Type Here to Get Search Results !

आषाढी एकादशी वारी 2022 मराठी माहिती | Ashadhi Ekadashi wari 2022 Marathi Mahiti

 आषाढी एकादशी वारी 2022 मराठी माहिती | Ashadhi Ekadashi wari 2022 Marathi Mahiti

नमस्कार  आजच्या लेखामध्ये आपण पंढरीचीवारी म्हणजेच आषाढी एकादशी वारी विषयी माहिती पाहाणार आहोत गेली दीड दोन वर्ष्या पासून को रो ना महामारी मुळे  वारी झाली नाही हे आपण जाणता , पण या वर्षी आषाढी वारी होणार असे एकले अन सर्व वारकरी मंडळींचा व भक्तांचा आनंद गगनात मावेनासा झाले आणि तोंडून शब्द आले .

भेटीलागीं जीवा लागलीसे आस ।
 पाहे रात्रंदिवस वाट तुझी ।।
बोला 
 पुंडलिकावरदा श्री हरीविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ।।
आषाढी वारी (toc)
आषाढी एकादशी वारी 2022 मराठी माहिती


आषाढी एकादशी वारी 2022 मराठी माहिती

पंढरीचा महिमा। देतां आणिक उपमा।।

ऐसा ठाव नाही कोठे। देव उभा उभी भेटे।।

आहेती सकळ। तीर्थें काळे देती फळ।

तुका म्हणे पेठ। भूमिवरी हे वैकुंठ।।

आपल्या माऊलीला भेटायला मिळणार , टाळ मृदंगाच्या साथी ने नाचता येणार , भजन कीर्तन करता येणार ,फुगडी खेळता येणार  आणि  माझ्या पंढरीच्या राजाला माऊलीला  भेटता येणार.
“विठ्ठ्ल विठ्ठ्ल गजरी.....अवघी दुमदुमली पंढरी....
माऊली माऊली’ असा घोष करणार्‍या त्या वारकर्‍यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू जमले.

आषाढी वारी - आषाढी वारी म्हणजे काय ?

आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय .

आषाढी वारीची सुरुवात कधी पासून झाली ?

आचारधर्म असलेल्या वारीच्या सामुदायिक वाटचालीला खरं तर १६८५ पासून प्रारंभ झाला.वास्तविक, पालखी सोहळ्याची संकल्पना ही संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांची होय. संत तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन झाल्यानंतर त्यांचे सहकारी अतिशय उदास होते. त्यांचे मन भजनात रमत नव्हते. त्यामुळे वारीमध्ये खंड पडण्याची भीती होती. ही अडचण नारायण महाराजांनी जाणली. त्यांना एक कल्पना सुचली. पालखी तयार करून त्यात तुकोबारायांच्या पादुका घेऊन ते आळंदीला गेले. तिथे त्याच पालखीत माऊलींच्या पादुका ठेवल्या. त्यानंतर 'ज्ञानोबा-तुकाराम' चा जयघोष करीत ते चौदा टाळकऱ्याांसमवेत पंढरीची वाटचाल करू लागले.


पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणिक न करी तीर्थव्रते या वचनाप्रमाणे आषाढी वारीची परंपरा जोपासणारा वारकरी संप्रदाय महाराष्ट्र मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे .
मुखात विठ्ठलाचे नाव, मनात भक्तीचा भाव, अन् देवा मला पाव असे म्हणत त्यांची पंढरीच्या दिशेने चाल आजही कायम आहे. चिंब पावसात धामिर्क विचारांची पेरणी करीत अवघे वैष्णवजन आनंदाने, नाचत पंढरीला जातात. कोणी श्रद्धा म्हणो किंवा अंधश्रद्धा परंतु, वारी आमच्या हक्काची अशी भावना बाळगत सव्वातीनशेहून अधिक वर्षांपासून हा सोहळा अविरत पणे चालू आहे.

आषाढी वारी ॲप

या वर्षी आषाढी वारी साठी ॲप बनवले आहे . हे ॲप Download करण्यासाठी खालील लिंक ओपन करा.⬇️

वारी -

एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय.

वारी म्हणजे काय ?

