Type Here to Get Search Results !

छत्रपती राजर्षी शाहू महाराज माहिती मराठी | Chatrapati Rajashari Shahu Maharaj Mahiti Marathi

 छत्रपती राजर्षी शाहू महाराज माहिती मराठी | Chatrapati Rajashari Shahu Maharaj  Mahiti Marathi

नमस्कार आज आपण   समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही लोकशाही मूल्य रुजविणाऱ्या आपल्या पदाची वाहवा न करता सर्वांसाठी समान कायदा व सक्तीचे शिक्षण लागू करणारे युगपुरुष लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या विषयी
माहिती मराठी मध्ये  पाहाणार आहोत.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज माहिती





छत्रपती राजर्षी शाहू महाराज माहिती (toc)

छत्रपती राजर्षी शाहू महाराज जीवन परिचय माहिती  मराठी 

जन्म - शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी झाला.
जन्म ठिकाण -   शाहू महाराजांचा जन्म कागल येथील घाटगे घराण्यात झाला. 
 मूळ नाव - यशवंत .
वडिलांचे नाव - जयसिंगराव(आप्पासाहेब) 
आईचे नाव -  राधाबाई होते. 
 दत्तक - शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले. 
शिक्षण - सन १८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला.
विवाह -   १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले.

कार्य -

  • राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर  भर दिला. 
  • शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. 
  • स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली होती. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली.
  •  जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. 
  • इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. 
  • बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी  त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे 'डेक्कन रयत असोसिएशन' ही संस्था स्थापली. 

शिक्षण 

  • शाहू महाराज यांचे  शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाताखाली झाले. 
  • पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज मध्ये व धारवाड येथे झाले. 
  • अभ्यास व् शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहारज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्त्व विकसित झाले होते.

मदत कार्य  - 

 १८९६चा दुष्काळ व नंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची कसोटी लागली आणि त्याला ते पूर्णपणे उतरले. दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्यदुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता 'असा राजा होणे नाही' असेच प्रजेला वाटते.म्हणून म्हणावेसे वाटते की 
 
माणसांच्या ओळखीचा, माणसांचा राजा ! 
माणसात माणुसकी, मानणारा राजा !! | 
राजा म्हणावं की तुला, माय बाप म्हणू! 
माया दिली पोटातल्या, पोरावानी जणू !!
 एकदाच देवदूत, धाडला देवानी ! पुन्हा नाही राजा असा, पाहिलाच कुणी !!
त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. 
त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. 
गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.
अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले.
अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, दुकाने हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले, तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली.

शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कोणी दिली ?


शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.

शैक्षणिक कार्य

शाहू महाराजांनी खालील शाळा सुरू केल्या.
 १. प्राथमिक शाळा .
२. माध्यमिक शाळा.
 ३. पुरोहित शाळा .
४. युवराज / सरदार शाळा .
५. पाटील शाळा .
६. उद्योग शाळा.
 ७. संस्कृत शाळा.
 ८. सत्यशोधक शाळा .
९. सैनिक शाळा.
 १०. बालवीर शाळा .
११. डोंबारी मुलांची शाळा.
 १२. कला शाळा.


विविध जातीधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेली वसतीगृहे :

१८९६ ते १९२१ या काळात राजांनी कोल्हापुरात सर्व जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अशी सुमार २० वसतीगृहे स्थापन केली. यापैकी प्रमुख वसतीगृहे पुढीलप्रमाणे:

 राजाराम होस्टेल (१९०१).

मराठा बोर्डिंग (१९०१).

वीरशैव लिंगायत बोर्डिंग (१९०६).

मुस्लीम बोर्डिंग (१९०६).

मिस क्लार्क होस्टेल (१९०८).

दैवज्ञ बौर्डिंग (१९०८).

नामदेव बोर्डिंग (१९१९).

सरस्वतीबाई गौड सारस्वत बोर्डिंग (१९१५)ग्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग (१९२०). 

व्हिक्टोरिया१९०१ मध्ये मराठा विद्यार्थ्यांसाठी असलेल्या व्हिक्टोरिया वसतीगृहात अस्पृश्य व मुस्लिम विद्यार्थ्यांची सोय केली.

 कोल्हापूर व्यतिरिक्त पुणे, नाशिक, अहमदनगर या ठिकाणीदेखील वसतीगृहे स्थापन केली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे निर्मुलन कार्य : 

२६ जुलै १९०२ : शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी नोकरीत ५० टक्के जागा राखीव ठेवल्या. (२६ जुलै २००२ रोजी कोल्हापुरात मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणाची शताब्दी श्रीमती मायावती यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.) गंगाराम कांबळे यांना 'हॉटेल सत्यशोधक' ('सत्यमुधारक') हे चहाचे दुकान उघडून दिले.

कोल्हापूर नगरपालिकेच्या अध्यक्षपदी मागासवर्गीय उमेदवारास संधी दिली.

१९९८ साली कोल्हापूर संस्थानातील महार वतने रद्द करून त्या जमिनी अस्पृश्य बांधवांच्या नावे केल्या.. २२ फेब्रुवारी १९१८ : कोल्हापूरच्या गॅझेटमध्ये जाहिरनामा प्रसिद्ध करून संस्थानातील बलुतेदारी पद्धती कायद्याने बंद केली आणि बलुतेदारांना समाजातील सर्व उद्योगधंदे खुले केले. 

१५ जानेवारी १९९९ : राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात 'आजपासून सार्वजनिक जागी व सार्वजनिक संस्थांमध्ये अस्पृश्यता पाळली जाणार नाही' असा आदेश काढला.

