Type Here to Get Search Results !

लोकमान्य टिळक जयंती मराठी माहिती | Lokmanya Tilak jayanti mahiti marathi

लोकमान्य टिळक जयंती मराठी माहिती | Lokmanya Tilak jayanti mahiti marathi  

नमस्कार शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या हक्कासाठी लढत राहाणे व तो हक्क मिळवणे म्हणजे “स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे व तो मी मिळवणारच” असे सांगणारे लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त आपण मराठी मध्ये माहिती पाहाणार आहोत.

लोकमान्य टिळक जयंती मराठी माहिती 


लोकमान्य टिळक माहिती(toc)

 जीवन परिचय - लोकमान्य टिळक 

नाव : बाळ गंगाधर टिळक 

 जन्म : २३ जुलै १८५६, रत्नागिरी येथील टिळक आळी येथे. 

 लोकमान्य टिळक यांचे पूर्वज रत्नागिरी जवळच्या चिखल या गावचे खोत होते. 

आईचे नाव : पार्वतीबाई .

१८७१ : टिळकांचा तापीबाई (सत्यभामाबाई) यांच्याशी विवाह.

शिक्षण - लोकमान्य टिळक

 १८७७ : डेक्कन कॉलेज पुणे येथून गणित विषयात B.A. 

• १८७९ : मुंबई येथील शासकीय विधी महाविद्यालयातून L.L.B.

सामाजिक कार्य - 

• १ जानेवारी १८८० : पुण्यात न्यू इंग्लीश स्कूलची स्थापना.. 

१८८१ : 'केसरी' (मराठी) व मराठा (इंग्रजी) ही वर्तमानपत्रे सुरु केली.

१८८४ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना, 

• १८८५ : फर्ग्युसन कॉलेजची टिळक फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित विषय शिकवत असत.

 • १८९० साली टिळक राष्ट्रीय सभेत दाखल झाले.

१८९३ : लोकमान्य टिळक यांनी पुण्यातील विंचुरकर वाड्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. 

 भाऊसाहेब रंगारी (भाऊसाहेब लक्ष्मण जावळे) यांनी पुण्यात १८९२ साली सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, अशी नोंददेखील मिळते.

१८९५ : टिळकांनी शिवजयंती या उत्सवास राष्ट्रीय महत्व प्राप्त करून देऊन त्या माध्यमातून लोकजागृती केली.

१८९६ पासून 'केसरी'तून स्वदेशी व बहिष्कार चळवळीचा पुरस्कार केला.

लोकमान्य टिळक यांनी लिहिलेला ग्रंथ कोणता?

१८९७ : प्लेग कमिशनर रँडच्या हत्येचे समर्थन केल्याने IPC कलम 124A नुसार राजद्रोहाच्या आरोपाखाली टिळकांना दीड वर्षांची शिक्षा. हा भारतातील पहिला राजद्रोहाचा खटला आहे. 

१९०८ मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली टिळकांना सहा वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी म्यानमारमधील(ब्रह्मदेश) मंडालेच्या तुरूंगात रवानगी. 

या तुरूंगातच टिळकांनी 'गीतारहस्य' हा प्रसिध्द ग्रंथ लिहिला. कर्मयोग हा गीतारहस्यचा गाभा असून लोकांनी कृतीशील रहावे यावर त्यात भर होता.

 १९१४ ला तुरूंगांतून बाहेर आल्यानंतर अॅनी बेझंट यांच्या होमरूल चळवळीस वाहून घेतले..

१९१५ साली लोकमान्य टिळकांनी भाषावार प्रांतरचनेची मागणी केली.

होमरूल चळवळ

होमरूल चळवळ (होमरूल म्हणजे स्वशासन) : आयरिश विदुषी डॉ. अॅनी बेझंट यांनी १९१५ साली मद्रास

प्रांतातील अड्यार येथे होमरूल लीगची (स्वराज्य संघ) स्थापना केली होती. १९९६ साली टिळक व अॅनी बेझंट यांनी संयुक्तपणे होमरूल चळवळ सुरू केली.

होमरूलच्या मागण्या : 

भारतीय जनतेस राजकीय हक्क मिळाले पाहिजेत व भारतातील प्रातिनिधिक संस्था अधिक व्यापक बनवून त्यांच्या अधिकारात वाढ केली पाहिजे. या मागण्या होमरूलने केल्या.

• होमरूलमुळे स्वराज्याच्या हक्कांची जाणीव निर्माण होऊन मवाळवादी व मुस्लिम लीगचे नेतेही त्याकडे आकर्षित झाले. आयर्लंडमधील होमरूलच्या धर्तीवर ही चळवळ आधारित होती.

टिळकांनी १९१६ मध्ये महाराष्ट्रात होमरूल लीगची (स्वराज्य संघ) स्थापना केली.

लोकमान्य टिळक यांनी कोणती प्रतिज्ञा घेतली.

'स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे व तो मी मिळवणारच' 

ही प्रतिज्ञा टिळकांनी कर्नाटकातील बेळगाव येथे केली. लोकमान्य टिळकांचे सहकारी जोसेफ बॅप्टिस्टा हे स्वराज्याच्या वरील घोषणेचे जनक मानले जातात.

होमरूलची शाखा 

जोसेफ बॅप्टिस्टा यांनी बेळगाव येथील होमरूलची शाखा सांभाळली. (जोसेफ बॅप्टिस्टा १९२५ साली मुंबई महानगरपालिकेचे मेयर (महापौर) बनले.) 

