मंकीपॉक्स आजारापासून काळजी कशी घ्यावी संपूर्ण मराठी माहिती |Complete Marathi information on how to take care of monkeypox disease | monkeypox ajarapasun kalji kashi ghyavi sampurna marathi mahiti
मंकीपॉक्स आजारापासून काळजी कशी घ्यावी संपूर्ण मराठी माहिती |
मंकीपॉक्सची सर्वसाधारणपणे दिसणारी लक्षणे
• ताप
•थकवा, डोके दुखणे किंवा स्नायू दुखणे.
• घसा खवखवणे किंवा खोकला येणे
• कानामागे, गळ्या भोवती, काखेत किंवा जांघेतील लसिका ग्रंथीना सूज येणे.
• त्वचेवर पुरळ / फोड (तोंडापासून सुरू होऊन हातपाय आणि तळव्यांपर्यंत)
• जी व्यक्ती मागील २१ दिवसात मंकीपॉक्स झालेल्या किंवा लक्षणे असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आली असल्यास तिने आपल्या तब्बेतीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
मंकी पॉक्स बाधित व्यक्ती बाबत घ्यावयाची काळजी
पहिल्यांदा बाधित व्यक्तिचे विलगीकरण करावे.
रुग्णावर विलगीकरणातच उपचार करावेत. बाधित व्यक्तिला मुखपट्टीने (मास्क) नाक आणि तोंड झाकायला लावणे.
याशिवाय त्वचेवर काही जखमा असल्यास त्या स्वच्छ कापडाने झाकून ठेवाव्यात. यामुळे आजूबाजूच्या व्यक्तिचा बचाव होऊ शकेल.
• बाधित रुग्णांची माहिती आरोग्य केंद्रात द्या.
• रुग्णाने वापरलेल्या बेडशीट, कपडे किंवा टॉवेल्स अशा गोष्टीचा वापर करू नका.
• साबण, पाणी वापरून हात स्वच्छ ठेवा किंवा अल्कोहोलयुक्त सॅनिटाझर वापरून हात स्वच्छ करा.
हा आजार एका बाधित व्यक्तीपासून दुसऱ्या निरोगी व्यक्तिला होऊ शकतो.
• थेट शारीरिक संपर्क - शरीर द्रव, लैगिंक
संपर्क किंवा जखम, घाव यातील स्त्राव
अप्रत्यक्ष संपर्क (Indirect contact)
बाधित व्यक्तिने वापरलेल्या कपड्यांमार्फत.
जर खूप वेळ बाधित व्यक्तिशी संपर्क आला तर श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबावाटे.
खालील लोकांना मंकीपॉक्स होण्याची शक्यता जास्त असते.
मधुमेह, रक्तदाब व इतर काही आजार असलेल्या व्यक्ति .
प्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या व्यक्ती