वारी म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी मंडळी  विविध गावातून टाळ मृदंगाच्या साथीने माऊलीचा जय घोष करत दिंडी बरोबर  पायी चालत   पंढरपूर येथे माऊलीच्या दर्शनासाठी जातात  माऊलीचे दर्शन घेतात व पुन्हा माऊलीचा जय घोष करत माघारी येतात त्यास वारी असे म्हणतात.ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते.  
आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून की पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते.

वारकरी कोणास म्हणावे ?

वारी करणाऱ्या  व्यक्तीस  वारकरी असे म्हंटले जाते.

वारकरी - जयघोष वाक्य

वारकरी मंडळी किर्तन आणि पालखीच्या सोहळ्यामध्ये विठ्ठल माऊलीचा  जयघोष करत असतात . जयघोष करताना प्रत्येक च्या मुखी
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय हे  जयघोष वाक्य असते .वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना 
“पुंडलिक वरदा हरी विठ्ठल
 श्री ज्ञानदेव तुकाराम | 
पंढरीनाथ महाराज की जय”! 
असा जयघोष केला जातो.

“पंढरीनाथ भगवान की जय" अनेक ठिकाणी
“माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय"
“जगद्गुरु तुकाराम महाराज की जय" “शांतिब्रह्म  एकनाथ महाराज की जय”
असा जय घोष दिला जातो.

दिंडी

वारीला जाण्यासाठी संपूर्ण भारतामधून वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात .वारीला जाणाऱ्या भक्तांसाठी दिंडी ही एक संकल्पना  आहे .पालखीबरोबर मानाचा अश्व, अब्दागि-या, ध्वज, दंड ही मानाची बिरुदे मिरविली जातात. गावोगावी येणा-या दिंडयांचे त्या त्या गावातील सरपंच आणि प्रतिष्ठित नागरिकांकडून भव्य स्वागत होते. नारळ, हार, फेटा, पागोटे, शाल इत्यादी वस्तू त्यात्या दिंडीच्या वीणेक-यांना देऊन त्यांचा मान राखला जातो.

दिंडी चे नियोजन कसे केले जाते ?

प्रत्येक दिंडीला एक प्रमुख असतो .
दिंडी मध्ये वारकरी महिला आपल्या डोक्यावर तुळस घेतात , वारकरी पुरुष व मागील  टाळ ,मृदुंग , वीणा हाती घेतात आणि पालखी
 बरोबर माऊलीच्या जयघोषात पंढरीच्या दिशेने येत  असतात.
दिंडीतील प्रत्येक वारकरी मंडळी ची राहण्याची , जेवण्याची , औषधांची जबाबदारी ही दिंडी ची असते.
प्रत्येक दिंडीला एक प्रमुख असतो.

पालखी रथ

आळंदीच्या मंदिराचा कळस हलला की आळंदीहून पालखी निघायची असा संकेत आहे. देवळाचा कळस खरोखर हलतो अशी भाविकांची श्रध्दा आहे. षोडषोपचार पूजा होऊन पालखी निघते ति प्रथम ज्ञानेश्वर महाराजांच्या मामांच्या गावी आपेगाव येथे जाते व नंतर गांधीवाडा येथे (आळंदीजवळच) जाते. पुढे काही दिंडया, मध्यभागी पालखी व मागे काही दिंडया अशी ही रचना असते. देहूहूनही अशाच पध्दतीने पालखी निघते. ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या पालख्यांचा पंढरपूरला पायी चालत जाण्याचा मार्ग भिन्नभिन्न आहे. परंतु पुण्यात मात्र या दोन्ही पालख्या एकाच दिवशी येतात आणि पुणे शहरही विठूनामाच्या गजराने दुमदुमून निघते. ज्ञानेश्वरांच्या पालखीचा मुक्काम पुण्यातील भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरत तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतील निवडूंगा विठ्ठल मंदिरात असतो. त्या मुक्कामानंतर मात्र ज्ञानेश्वरांची पालखी सासवड मार्गे तर तुकारामांची पालखी मुंढवामार्गे आगेकूच करते.