बॅप्टिस्टा यांना 'फादर ऑफ होमरुल इन इंडिया' असे म्हटले जाते.

होमरूलचा धसका घेऊन सरकारने लोकमान्य टिळकांना पंजाब, दिल्ली येथे प्रवेशबंदी केली.

होमरूलच्या वाढत्या यशामुळे अॅनी बेझंट यांची १९१७ च्या कोलकाता अधिवेशनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. लाला लजपतराय यांनी अमेरिकेत होमरूल चळवळीचा प्रचार केला.

अधिवेश - 

१९१६ चे लखनौ अधिवेशन : अध्यक्ष : बाबू अंबिकाचरण मुझुमदार

१९१४ ला टिळक तुरूंगातून सुटले. याच दरम्यान १९१५ साली. ना. गोखले व फिरोजशहा मेहता या मवाळ नेत्यांचा मृत्यू झाला. साहजिकच टिळकांचा पर्यायाने जहालांचा प्रभाव वाढला.

लखनौ करार

लखनौ करार : १९१६ च्या लखनौ अधिवेशनात जहाल व मवाळ यांच्यात पुन्हा ऐक्य घडून आले. यालाच

'लखनौ करार' किंवा 'ऐक्य करार' असेही म्हणतात. या करारानुसार - • राष्ट्रीय सभेने मुस्लिम लीगच्या वेगळ्या मतदारसंघांच्या मागणीस विरोध करणे सोडून दिले.

मुस्लिम लीगने ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्याच्या मागणीस पाठिंबा देऊन ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन करण्यास संमती दिली. अशा प्रकारे मुस्लीम लीग व राष्ट्रीय सभा यांच्यातही या अधिवेशनात समझोता करार झाला. या अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली.

१९१७ चे कोलकाता अधिवेशन : अध्यक्षा : डॉ.   अॅनी बेझंट या काळात राष्ट्रीय सभेवर जहालांनी पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले. .

अॅनी बेझंट या काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा बनल्या. 

 अॅनी बेझंट यांनी या अधिवेशनात 'स्वराज्या ची मागणी केली. 

 महर्षी वि. रा. शिंदे यांनी या अधिवेशनात अस्पृश्यता विरोधी ठराव मांडला.

ऑगस्ट घोषणा; २० ऑगस्ट १९१७ : भारतमंत्री माँटेग्यू यांनी केलेल्या या घोषणेनुसार जबाबदार राज्यपध्दती बहाल केली जाईल असे घोषित केले.मवाळांनी ऑगस्ट घोषणेस 'Magna Carta of India' असे संबोधले.

लोकमान्य टिळकांची प्रतियोगी सहकारिता : १९९९ (Responsive Co-operation) :

'सरकारला जर भारतीयांच्या मागण्यांविषयी सहानुभूती असेल, तर भारतीय जनताही सरकारला सहकार्य करील' या आशयाचे प्रतियोगी सहकारिता धोरण टिळकांनी १९९९ च्या कायद्यासंदर्भात मांडले.

१९१९ च्या अमृतसर अधिवेशनात (अध्यक्ष: मोतीलाल नेहरू) राष्ट्रसभेने या धोरणास मान्यता दिली.

काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टी : १९२० च्या निवडणुका लढविण्यासाठी टिळकांनी काँग्रेस अंतर्गत हा पक्ष स्थापन केला. १ ऑगस्ट १९२० : लोकमान्य टिळक यांचे मुंबई येथे निधन.

● ब्रिटिश सत्तेचे खरे स्वरूप भारतीयांपुढे उघड करून भारतीयांच्या मनात इंग्रजांविषयी असंतोष निर्माण करण्यात टिळकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी लो. टिळकांना 'भारतीय असंतोषाचे जनक' असे संबोधले आहे. लोकमान्य टिळकांवरील चित्रपट, २०१५ : 'लोकमान्य : एक युगपुरुष', भूमिका : सुबोध भावे, दिग्दर्शक : ओम राऊत

● 'चार आण्यांची भांग घेतली की हव्या तेवढ्या कल्पना सुचतात' : लोकमान्य टिळक

FAQ

प्रश्न.१.लोकमान्य टिळक यांनी कोणती प्रतिज्ञा केली .

उत्तर - 'स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे व तो मी मिळवणारच' 

प्रश्न .२. 'लखनौ करार म्हणजे काय ? 

उत्तर - १९१६ च्या लखनौ अधिवेशनात जहाल व मवाळ यांच्यात पुन्हा ऐक्य घडून आले. यालाच 'लखनौ करार' किंवा 'ऐक्य करार' असेही म्हणतात.

प्रश्न - ३. लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव काय ?

उत्तर - लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे आहे.

प्रश्न. ४. लोकमान्य टिळक यांनी कोणता ग्रंथ लिहिला ?

उत्तर -  टिळकांनी 'गीतारहस्य' हा प्रसिध्द ग्रंथ लिहिला.

प्रश्न . ५. लोकमान्य टिळक यांना काळ्या पाण्याची शिक्षा कोणत्या तुरुंगात  झाली ?

उत्तर - १९०८ मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली टिळकांना सहा वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी म्यानमारमधील(ब्रह्मदेश) मंडालेच्या तुरूंगात रवानगी. 







Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad