Type Here to Get Search Results !

गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश कविता चारोळ्या | gurupournima shubechya sandesh kavita charolya

 गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश कविता चारोळ्या | gurupournima shubechya sandesh kavita charolya


गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश 

गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश कविता चारोळ्या



जर मिळालाच पुनर्जन्म तर तुच

मला जन्म दे आई ॥”

बाबा तुमच्या विषयी

बोलण्या इतपत नाही

माझ्याकडे शब्दसाठा

माझ्या या सुंदर जीवनी आहे तुमचा मोलाचा वाटा

पुन्हा एकदा मनापासून तुम्हा दोघांना गुरूपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा..

गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य.. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती..

गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य.. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक.. आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना, आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन....!! गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

“आज गुरुपौर्णिमा"

ज्यांनी मला घडवलं,

या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं, अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे... असेच माझ्या पाठीशी उभे रहा, माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो व मोठा..

मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो.. अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद...! गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!


गुरुपौर्णिमा कविता 


 सत्याच्या शोधात मी दोन्ही मार्ग धुंडाळले काही पूजनीय मानले जाणारे तर काही विचित्र

पण कृपावंत गुरू आले आणि त्यांनी माझ्या ज्ञानाच्या प्रवाहाला दिशा दिली

तृतीय नेत्राच्या पवित्र स्थानी त्यांनी त्यांची काठी टेकवली आणि मला वेड लावून गेले

या वेडेपणावर काहीच इलाज नाही

पण निखालस हीच मुक्ती आहे...

जेव्हा मी पाहिलं की भयानक रोगसुद्धा विनासायास पसरतात

तेव्हा मनुष्यप्राण्याला वेड लावायची

मोकळीक घेऊन मी कामाला लागलो.


हरलो! हात टेकलेले मी जीवन आणि मृत्यूच्या खेळापुढे

दोन्ही खेळ खेळलो मी पण ढिम्म हललो नाही..

आणि अचानक एक माणूस माझ्यापाशी येतो, तो काठी टेकत चालणारा मी नवयुवकासारखा सुदृढ

सगळं पाहून चुकलेलो मी जन्म - मृत्यू आणि जे जे म्हणून जीवन बहाल करतं, ते सगळं काही ...

तरी सुन्न बसून होतो..

तेव्हा हा काठीवाला माझ्यापाशी आला अन् त्याची विद्युत्पाती काठी माझ्या कपाळावर टेकवून गेला.

गुरुपौर्णिमा चारोळ्या

चारोळ्या

आपल्या अंतःकरणात गुरुचे नाव कोरले जावो. गुरुजींचे दिव्य प्रेम आणि आशीर्वाद तुम्हा सर्वांबरोबरच असो.

ना वयाचे बंधन.. ना नात्याचे जोड ज्याला आहे अगाध ज्ञान जो देई हे निस्वार्थ दान गुरु त्यासी मानावा देव तेथेची जाणावा

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक.. आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना, आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन

गुरुची आपल्या उपकारांचे कसकाय फेडू मी मोल, लाख किमती धन जरी परंतु गुरू माझे आहेत अनमोल..!


सतत पाठीराख्या राहणाऱ्या, ज्वलंत ज्योतीसारखा तेवणाऱ्या, आणि अचुक मार्गदर्शन करणाऱ्या, गुरुला वंदन करतो.


Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. nice blog beautiful kavita, send Rakhi gifts for sister or Send rakhis and rakhi gifts to your brother. Happy Rakhsha Bandhan 2022

    ReplyDelete

Top Post Ad

Below Post Ad