Type Here to Get Search Results !

अकरावी प्रवेश भाग 2 .2022 सुरू | Akravi pravesh Bhag 2 .2022 suru

 अकरावी प्रवेश भाग 2 2022  सुरू Akravi pravesh Bhag 2 2022   सुरू 

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्याची  आतुरतेने वाट पाहत होते ते म्हणजे अकरावी प्रवेश भाग 2 भरणे सुरु झाले आहे. त्या विषयी आज आपण माहिती पाहाणार आहोत.

अकरावी प्रवेश भाग 2 2022 भरणे सुरू 


अकरावी प्रवेश भाग 2 2022  सुरू 

सन २०२२-२३ मधी इ. ११वी प्रवेशाबाबत पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

ज्या क्षेत्रामध्ये इ.११वी चे प्रवेश विद्यालय स्तरावरून online केले जातात त्या ग्रामीण भागातील (भौतिक सुविधांची पडताळणी करुन प्रवेश क्षमता निश्चित करणेची कार्यवाही पूर्ण झालेल्या) कनिष्ठ महाविद्यालयातील इ. ११ वी प्रवेश प्रक्रिया सुरु करावी.

ज्या क्षेत्रामध्ये इ.११वी प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने केले जातात सदर ठिकाणची इ.११वी प्रवेश एसई मंडळाच्या इ.१०वी निकालानंतर सुरु करण्यात येईल, तोपर्यंत भौतिक सुविधांची पडताळणी करून प्रवेश क्षमता निश्चित करणीची कार्यवाही पूर्ण करावो केंद्रीय ऑनलाईन प्रवेश क्षेत्रातील इ.११वी प्रवेशाबाबत पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. 
मुंबई महानगरक्षेत्र (MMR), पुणे, पिंपरी चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील १२वी ये प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असल्याने या शहरामध्ये राबविण्यात येणाऱ्या इ.१२वी प्रवेश प्रक्रियेसाठी


या पोर्टलच्या माध्यमातून प्रवेश अर्जाचा भाग-१   अकरावी प्रवेश भाग 1
भरण्याची कार्यवाही सुरु आहे. ती पापुढेही सुरु

राहील, राज्यमंडळ इ.१०वी परीक्षेचा निकाल जाहीर झालेल्या असल्याने बहुतांश विद्यार्थी अर्जाचा भाग-२ भरण्याची व प्रवेशाच्या फेऱ्या सुरु होत आहेत.. 
11 ऑनलाईन प्रवेश अर्जाचा भाग पूर्ण केले आहे.
 पसंतीक्रम देणे अर्थात अर्जाचा  भाग-२ Option Form भरण्याची कार्यवाही सुरु करण्यात येत आहे. 
यामध्ये विद्याथ्यांना इ.११वी प्रवेशासाठी आपल्या सं विद्यालये निवडून त्यांचे पसंतीक्रम / Preferences ऑनलाईन नोंदविता येतील .
या कोट्या अंतर्गत प्रवेश  विद्यालयांमध्ये ऑनलाईन  Apply करता येईल. याद्वारे केवळ पसंती नोदवणे सुरू   आहे .

Akravi pravesh Bhag 2 2022  suru


11 प्रवेश प्रक्रिया 2022 भाग भरणे

१) 11 प्रवेश साठी   प्रथम log in करा. जो log in id

तुम्हाला भेट असेल त्या द्वारे .

२) प्रवेश भाग 1  verify झाला असेल तर च प्रवेश भाग 2 

सुरू होईल .

३) या मध्ये बेस्ट 5 विषयांचे गुण पकडले जातील .त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील.

४) ज्या मुलांचे मार्क दिसत नसतील तर त्यांनी स्वतः भरले तरी चालतील.

माध्यम शाखा निवड 11 प्रवेश प्रक्रिया 2022 भाग 2 साठी

१) माध्यम व शाखा निवड करा. या मध्ये आर्ट्स Arts,वाणिज्य Commerce  ,विज्ञान Science या शाखा निवडता येतील.

२) शाखा निवड झाली की विद्यालय निवड करायची असते.

३) विद्यालय साठी क्रमांक निवडणे.


विद्यालय पसंती क्रमांक निवड करणे.

१)शाखा निवड झाली की विद्यालय निवड करायची असते.

२) विद्यालय साठी क्रमांक निवडणे.

३) पसंती क्रमांक १ ते १० देणे.

 ४) पसंतीक्रम निश्चित करताना त्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे मागील कट ऑफ, आपणास मिळालेले गुण, हवी असलेली शाखा, फी, माध्यम, अनुदान प्रकार, शिकविले जाणारे वैकल्पिक विषय, निवासापासूनचे अंतर, जाण्यायेण्याची सोय, वसतिगृह सुविधा, क्रीडांगण, इ. बाबींचा साकल्याने विचार करून पसंतीक्रम ठरवा.

५) विद्यार्थ्यास प्रवेशासाठी त्याच्या पसंतीनुसार किमान एक व कमाल दहा उच्च माध्यमिक विद्यालयांचे

६) पसंतीक्रम देता येतील. प्रथम पसंतीक्रम मिळाल्यास प्रवेश घेणे सक्तीचे असेल. (नियमित फेन्यांमध्ये)

७)पसंतीक्रम ठरविण्यासाठी अगोदर शाखा व माध्यम निश्चित करा व त्यानंतर येणाऱ्या यादीतील आपणास योग्य वाटत असणाऱ्या उच्च माध्यमिक विद्यालयांची यादी करा व त्यामधील सर्वात योग्य पसंतीचे उच्च माध्यमिक विद्यालय

८)प्रथम घेऊन त्याप्रमाणे क्रम काळजीपूर्वक ठरवा व नंतरच ऑनलाईन पसंतीक्रम नोंदवा.

९) ज्या विद्यालयात आपणास प्रवेश घ्यावयाचा नाही अशा उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंतीक्रमामध्ये समावेश करू नका.

१०) प्रत्येक फेरीला पसंतीक्रम बदलण्याची मुभा असल्यामुळे प्रत्येक फेरी स्वतंत्र असणार आहे. पसंतीक्रम ठरविताना मागील फेरीचे Cut Off तपासा.

११) यासाठी वेब पोर्टलवरील Know your Eligibility या सुविधेचा वापर करा.

१२) सर्व दहा पसंतीक्रम भरलेच पाहिजेत असे नाही. तसे शक्य नसल्यास दहापेक्षा कमी पसंतीक्रम दिले तरी चालतील.
एकाच उच्च माध्यमिक विद्यालयातील शाखा, अनुदान प्रकार माध्यम विचारात घेऊन त्याला स्वतंत्र सांकेतांक (Code) दिलेले आहेत. त्यामुळे एकाच विद्यालयाला शाखा, अनुदान प्रकार, माध्यम यानुसार एकापेक्षा अधिक कोड असू शकतात त्यामुळे विद्यालय/ शाखा कोड निवडताना दक्षता घ्या.

प्रत्यक्ष प्रवेशासाठीचे सीबीएसई निकालानंतर जाहीर करण्यात येईल.
 प्रवेश फेरी पूर्वीचे कार्यवाहीचा तपशील संलग्न आहे.
चालू वर्षी केंद्रीय प्रवेश (CAP Seats)  माग-२ मध्ये पसंतीक्रम देण्यासोबतच कोटांतर्गत जागांवरील (Quota Seats) प्रवेशासाठी ऑनलाईन Apply करावा.आलेली आहे.

ऑनलाईन Apply केलेल्या विद्यार्थ्यांची यादी  व त्यानुसार गुणवत्तेनुसार कोटा प्रवेश देणे विद्यालयांना सुलभ होईल. सध्या केवळ Apply करता येईल, प्रत्यक्ष प्रवेश कार्यवाहीसाठी वेळ नंतर देण्यात येईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad