छत्रपती राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी | Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj Nibandh Marathi
नमस्कार विद्यार्थी ,शिक्षक मित्रांनो आज आपण समतेची शिकवण देणारे, जातीव्यवस्थेविरुद्ध लढा उभारून समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही लोकशाही मूल्य रुजविणाऱ्या सर्वांसाठी समान कायदा लागू करणारे युगपुरुष लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या विषयी निबंध लेखन अगदी सहज आणि सोप्या शब्दांत कसे करायचे ते पाहाणार आहोत .
छत्रपती राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी |
छत्रपती राजर्षी शाहू महाराज (toc)
निबंध लेखन - Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj
महाराष्ट्राने देशाला अनेक थोर समाज सुधारक दिले, त्यापैकी समतेची शिकवण देणारे, जातीव्यवस्थेविरुद्ध लढा उभारून समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही लोकशाही मूल्य रुजविणाऱ्या आपल्या पदाची वाहवा न करता सर्वांसाठी समान कायदा लागू करणारे युगपुरुष लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याजयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा .शुभेच्छा देताना शैलेंश हिंदळेकर यांच्या ओळीं आठवतात .
माणसांच्या ओळखीचा, माणसांचा राजा !
माणसात माणुसकी, मानणारा राजा !! |
राजा म्हणावं की तुला, माय बाप म्हणू!
माया दिली पोटातल्या, पोरावानी जणू !!
एकदाच देवदूत, धाडला देवानी !
पुन्हा नाही राजा असा, पाहिलाच कुणी !!
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे चरित्र
राजर्षी श्री शाहू छत्रपती महाराजांचे चरित्र म्हणजे विविध रंगांच्या छटांनी मनोहर बनलेले जसे काय इंद्रधनुष्यच होते. राजर्षी श्री शाहू हे शिवभक्त होते, क्रांतिकारक होते, धर्म सुधारक होते, सत्यशोधक समाजाला त्यांनी उदार आश्रय दिला, हिंदू धर्मात शुद्धीकरणाची मोहीम आणली, थिऑसॉफीच्या आध्यात्मिक मार्गाकडेही त्यांचे दुर्लक्ष झाले नाही. तथापि त्यांचा पिंड होता प्रजेचे पुत्रवत पालन करणाऱ्या राजाचा. हा राजा नुसता राजा नव्हता. कर्ता समाजसुधारक होता. दूरदृष्टीने त्यांनी सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या कार्याला गती दिली ती दीन दुबळी जनता सबल व्हावी, सुखी व्हावी आणि राज्य चालविण्यास पात्र व्हावी म्हणूनच! राजा असूनही प्रजेच्या हाती सत्ता देऊन राजसंन्यास घेण्याचे ध्येय दृष्टीसमोर ठेवून शिवछत्रपतींच्या गादीवर विराजमान झालेल्या या राजाचे साऱ्या महाराष्ट्राने
“करवीर क्षेत्री राजकीय कपिलाषष्ठीचा योग"
म्हणून स्वागत केले.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज विचार
विचार व आचार यांच्यात जास्तीत जास्त अद्वैत असते, असे थोर पुरुषदेखील फारच थोडे आढळतात. राजर्षी शाहू महाराजांचे कार्य त्यांच्या संस्थानात व बाहेर सर्व मराठी मुलुखात झाले. आचारसरणीच्या माठाची विचारसरणी आपण नेहमी पाहतो. राजर्षी शाहू महाराजांची विचारसरणी व कार्य ही दोन्ही मूर्तिमंतपणे एकस्वरूपी दिसते. असा जो कोणी असेल तर त्याची
"पाऊले वंदावीत ।" एवढेच म्हणून, तुकोबा थांबले नाहीत; तर 'अंगे झाडील अंगण त्याचे दास्यत्व करीन ॥'
एथपर्यंत दूर अशी तुकोबांनी मजल नेली. माझ्यासारख्या सर्वसामान्याला राजर्षीचे कार्य व उक्ती यांचा समास, संयोग आणि समन्वय पाहून, संतोष तर होतोच, पण ही वाटणारी धन्यता, प्रसृत करण्याचा, जो हा योग आला आहे; त्यामुळेही राजर्षीींची तत्त्वसेवा केल्याची संधी प्राप्त होते.
राजर्षी शाहू महाराज संपूर्ण माहिती
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना वंदन
लोकराजा शाहू तुम्हा वंदितो मी,
तुमच्या विचारांनी पावन झाली महाराष्ट्र भूमी ॥धृ॥
रयतेचे राज्य केले तुम्ही साकार,
रयतेच्या सुखासाठी कष्ट घेतले अपार,
देह झिजवीला हा रयतेच्याच कामी,
लोकराजा शाहू...
शिक्षण प्रसाराचे कार्य केले महान,
आपल्या कर्तृत्वाचा आम्हा अभिमान,
अमर झालात तुम्ही लोकराजा' नामी, लोकराजा शाहू...
दीनदलितांचे तुम्ही कैवारी,
झिजवूनी काया शिक्षणसेवा केली खरी,
वंदितो आम्ही तुम्हा जन्मोजन्मी,लोकराजा शाहू...
दिनांक २६ जून रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा