गुरुपौर्णिमा निबंधलेखन मराठी | gurupournima nibandha lekhan marathi
गुरुपौर्णिमा निबंधलेखन मराठी |
गुरुपौर्णिमा निबंधलेखन मराठी
“ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा ,
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य
गुरु म्हणजे निस्सिम श्रद्धा आणि भक्ती
गुरु म्हणजे विश्वास आणि वासल्या
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाण तेची मूर्तीमंत प्रतीक
आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना आजच्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन”
gurupournima nibandha lekhan marathi
पहिला गुरु आई - gurupournima nibandha lekhan marathi
बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचा पहिला गुरु त्याची आई असते. अगदी चांगल्या बोलण्यापासून ते संस्कार करेपर्यंत अनेक गोष्टी आई शिकवत असते .म्हणूनच
“आई माझा गुरु ,
आई माझा कल्पतरू ,
सौख्याचा सागरु ”
आई माझी असे म्हटले जाते .
आई सोबत वडील अनेक गोष्टी शिकवत असतात त्यामुळे
“मातृदेवो भव पितृ देवो भव ”
असेही म्हटले जाते .
घरातून बाहेर पडल्यानंतर शिक्षक ,वडील मंडळी ,मित्रमंडळी ,तज्ञ मंडळी असे अनेक जण आपल्याला गुरु मार्गदर्शक म्हणून लाभतात. आयुष्यात चांगला गुरु मिळणे भाग्याचे लक्षण समजले जाते.
गुरु चा नेमका अर्थ काय ?
कलीने ब्रह्मदेवांना गुरु शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितले की 'ग' कार म्हणजे सिद्धी होय 'र'कार म्हणजे पापाचे दहन करणारा ' उ 'कार म्हणजे विष्णू चे अव्यक्त रूप.
तसेच गुरु हाच ब्रह्मा विष्णू महेश हे त्याचे त्रिगुणात्मक रूप आहे. या पलीकडे जे परब्रम्ह तत्व आहे ते जाणण्यासाठी गुरूंचा आश्रय घ्यावा लागतो .ईश्वर जरी प्रसन्न झाला तरी त्याला ओळखणारा गुरु असतो व गुरु स्वतः प्रसन्न झाला तर ईश्वर आपल्या अधीन होतो. भारतीय गुरुपरंपरेत गुरु शिष्यांच्या अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत शुक्राचार्य - जनक , विश्वमित्र राम लक्ष्मण , परशुराम - कर्ण द्रोणाचार्य -अर्जुन अशी गुरु शिष्य परंपरा आहे.
संत ज्ञानेश्वरांनी वडील बंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाची भाष्य करीत असत त्या नामदेवाचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले जाते.
गुरु पौर्णिमेला गुरु पूजन
गुरु पौर्णिमेला गुरुपूजन करण्याची पद्धत आहे गुरुपूजन म्हणजे गुरूंची पाद्य पूजा करणे मात्र गुरुपूजन म्हणजे केवळ गुरुची पाद्य पूजा करणे अथवा गुरूला वाकून नमस्कार करणे असे मुळीच नाही खऱ्या गुरूला अशा दिखाव याची गरज नसते गुरु पूजनाचा खरा अर्थ आपल्या गुरुने खरं गुरुसाठी हा एक प्रकारचा सन्मानच असतो .
गुरु -शिष्याचे नाते
गुरुचे कार्य महान कार्य आहे. आपल्या शिष्यांच्या चांगल्या चा विचार करून त्यांना आपल्याजवळ ज्ञान आणि अनुभव निरपेक्ष पणे आणि प्रामाणिकपणे देणे हे गुरुचे खरे कार्य असते. ज्ञान देताना गुरुची भावनाही अहंकाराचे नसावी गुरूंनी दिलेल्या ज्ञानाची शिष्याची प्रगती होते तेव्हा ती प्रगती पाहून जर गुरूला आनंद आणि समाधान झाले तरच तो खरा गुरु जाणावा गुरूकडून मिळालेले ज्ञान नम्रपणे स्वीकारतो त्या शिष्याला गुरू कडून मिळालेले ज्ञान जसेच्या तसे मिळते कारण ज्ञानग्रहण करताना शिष्याकडे नम्रपणा नसेल तर गुरुकडे शिष्याबद्दल प्रेम आणि आपलेपणा असूनही शिष्याला समजावणे गुरुला कठीण जाते. कारण ज्ञानप्राप्तीमध्ये शिष्याचा अहंकार अडथळा निर्माण करत असतो यासाठी शिष्याची गुरुवर मनापासून श्रद्धा असणे गरजेचे आहे त्यासोबतच गुरुकुल मिळालेले ज्ञान आपल्या जीवनात आचरण्यात आणण्याचा शिष्याने तंतोतंत प्रयत्न करणे गरजेचे आहे असे केल्या शिष्याच्या पाठीगुरूच्या ज्ञानाचे बळ आणि साधना निर्माण होते आणि त्याची आयुष्यात प्रगती होत जाते.