गुरुपौर्णिमा भाषण मराठी 2022 Gurupournima Bhashan Marathi 2022L
नमस्कार मित्रांनो आज हा शुभ दिवस आपणा सर्वाकरीता अत्यंत महत्वाचा आहे. कारण ज्यांनी आपणांस जीवनभर अगदी भरभरून दिले जीवनाला एक दिशा आणि ध्येय दिले. जिवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन दिला. आणि आजपर्यंत जे आपणास अशा अमुल्य गोष्टी देत आले आहेत आपल्या गुरुवर्याचा आपल्या मार्गदर्शकांना आपल्या जीवनाच्या लोखंडाचे सोने करणा-या परिसाचा, आपल्या जीवनातील दिपस्तंभाचे पुजन करण्याचा आजचा
दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा हा आहे .
गुरुपौर्णिमा भाषण मराठी 2022
आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून ओळखतो अशा शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे म्हणतात ज्यांनी महाभारत लिहिले अशा व्यास मुनींना वंदन करण्याचा व त्यांची पूजा करण्याचा हा दिन आहे.
महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात ज्या ग्रंथात धर्मशास्त्र ,नीतीशास्त्र ,व्यवहारशास्त्र मानसशास्त्र आहे अशा सर्वश्रेष्ठ ग्रंथा त्यांनी लिहिले आहेत.
ज्ञानाचा राजा म्हणून ज्याला मानतात त्या ज्ञानदेवांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना व्यासांचा मागवा घेतो असे म्हणून सुरुवात केली .
Gurupournima Bhashan Marathi 2022
व्यासपौर्णिमेच्या दिवशी 'ओम नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे' अशी प्रार्थना करून त्यांना वंदन केले जाते अशी परंपरा आहे.
गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते .
पौर्णिमा म्हणजे प्रकाश गुरु शिष्याला ज्ञान देतात तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचवावा म्हणून गुरूंची पार्थना किंवा पूजा करावयाची तो हा दिवस आहे गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर जसे जलाशयात पाणी विपुल आहे तसे गुरुकडेही ज्ञान विपुल प्रमाणामध्ये असते गुरु जवळ शिष्यांनी नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही हे सर्वांनी लक्षात ठेवावे .
म्हणून म्हणावे वाटते की
“गुरु बिन ज्ञान कहासे लावू ”
हेच खरे आहे गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञेने भरून येते तेव्हा आपल्या तोंडून शब्द बाहेर पडतात .
“गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु
गुरुर्देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह
तस्मै श्री गुरुवे नमः”