 खिल्लारी बैल जोडी -  पालखी रथ पंढरपूर ला घेऊन जाण्यासाठी

संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ यांची पालखी म्हणजे  पंढरपूरला घेऊन जाण्याचे काम महाराष्ट्रातील खिल्लारी बैलाकडे असते ही खिल्लारी बैल जोडी आपल्या आपल्या खांद्यावर हा रथ ओढत पंढरपूर पर्यंत घेऊन जातात. या पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील सुंदर दिपवाड अशा किल्लारी या गोवंशाची निवड केली जाते या बैलांचे देखरेखी साठी कमिटी देखील असते ही कमिटी बैलजोडी यांची निवड करणे आणि त्यांच्या सर्व गोष्टीकडे लक्ष देणे ही त्यांची जबाबदारी असते या संपूर्ण रथसोळ्यामध्ये त्यांच्यासोबत डॉक्टरांची एक टीम ही असते जेणेकरून बैलांना काही त्रास झाला तर लगेच वैद्यकीय मदत करता येईल. ज्या ठिकाणी मुक्काम असतो त्या ठिकाणी बैलांची आरोग्य तपासणी केली जाते. जसे की बैलांच्या पायांची पत्रे खराब झाली तर ते लगेच बदलतात.

रिंगण सोहळा

नाम तुकोबाचे घेता ,
डोळे पताका डोलात ,
अश्व धावता रिंगणी ,
नाचे विठू काळजात ..
सकाळी लवकर उठून  स्नान करून वारकरी मंडळी अभंग  म्हणत म्हणत चालू लागायचं मध्यानीला म्हणजे दुपारीला पोट पूजा करून रस्त्याच्या बाजूला वृक्षांखाली थोडी विश्रांती घ्यायची व पुन्हा चालणे सुरू करायचे अंधार पडला की जवळपासच्या गावी किंवा एखाद्या वस्तीवर मुक्काम करायचा असे वारकऱ्यांच्या प्रवासाचे स्वरूप असते काही काळानंतर त्याला एक स्वरूपपणा येतो तो एकसुरपणा घालवण्यासाठी आणि मनोरंजनासाठी वाखरी येते  'रिंगण' नावाचा एक अत्यंत महत्त्वाचा सोहळा पालखी बरोबर पार पाडला जातो. एखाद्या मोकळ्या मैदानाच्या जागी भक्तगण गोळा होतात आणि उभे किंवा वर्तुळाकार रिंगण तयार केले जाते.
पालखी ध्वज हे मध्यभागी ठेवून भक्तगण त्या भोवती वर्तुळाकार्यात उभे राहतात किंवा दोन समांतर ओळीत उभे राहतात रिंगणात रांगोळीच्या पायघड्या घातलेल्या असतात मानाचे दोन अश्व हे प्रशिक्षित असतात
एका अश्वावर कुणीच बसलेले नसते त्या आश्वाला माऊलीचा अश्व असे म्हणतात दुसरा अश्वावर एक कानडी घोडेस्वार बसलेला असतो माऊलीचा अश्व सुमारे एक किमी वरून पळत येऊन रथात असलेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालकांना मान टेकून नमस्कार करतो स्वतःला प्रतीक्षणा घालतो आणि सोप दाराने आदेश दिला की पुन्हा पळत जातो हा क्षण पाहण्यासाठी लाखो वारकरी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतात. ठराविक वेळेत हे अश्व गोल गोल रिंगणात फेऱ्या घालते आणि समांतर उभ्या असलेल्या वारकऱ्यांमधून एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे धावतात अश्वाला स्पर्श करण्यासाठी वारकरी असूसलेले असतात मानाच्या अश्वाची रिंगण झाली की वारकरीत्या रिंगणात उतरून झिम्मा फुगडी विविध प्रकारच्या उड्या लेझीम भारुडे असे सामुदायिक खेळ खेळतात खेळात भाग न घेतलेले वारकरी बाहेरच्या गोलात उभा राहून या मनोरंजनाचा आनंद घेत असतात.
पालखीचा मुक्काम ज्या गावोगावी असतो अशा ठिकाणी रिंगणे पाहायला मिळतात.
भगव्या रंगाचे झेंडे आषाढीच्या मेघा छातीत सावळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर फार उटवदार दिसतात भडक गुलाबी किंवा केशरी रंगाची पागोटी आणि हिरव्या जांभळ्या किंवा लाल रंगाची लुगडी नेसलेल्या स्त्रिया पावसाळी हवेतील जरासा अंधारलेला वातावरणात रंगत आणतात जमिनीवर पाणी पिऊन हिरवी लव रोगाला लागलेली असते अबीर बुक्क्याची उधळण चालू असते टाळ चिपळ्या मृदुंग हरिनामाचा घोष सामुदायिक अभंग बटन या नादांची मेघांच्या गर्जनाची स्पर्धा चालू असते पावसाच्या सरी कधी कधी सुकन अशा पावसाच्या सरीने वारकरी चिंब ओले होतात पण या पावसामध्ये माऊलींच्या नामामध्ये दंग झालेल्या भक्तांना पावसाच्या सरी फुलांसारख्या वाटू लागतात. रंग गंध नाद आणि भाविकतेने प्रभारीत झालेले वातावरण असा या पालकांचा सोहळा पाहून जर एखादा मराठी माणूस आतून हल्ला नाही तर खुशाल त्याच्या मराठीपणाविषयी शंका घ्यावी असे वाटते!


पांडुरंग दर्शन आणि मनाला विसावा -


पायी पायी करत साधारणतः 16 ते 17 दिवस चालत प्रत्येक रात्रीचा गावोगावी मुक्काम करीत श्रीनाथ श्रीहरी विठ्ठलाच्या नामात मग्न होऊन भजन कीर्तनात रममान होऊन दोन्ही पालख्यांचे सर्व वारकरी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूरच्या अलीकडील वाखरी या गावी एकत्र होतात आणि एकादशीच्या दिवशी सर्व भक्तजन पंढरपुरात झुंबड उडवतात एकादशीच्या दिवशी वारकरीच नव्हे तर बहुतेक सर्व महाराष्ट्रातील लोक उपवास पकडतात .
या दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपल्या वारीचे सार्थक आणि पुण्य पदरात पडल्याचे सर्व वारकरी मंडळींना समाधान मिळते.

विठ्ठल रुक्माई ची पूजा करणार ?

दरवर्षी विठ्ठल रुक्माई ची पूजा करण्याचा मान हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना असतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते विठ्ठल रुक्माई ची महापूजा होते आणि विठ्ठलाच्या आरतीने पूजेची सांगता होते या आरतीत एकादशीच्या सोहळ्याचे अत्यंत सुंदर वर्णन केलेले आहे दिवसभर हा परिसर भजन कीर्तन आणि दुमदुमून निघतो चंद्रभागेचे वाळवंट भक्तांनी फुलून  येते.
“आधी संसार सुफळ झाला गे माय
देखीयले पाय विठोबाचे सो मज व्हावा ,
तो मन व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंगा "

असे म्हणत सर्व वारकरी कृतकृत्य होतात पुढच्या वर्षीच्या आषाढी एकादशीचे स्वप्न पाहतात आणि पुन्हा आपल्या संसाराकडे वळतात.

आषाढीवारी  वेकपत्रक २०२२


विठू रुक्माई ची आरती


वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा चरणीं वाहे भीमा उध्दरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा, राहीच्या वल्लभा पावे जिवलगा, जय देव जय देव || १ ||

तुळसी माळा गळां कर ठेवुनि कटी कासे पीतांबर कस्तुरि लल्लाटी देव सुरवर नित्य येती भेटी गरूड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा, राहीच्या वल्लभा पावे जिवलगा,जय देव जय देव|| २ ||

धन्य वेणूनाद अनुक्षेत्रफळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राहीरखुमाबाई राणी या सकळा ओवाळती राजा विठोबा सावळा जय देव जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा, राहीच्या वल्लभा पावे जिवलगा, जय देव जय देव || ३ ||
ओवाळू आरत्या कुर्वंडया येती चंद्रभागेमाजी सोडुनिया देती दिंडया पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा वर्णावा किती जय देव जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा, राहीच्या वल्लभा पावे जिवलगा, जय देव जय देव || ४ ||

आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागेमाजी स्नान जे करिती दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती

केशवासी नामदेव माधवासी नामदेव

भावे ओवाळीती

जय देव जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा, राहीच्या वल्लभा पावे जिवलगा, जय देव जय देव || ५||
“पुंडलिक वरदा हरी विठ्ठल
 श्री ज्ञानदेव तुकाराम | 
पंढरीनाथ महाराज की जय”! 
असा जयघोष केला जातो.






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad