सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी | setu abhyaskram amalbajavani
राज्यातील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याच्या संदर्भात इयत्ता २ री ते १० वी या इयत्तेतील विद्यार्थ्याची सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी पूर्वीची अध्ययन स्थिती तपासण्यासाठी सर्व्हे मंकी लिंकच्या माध्यमातून पूर्व चाचणीद्वारे माहिती संकलन करण्यात आलेली आहे.
सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी |
सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत राज्यातील विद्यार्थ्यांचे अध्ययन क्षय भरून काढण्यासाठी सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाची परिणामकारकता तपासण्यासाठी संशोधन विभागामार्फत संशोधन हाती घेण्यात आले आहे. याकरिता राज्यातील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याच्या संदर्भात इयत्ता २ री ते १० वी या इयत्तेतील विद्यार्थ्याची सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी पूर्वीची अध्ययन स्थिती तपासण्यासाठी सर्व्हे लिंकच्या माध्यमातून पूर्व चाचणीद्वारे माहिती संकलन करण्यात आलेली आहे.
setu abhyaskram amalbajavani
या संशोधनासाठी सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी नंतरची विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती तपासणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील सव्र्हें मंकी लिंकमध्ये देण्यात आलेल्या प्रश्नावलीच्या माध्यमातून आपल्या अधिनस्थ वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित शिक्षण तज्ज्ञ व विशेष शिक्षक यांच्या सहकार्याने सोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात यावी. तसेच यापूर्वी पूर्व चाचणीमध्ये ज्या विद्यार्थ्यांकडून प्रश्नावली सोडवून घेण्यात आली होती, त्याच विद्यार्थ्यांची उत्तर चाचणी सोडवून घेण्याविषयी अवगत करावे.
सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी व शासन निर्णय pdf
सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी लिंक व pdf⬇️
सेतू अभ्यासक्रम विद्यार्थी अध्यापन स्तिथी तपासणे बाबत .⬇️
सेतू अभ्यासक्रम कालावधी
राज्यातील शाळा (विदर्भ वगळून)उत्तर चाचणी
दि. २७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२२ (८ दिवस)
विदर्भातील शाळा
दि. ११ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०२२ (८ दिवस)