धाराशिव वैभवशाली इतिहास|Dharashiv vaibhavshali Itihas Marathi Mahiti
नमस्कार आजच्या लेखामध्ये आपण धाराशिव वैभवशाली इतिहास पाहाणार आहोत. आज औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे धाराशिव जिल्ह्याला प्राचीन असा वैभवशाली इतिहास लाभलेला आहे.
धाराशिव वैभवशाली इतिहास मराठी माहिती |
धाराशिव माहिती (toc)
धाराशिव वैभवशाली इतिहास - मराठी माहिती
औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे धाराशिव जिल्ह्याला प्राचीन असा वैभवशाली इतिहास लाभलेला आहे.याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सातवण काळात या जिल्ह्यात तगर सारखे व्यापारी नगरे उदयाला आलेली होती. तेर सारख्या ठिकाणी सातवाहन राजा पुळुमावी याचे दोन शिलाले व अनेक नाणी आत्तापर्यंत सापडलेले आहेत कोकणातील शिलाहार राजे स्वतःला तगरपूरचे आम्ही रहिवासी आहोत असे सांगतात तर याच धाराशिव जिल्ह्यात आफ्रिका रूम तसेच अनेक देशातील लोक राहत होते याचे पुरावे सापडलेले आहेत तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द या ठिकाणी रोमन आडनाव असलेली मराठी कुटुंबे आजही त्या ठिकाणी राहत आहेत असे इतिहास व पुरातत्त्व अभ्यासक खोचरे यांनी याबाबत माहिती दिली आहे
शिवलिंग व गणपतीचे शिल्प - Dharashiv vaibhavshali Itihas
तेर धाराशिवकर असणारी असणारे अनेक कुटुंबे या जिल्ह्यात आहेत ग्रामीण भागातील जुन्या लोकांकडून आजही धाराशिव हाच उल्लेख करताना दिसतात धाराशिव शहराजवळ राष्ट्रकूट काळात चमार लेणी खोदल्या गेल्या या लेणी मध्ये भव्य असे शिवलिंग व गणपतीचे शिल्प पाहायला मिळते हे शिवलिंग हे धाराशिव जिल्ह्यातील सर्वात जुने असे शिवलिंग असून याच शिवलिंग आवरून या ठिकाणी असलेल्या गावाचे नाव धाराशिव असे पडले आहे त्याचबरोबर शहराच्या पश्चिमेला सहाव्या शतकात खोदल्या गेलेल्या लेणी या धाराशिव लेणी म्हणून प्रसिद्ध आहेत तेरच्या शिव राजाचाही उल्लेख या नावाच्या संदर्भात येताना दिसतो धाराशिव गावाचे ग्रामदेवी हिचे देखील नाव हे श्री धारासूर मर्दिनी हे असून धाराशिव हे या प्राचीन नावाकडे लक्ष देते . ०१ जुलै वेतनवाढ कशी काढावी
धाराशिव इतिहास Dharashiv itihas History
इसवी सन 17 20 छत्रपती शाहू महाराज यांची सनद आजही उस्मानाबाद मधील विजयसिंह राजे यांच्याकडे पाहायला मिळते ही मोकासदारी बदलीची सनद असून त्यात कसबे धाराशिव असे स्पष्ट लिहिलेले आहे .
धाराशिव शहरातील अनेक कुटुंबांकडे खास करून गावाच्या पवार पाटील यांच्याकडे कसबे धाराशिव नाव असलेली अनेक मध्ययुगीन कागदपत्रे उपलब्ध आहेत तसेच मजहर सनद पत्रे वंशावळी आजही आपल्याला पाहायला मिळतात.
1905 उस्मान मीर अली खान हे धाराशिव परिसरात आले त्यांची प्रित्यर्थ धाराशिव उस्मानाबाद हे नामकरण करण्यात आले. उस्मानाबाद हा निजाम चा सरफे खास जिल्हा होता. म्हणजे निजाम उस्मान अली खान यांच्या व्यक्तिगित खर्चाची सोय या जिल्ह्यातील महसुलातून करण्यात येत होती.
निजाम काळात नळदुर्ग हा जिल्हा होता तो बदलून धाराशिव हे जिल्ह्याचे ठिकाण करण्यात आले याचे कारण म्हणजे हा धाराशिव जिल्हा हा ब्रिटिश आमल असलेल्या भागाशी संलग्न होता भविष्यातील धोका लक्षात घेऊन निजाम सरकारने नळदुर्ग ऐवजी धाराशिव जिल्हा केला .
धाराशिव शहरातील जुन्या गावात आज ही मध्ययुगीन काळातील गडी आजही सुस्थितीत मध्ये असून या गडीवर धाराशिव नाव असलेला उल्लेख आहे .
उस्मानाबाद जिल्ह्याचे पूर्वीचे नाव धाराशिव होते हे कोणीही नाकारू शकत नाही नाही याचे सबळ व प्रथम दर्जाचे पुरावे आज उपलब्ध आहेत विशेष म्हणजे आदिलशाही निजामशाही मोगल शाही यांच्या काळातील ऐतिहासिक कागदपत्रातून देखील धारशीव गावाचे उल्लेख आढळून येतात.
उस्मानाबादचे धाराशिव हे सांस्कृतिक नाव
उस्मानाबादचे धाराशिव हे सांस्कृतिक नाव उस्मानाबादचे मूळचे नावच धाराशिव आहे धाराशिव हे नाव 1927 पर्यंत प्रचलित होते उस्मानाबाद शिवाय एदलाबादचे मुक्ताईनगर आंबेजोगाई चे मोमिनाबाद आणि पुन्हा अंबाजोगाई असे नामांतर काँग्रेसच्या काळात झाले आहे तीही हे नावे ऐतिहासिक होती.औरंगाबाद हे मलिक अंबरने वसवलेले शहर आहे . उस्मानाबादचे धाराशिव हे सांस्कृतिक नाव आहे हेच इतिहासाचे अभ्यासक सांगतात.
उस्मानाबाद धाराशिव इतिहास काय सांगतो .
निजामाने मराठवाड्यातील अनेक शहरांची नामांतरण केली होती त्यामध्ये उस्मानाबाद या शहराचाही समावेश आहे उस्मानाबाद चे जुने नाव धाराशिव असंच होतं ग्रामदेवता असलेल्या धारासूर मर्दिनी या देवीच्या नावावरून धाराशिव असलेल चे पुरावे या ठिकाणी मिळतात पण निजामशाही मधील सातवा निजाम उस्मान अली खान याच्या नावावरून धाराशिव शहराचे नाव उस्मानाबाद झाल्याचेही संदर्भ आढळतात नगरपरिषदेच्या सुधारित नगर विकास योजनेच्या प्रकरण एक मध्ये उस्मान अली खान यांनी सन १९९९ साली धाराशिव हे नाव बदलून उस्मानाबाद केले असा उल्लेख आहे