गुरुपौर्णिमा सूत्रसंचालन 2022 |Gurupournima Sutrasanchalan2022
नमस्कार शिक्षक मित्रांनो आज आपले गुरुवर्य यांना वंदन करण्याच दिवस आहे .गुरुवर्य यांना वंदन करून त्यांच्या विषयी बोलण्याचा कार्यक्रम आपण साजरे करतो . या कार्यक्रमासाठी गुरुपौर्णिमा सूत्रसंचालन कसे असावे ते पाहाणार आहोत.
गुरुपौर्णिमा सूत्रसंचालन 2022 |Gurupournima Sutrasanchalan2022 |
गुरुपौर्णिमा सूत्रसंचालन 2022
कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन करीता उपयोगी मराठी कार्यक्रमाचे टप्पे व पायऱ्या -
- स्वागत (शब्दांनी)
- पदावरोहन
- दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन
- स्वागतसोहळा
- प्रास्ताविक
- नियोजित कार्यक्रम / स्थानिक भाषणे
- अतिथींचे मार्गदर्शन
- मुख्य अतिथी / मार्गदर्शक / अध्यक्षीय भाषण
- आभारप्रदर्शन
सूत्रसंचालन सुरुवात - Gurupournima Sutrasanchalan2022
स्वागत :-
नमस्कार आजच्या या पवित्र व शुभ दिनी आजच्या या कार्यक्रमामध्ये सर्व अतिथीगण उपस्थितांचे सर्वाचे मी मनःपूर्वक हार्दिक स्वागत करतो.
'संस्कृतीची रीत अशी की...
सदैव तत्पर आतिथ्याला
कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांनो...
शब्दफुले ही स्वागताला'
हा शुभ दिवस आपणा सर्वाकरीता अत्यंत महत्वाचा आहे. कारण ज्यांनी आपणांस जीवनभर अगदी भरभरून दिले जिवाला एक दिशा आणि ध्येय दिले. जिवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन दिला. आणि आजपर्यंत जे आपणास अशा अमुल्य गोष्टी देत आले आहेत आपल्या गुरुवर्याचा आपल्या मार्गदर्शकांना आपल्या जीवनाच्या लोखंडाचे सोने करणा-या परिसाचा, आपल्या जीवनातील दिपस्तंभाचे पुजन करण्याचा आजचा दिवस.
पदावरोहन :-
म्हणून आजच्या या दिवशी आपल्या जीवनातील दिपस्तंभ मा.श्री. ......... हे गुरुवर्य/शिक्षक/सर या व्यासपीठावर विराजमान झाले आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या 'या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्विकारावे. तसेच आपले पाठीराखे व मार्गदर्शक सन्माननीय श्री. ------- यांनी सुध्दा या व्यासपीठावर आपले स्थान ग्रहण कराये व आम्हास उपकृत करावे . अशी मी त्यां विनंती करतो.
दीपप्रज्वलन व प्रतिमा पुजन :-
दीपप्रज्वलन -
दीप लावूया ज्ञानाचा...प्रकाश पसरेल मानवतेचा
दीप लावूया श्रद्धेचा....प्रकाश पसरेल भक्तीचा
दीप लावूया मांगल्याचा.....प्रकाश पसरेल पावित्र्याचा
दीप लावूया आत्मतेजाचा.....प्रकाश पसरेल साक्षात्काराचा
दीप लावूया सामर्थ्याचा प्रकाश पसरेल विवेकाचा
आपल्या संस्कृतीमध्ये कोणत्याही कामाची किंवा कार्यक्रमाची सुरुवात ही पुजनाने करतो की जेणेकरून देवदेवतांचे आशिर्वाद व त्यांची उपस्थितीही आपल्या कार्यक्रमास लाभेल. तर आपले पुज्यनीय गुरुवर्य आदरणीय श्री. ---- तसेच सर्व अतिथींना मी विनंती करतो की त्यांनी प्रतिमा पुजन करावे वया वातावरणास आपधी प्रसन्न करावे. आजच्या या शुभ दिनी हा एक सुवर्णयोगच आलेला आहे की आपल्या पुज्यनीय गुरुवर्याच्या हस्तेच पुजा होत आहे.
सत्कार :
प्रत्येक यशाचे पाऊल... ज्यांच्याकडे वळते जीवन कसे जगावे... ज्यांना पाहून कळते प्रत्येक सत्कार्याला...ज्यांचे पाठबळ मिळते कर्तव्य म्हणजे काय?.. हे ज्यांना पाहून कळते अशा कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्वांचा सन्मान प्रतिमापुजनाने तसेच मान्यवरांच्या उपस्थितीमुळे आजचे वातावरण एकदम प्रसन्न झाले आहे.
आपले येणे केवळ येणे नसते... काळजावर कोरलेले लेणे असते निमंत्रणाचा मान ठेवून आपण इथे येता ज्ञानी.. गुणी... प्रज्ञावंत विराजमान होता आपला प्रत्येक विचार अनुभवांचे देणे असते आपले येणे केवळ येणे नसते काळजावर कोरलेले लेणे असते "
आजच्या या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर उपस्थित झालेले आहेत त्यामूळे आपले कर्तव्य आहे की आपण त्यांचे स्वागत सत्कार करावा. तर आजच्या कार्यक्रमाचे सन्मानीय अध्यक्ष मा. श्री. यांचे पुष्पगुच्छ तसेच शाल व श्रीफळ देऊन स्वागत श्री.....हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ( अशा प्रकारे सर्वाचे स्वागत करावे )
प्रास्ताविक :-
गुरुपोर्णिमा तसेच त्याचे महत्व व आजच्या कार्यक्रमाबाबत थोडक्यात माहिती सांगण्याकरीता श्री. यांना मी आमंत्रित करतो.
इतर कार्यक्रम / भाषणे :-
यानंतर आमचे सहकारी श्री....... -यांचेकडूनच्या द गितगायन/स्वागतगीत / कला सादर करण्याकरीता मी आमंत्रित करतो श्री. त्यांच्या समुहाला (स्वागतगीत किंवा कला सादररीकरणानंतर संचालकाने ती उत्कृष्ट असल्याबाबत बोलावे)
प्रमुख अतिथी / मार्गदर्शक :-
ज्यांच्या मार्गदर्शनाची, अमृततुल्य वाणीची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत असे आपले दिपस्तंभ सन्माननीय श्री.....यांना आपल्या मार्गदर्शनाकरीता मी आमंत्रित करतो.
(अतिथिच्या मार्गदर्शनानंतर संचालक यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा सार थोडक्यात कथन करावा तसेच ते कसे योग्य व अत्यावश्यक आहे याबाबत बोलावे)
अध्यक्षीय भाषण :-
यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाचा परमोच्च बिंदु म्हणजे अध्यक्षीय भाषण होय. तर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री.... हे आपल्या नेहमीच्या शैलीमध्येच आम्हास मार्गदर्शन करून अमृततृत्य विचार प्रकट करतील अशी अपेक्षेसह मी आमंत्रित करतो सन्माननीय अध्यक्ष महोदययांना.
आभार प्रदर्शन :-
“फुलांचे हार कशाला, आभारांचे भार कशाला
नाते जपले हृदयामध्ये त्या हृदयाला दार कशाला”
आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थितीत सर्व मान्यवर व अतिथीगण हे आपलेच आहेत परके नाहीत त्यामुळे त्यांचे आभार मानून आपल्यामध्ये दरी निमार्ण करणार नाही पण कार्यक्रमाची एक अपरीहार्यता म्हणून आभार प्रदर्शन करण्याकरीता मी आमंत्रित करतो माझे सहकारी श्री.....यांना.
(आभार प्रदर्शन करणा-या व्यक्तीने कार्यक्रमाकरीता उपस्थित सर्व तसेच सहभाग मिळालेल्या सर्व व्यक्तिंचे आभार मानुन अध्यक्षांच्या वतीने धर्यक्रम संपला असे शेवटी जाहीर करावे.)