच्या विचारांना जोपासावे म्हणून, त्यांचे विचार अधिकाधिक अभ्यासले जावे म्हणून, त्याच्या तत्कालिन कार्याचे उपयुक्तपण कसे लागू होईल? ते कळावे म्हणून, त्यांच्या निर्णयप्रक्रियांचा ठामपणा आजच्या तकलादू विचारांच्या विचारवंतांना कळावा म्हणून, त्यांच्या प्रशासन व्यवस्थेतील 'दूरदृष्टीपणा' आजच्या शासनप्रशासन व्यवस्थेला ज्ञात व्हावा म्हणून आणि त्यांनी दीपवून जावे म्हणून, त्यांनी त्याकाळात केलेल्या सुधारणा आजच्या एकविसाव्या शतकात फक्त 'साक्षर' होवून नुसते ऐषोरामी जीवन जगत असलेल्या पिढीला डोळे उपडे करून तपासता याव्या म्हणून त्यांचे विचार अभ्यास ले पाहिजेत.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे बहुजन समाजाचे महानायक, शेतकऱ्यांचा उद्धारकर्ता, दूरदृष्टीचा विशाल मनाचा राजा व एक लोकनेते होते. त्यांनी समाजातील बहुजन, - मागासलेल्या तळागाळातील वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता जे अनेक कार्य केले. त्यात गुन्हेगारी जमातीवरील गुन्हेगारीचा शिक्काबंद, मुलांच्या सक्तीच्या शिक्षणासाठी पालकांना दंड, सहकारीत्वाची भावना वाढविणे, जनहितार्थ कायद्याची मांडणी करणे, आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणे, विधवा पुर्नविवाह कायदा आणणे, मूलगामी सुधारणा करणे, शेतीसाठीची पाणीव्यवस्था पाटबंधारे, कोल्हापुरी बंधारे आणि मालासाठी बाजारपेठा व कारखाने यांची उभारणी हे उरिष्ट्ये पेवून शाहू महाराजांनी 'नव्या सामजिक क्रांतीचा' पुरस्कार केला, शिक्षणाची संकल्पना, जानवार नेतृत्व स्वाबलंबन, शिस्त, सहकार्य, नियमितता, सहिष्णूता, देशप्रेम इत्यादी गुणासाठी प्रयत्न केले. लोकशाही, नवनिर्मितीक्षम आणि सामाजिक सुधारणेचा पाया रचणारे राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षणविषयक धोरण आजही देशाला प्रेरणादायी ठरत आहे. वसतीगृहे, शिष्यवृत्ती, शाळा व नोकरीत राखीव जागाची तरतुद, जातीप्रथेला विरोध, वेठबिगारीला विरोध, स्त्री शोषणाला विरोध करून वेगवेगळे कायदे अस्तित्वात आणूण सामाजिक सुधारणा, बंधुभाव, शिक्षण, कृषी, उद्योग, कला या क्षेत्रात केलेले लोककल्याणकारी कार्य बहुजन समाजाला न्याय हक्क देण्यास उपयुक्त आहे. त्यामुळे अश्या राष्ट्रपुरुषाच्या कार्याची दखल घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होवू शकत नाही. म्हणून या थोर माणसाच्या विचार व कार्याला समाजापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे.
एवढे बोलून मी माझे भाषण समाप्त करतो .
जय हिंद जय महाराष्ट्र .
'राजर्षी शाहू महाराज व्यक्तित्व, कर्तृत्व आणि विचार
याकरिता 'राजर्षी शाहू महाराज व्यक्तित्व, कर्तृत्व आणि विचार' हे पुस्तक वाचावे. पुस्तक Downloaf करा .pdf ⬇️