राजर्षी शाहू महाराजांनी महिलांसाठी केलेल्या सुधारणा : जुलै १९१७ पुनर्विवाह व विधवा विवाहास मान्यता देणारा कायदा संस्थानात संमत..

फेब्रुवारी १९९८ आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा संस्थानात संमत.

१९१९ स्त्रियांना क्रुरपणे वागविण्यास (शारीरिक व मानसिक छळ) प्रतिबंध करणारा कायदा संमत. १९२० : संस्थानात घटस्फोटाचा कायदा संमत केला.

राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या औद्योगिक व कृषी सुधारणा :

१८९५ : शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ स्थापन केली.

सप्टेंबर १९०६ : कोल्हापूर येथे शाहू मिलची स्थापना. (महाराष्ट्र शासनाने २००३ मध्ये शाहू मिल बंद केली. उद्योगांना चालना देताना संस्थानातील गडहिंग्लज व शिरोळ या गावातून जिनिंग फॅक्टरी सुरू केली.

शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी बलभीम को-ऑपरेटीव्ह व अर्बन को-ऑपरेटिव्ह या सहकारी सोसायट्यांची स्थापना. १९०८ मध्ये राजांनी भोगावती नदीवर धरण बांधून तेथे राधानगरी हे गाव वसविले.

धरणाच्या जलाशयाचे नाव : महाराणी लक्ष्मीबाई तलाव.

१९१३ : कोल्हापूर संस्थानात सहकारी संस्थांचा कायदा करून सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.

१९१६ : बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली. राजर्षी शाहू महाराज उपस्थित राहिलेल्या सभा : १९१७ च्या खामगाव मराठा परिषदेचे अध्यक्षपद राजांनी भूषविले.

 १९१८ च्या मुंबई येथील पिपल्स युनियन सभेचे अध्यक्षस्थान राजांनी भूषविले.

२१ एप्रिल १९१९ : उत्तर प्रदेशातील कानपूर येथे भरलेल्या १३ व्या अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय परिषदेचे अध्यक्षपद शाहू राजांनी भूषविले. या सभेत राजांच्या भाषणाने प्रभावित होऊन कानपूरच्या जनतेने त्यांना 'राजर्षी' ही पदवी दिली.

२२ मार्च १९२० : कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथील दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन  संपन्न झाले.

राजर्षी शाहू महाराजांची प्रसिद्ध वचने :

 'माझी सर्व प्रजा मराठी तिसरी इयत्ता जरी शिकून तयार झाली असती तरी तिच्या हाती राज्य कारभाराचे हक्क आनंदाने देऊन मी आजच विश्रांती घेतली असती. 

'फासेपारध्यांना माणसासारखे जगू दया."

राजर्षी शाहू महाराजांबद्दलचे गौरवोद्गार (उपाध्या) : 

माणसातील राजा आणि राजातील माणसू. 

• 'लोकांचा राजा. (लोकराजा) जून १९०२ मध्ये केंब्रिज विद्यापीठाने शाहू महाराजांना एल. एल. डी. (L.L.D.) ही पदवी दिली.

 ‘सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष' या शब्दात महर्षि वि. रा. शिंदे यांनी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव केला. "He was a king but a Democratic king" या शब्दात भाई माधवराव बागल यांनी राजांच्या कार्याचा गौरव केला.

राहूल सोलापूरकर यांनी 'राजर्षी शाहू महाराज' या दूरदर्शन मालिकेत राजांची भूमिका साकारली आहे. राजर्षी शाहू महाराजांचे अनुयायी : केशवराव ठाकरे, भास्करराव जाधव, केशव विचारे, दिनमित्रकार मुकुंदराव थिऑसॉफिकल सोसायटीच्या विचारांचा राजांवर पगडा होता.

महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचा महाराजांवर विशेष प्रभाव होता.

 अन्य सुधारणा कार्ये :

कोल्हापूर येथे ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी 'श्री शिवाजी वैदिक स्कूल ची स्थापना.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'मुकनायक' व आगरकरांच्या 'सुधारक' या वृत्तपत्रांना राजांनी आर्थिक सहाय्य केले,

 लोकसंघ या मुंबई येथील कामगार संघटनेस सहाय्य केले. व्हॅलेटीन चिरोलच्या 'Unrest In India' या ग्रंथाचे मराठीत भाषांतर राजांनी रा. र. डोंगरे यांच्याकडून करवून घेतले.

पन्हाळा येथे चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडीचे प्रयोग केले. • 'साठमारी' हा हत्तींचा खेळ कोल्हापुरात सुरू केला.

• कोल्हापुरात छत्रपती मेळाव्याची स्थापना केली. • १८९५ मोतीबाग तालमीची स्थापना.

२१ एप्रिल १८९१ : लॉर्ड हॅरिस यांच्या उपस्थितीत कोल्हापूर ते मिरज रेल्वे शुभारंभ.

१९१२ रोमच्या आखाड्याच्या धर्तीवर खासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना. कोल्हापूर ही 'मल्लविद्येची पंढरी.

राजर्षी शाहू महाराजांनी महिलांसाठी केलेल्या सुधारणा : 

जुलै १९१७ पुनर्विवाह व विधवा विवाहास मान्यता देणारा कायदा संस्थानात संमत.

फेब्रुवारी १९९८ : आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा संस्थानात संमत..

१९१९ स्त्रियांना क्रुरपणे वागविण्यास (शारीरिक व मानसिक छळ) प्रतिबंध करणारा कायदा संमत. १९२० : संस्थानात घटस्फोटाचा कायदा संमत केला.

१९२० : जोगिणी व देवदासी प्रथा प्रतिबंधक कायदा संमत.















Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad