Type Here to Get Search Results !

11 प्रवेश प्रक्रिया 2022 भाग 2 कसा भरावा | Akravi pravesh prakriya bhag 2 kasa bharava

 11 प्रवेश प्रक्रिया 2022 भाग 2 कसा भरावा | Akravi pravesh prakriya bhag 2 kasa bharava 

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक  ०४ /०७/२०२२ ला सर्व विद्यार्थ्यांना मार्क शीटची सत्यप्रत  मिळेल . 11 प्रवेशासाठी   कॉजेल निवड करु शकता. 11 प्रवेश प्रक्रिया 2022 भाग 2 मध्ये कॉलेज निवड कशी करायची , एक विद्यार्थी किती कॉलेज निवडू शकतो या विषयी माहिती पाहाणार आहोत.

11 प्रवेश प्रक्रिया 2022 भाग 2 कसा भरावा


11 प्रवेश प्रक्रिया 2022 (toc)

11 प्रवेश प्रक्रिया 2022 भाग 2 कसा भरावा .

11 प्रवेश प्रक्रिया 2022 प्रवेश भाग 1 कसा भरावा. जर 11 वी प्रवेश भाग 1 भरला नसेल तर कसा भरावा ? 

User id कसा मिळवावा हे पाहण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या . काही क्षणांत तुमचा user id तयार होईल आणि तुम्ही सहज 11 प्रवेश 2022 सहज घरबसल्या घेऊ शकता .11 प्रवेश भाग 1  2022 कसा भरावा.⬇️

https://www.kktutorial.com/2022/06/2022-fyjc-admission-2022-11-th.html

11 प्रवेश प्रक्रिया 2022 भाग भरणे

१) 11 प्रवेश साठी   प्रथम log in करा. जो log in id

तुम्हाला भेट असेल त्या द्वारे .

२) प्रवेश भाग 1  verify झाला असेल तर च प्रवेश भाग 2 

सुरू होईल .

३) या मध्ये बेस्ट 5 विषयांचे गुण पकडले जातील .त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील.

४) ज्या मुलांचे मार्क दिसत नसतील तर त्यांनी स्वतः भरले तरी चालतील.

माध्यम शाखा निवड 11 प्रवेश प्रक्रिया 2022 भाग 2 साठी

१) माध्यम व शाखा निवड करा. या मध्ये आर्ट्स Arts,वाणिज्य Commerce  ,विज्ञान Science या शाखा निवडता येतील.

२) शाखा निवड झाली की विद्यालय निवड करायची असते.

३) विद्यालय साठी क्रमांक निवडणे.

विद्यालय पसंती क्रमांक निवड करणे.

१)शाखा निवड झाली की विद्यालय निवड करायची असते.

२) विद्यालय साठी क्रमांक निवडणे.

३) पसंती क्रमांक १ ते १० देणे.

 ४) पसंतीक्रम निश्चित करताना त्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे मागील कट ऑफ, आपणास मिळालेले गुण, हवी असलेली शाखा, फी, माध्यम, अनुदान प्रकार, शिकविले जाणारे वैकल्पिक विषय, निवासापासूनचे अंतर, जाण्यायेण्याची सोय, वसतिगृह सुविधा, क्रीडांगण, इ. बाबींचा साकल्याने विचार करून पसंतीक्रम ठरवा.

५) विद्यार्थ्यास प्रवेशासाठी त्याच्या पसंतीनुसार किमान एक व कमाल दहा उच्च माध्यमिक विद्यालयांचे

६) पसंतीक्रम देता येतील. प्रथम पसंतीक्रम मिळाल्यास प्रवेश घेणे सक्तीचे असेल. (नियमित फेन्यांमध्ये)

७)पसंतीक्रम ठरविण्यासाठी अगोदर शाखा व माध्यम निश्चित करा व त्यानंतर येणाऱ्या यादीतील आपणास योग्य वाटत असणाऱ्या उच्च माध्यमिक विद्यालयांची यादी करा व त्यामधील सर्वात योग्य पसंतीचे उच्च माध्यमिक विद्यालय

८)प्रथम घेऊन त्याप्रमाणे क्रम काळजीपूर्वक ठरवा व नंतरच ऑनलाईन पसंतीक्रम नोंदवा.

९) ज्या विद्यालयात आपणास प्रवेश घ्यावयाचा नाही अशा उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंतीक्रमामध्ये समावेश करू नका.

१०) प्रत्येक फेरीला पसंतीक्रम बदलण्याची मुभा असल्यामुळे प्रत्येक फेरी स्वतंत्र असणार आहे. पसंतीक्रम ठरविताना मागील फेरीचे Cut Off तपासा.

११) यासाठी वेब पोर्टलवरील Know your Eligibility या सुविधेचा वापर करा.

१२) सर्व दहा पसंतीक्रम भरलेच पाहिजेत असे नाही. तसे शक्य नसल्यास दहापेक्षा कमी पसंतीक्रम दिले तरी चालतील.
एकाच उच्च माध्यमिक विद्यालयातील शाखा, अनुदान प्रकार माध्यम विचारात घेऊन त्याला स्वतंत्र सांकेतांक (Code) दिलेले आहेत. त्यामुळे एकाच विद्यालयाला शाखा, अनुदान प्रकार, माध्यम यानुसार एकापेक्षा अधिक कोड असू शकतात त्यामुळे विद्यालय/ शाखा कोड निवडताना दक्षता घ्या.








 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad