बेंदूर सणाची माहिती मराठी | Bendur sanachi mahiti marathi
नमस्कार आज आपण भारतीय संस्कृती अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात त्यापैकीच एक आपल्या मातीतील सण म्हणजे बेंदूर महाराष्ट्र आणि देशातील विविध राज्यात साजरा केला जातो या विषयी माहिती पाहाणार आहोत.
बेंदूर सण (toc)
बेंदूर सणाची माहिती
किती वर्णू तुझे गुण । मन मोहरून जाई।।
तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी राने।।
एका दिवसाच्या पुजेन तुझा होऊ कसा उतराई ।।
भारत हा कृषिप्रधान देश आहे . कृषी संस्कृती हा आपल्या देशाचा श्वास व प्राण आहे . आपला महाराष्ट्र त्याला अपवाद नाही कृषी संस्कृती म्हटलं की शेती शेतकरी बैल शेतीची अवजारे आणि शेतीशी संबंधित अनेक गोष्टी त्यामध्ये येतात.
गेली तिफन, गेला कुळव शिवाळ गेली, बैल गेले, ट्रॅक्टरचा जमाना आला... दारात नाही सर्जा-राजा, नुसताच कोरडा बेंदूर आला.आपल्या भारतीय संस्कृती अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात त्यापैकीच एक आपल्या मातीतील सण म्हणजे बेंदूर महाराष्ट्र आणि देशभरातील विविध राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो मात्र प्रत्येक प्रदेशानुसार हा सण साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. तसेच प्रत्येक राज्यात हा सण साजरा करण्याचा दिवस ही वेगळा आहे .
महाराष्ट्रात महाराष्ट्रीय बेंदूर साजरा केला जातो. शेतकरी बांधव बेंदूर सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करतात हा बेंदूर सण कधी आहे? तो कसा साजरा करतात ?याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
कधी आहे बेंदूर सण?Bendur sanachi mahiti marathi
आषाढी एकादशी पासून आपल्याकडे विविध प्रकारच्या सण उत्सवांना सुरुवात होते. देशभरातील अनेक भागात वैविध्यपूर्ण सण साजरे केले जातात यापैकी महाराष्ट्रात वेगळे महत्त्व प्राप्त असणारा सण म्हणजे बेंदूर या सणाला महाराष्ट्र बेंदूर किंवा महाराष्ट्रीयन बिंदू असेही म्हटले जाते आषाढी पौर्णिमेला हा सण साजरा करण्याची परंपरा आहे यंदा 11 जुलै 2022 रोजी हा सण साजरा केला जाणार आहे.पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील काही जिल्ह्यांमध्ये हा खास बैलांचा सण म्हणून साजरा केला जातो तर महाराष्ट्रातील अन्य काही जिल्ह्यांमध्ये या सणाला पोळा असे म्हणतात. कर्नाटक आणि देशाच्या अन्य काही भागात हा सण जेष्ठ पौर्णिमेच्या म्हणजेच वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो.
बेंदूर आणि पोळा हा सण साजरा करण्याची पद्धत बहुतांश सारखीच आहे. मात्र बेंदूर हा सण आषाढी पौर्णिमेला साजरा केला जातो तर पोळा किंवा बैलपोळा हा सण श्रावण अमावस्येला साजरा केला जातो. शेतकऱ्यांच्या सोबती असलेल्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.
या दिवशी सकाळपासून गाय ,बैलांना आंघोळ व चारा घातला जातो .त्यानंतर शिंगाणा रंग रांगोटी ,अंगावर झूर घातले जाते .याशिवाय घरात मातीचे दोन बैल प्रतीक म्हणून तयार केले जातात त्यांची हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेल्या कडबोळी शिंगावर ठेवून त्यांची मनोभावे पूजा केली जाते त्यांना पुरणपोळीच्या नैवेद्य दाखवला जातो. व नंतर त्यांना पुरण पोळी खाण्यासाठी दिली जाते.