Type Here to Get Search Results !

वनसंवर्धन दिन मराठी माहिती | vansanvardhan din marathi mahiti

 वनसंवर्धन दिन मराठी माहिती | vansanvardhan din marathi  mahiti

आज आपण वनसंवर्धन दिन मराठी माहिती पाहाणार आहोत.

वनसंवर्धन दिन मराठी माहिती

आपल्या बोलीतून नेहमी सर्वांना सांगत असतो की निसर्ग हा आपला सर्वात जवळचा आणि चांगला मित्र आहे हे वाक्य खरोखरच अगदी सत्य आहे म्हणून जगद्गुरु संत तुकोबारायांनी  त्यांच्या अभंगात म्हटले आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे .

वनसंवर्धन दिन मराठी माहिती


एकविसाव्या शतके विज्ञान आणि तंत्रज्ञाना चे प्रगतशील युग म्हटले जात आहे .आधुनिक पद्धतीने मानवी बुद्धी व तंत्रांच्या साह्याने विकास आणि प्रगती साधण्यासाठी जगात चढाओढ करत आहे .हे करत असताना वाढत्या गरजा, अन्नधान्य, कारखाने ,उत्पादने यांची वाढती लोकसंख्यानुसार वाढती मागणी तसेच अनाथायी विलासी गरजा यासाठी निसर्गाला वनसंपत्तीला नष्ट करून त्या ठिकाणी मानव आपली वस्ती बसवत आहे विकास गरजेचा आहे तशी वृक्षसंपदा त्यापेक्षाही महत्त्वाची आहे.निवासी वस्त्या नवीन कारखानदारी यासाठी अधिक जागेची पूर्तता वनसंपदा नष्ट करून तिथे माणूस फक्त आपले सुख ,संपदा ,वैभव, स्वार्थ पाहत आहे परंतु निसर्गावर घाला घालून आपण आपली हाऊस करताना निसर्गाच्या संतुलित जीवन चक्राला आपण कुठेतरी ब्रेक लावत आहोत हे लक्षात येत नाही.

     जैवविविधतेतील प्रत्येक पशुपक्षी प्राणी जलचर सूक्ष्मजीव हे सर्वजण त्या चक्रातील सारखे घटक आहेत त्यातील एकाही घटकास इजा अथवा धोका पोहोचला तरी हे चक्र सुरळीत गतीने चालणार नाही आणि त्याचे दुष्परिणाम मानवांना भोगावे लागतील मोठमोठ्या जंगलांना कधीकधी आग ही लागतात किंवा लावल्या जातात त्यामध्ये हजारो वृक्षांची वनसंपदा औषधी वनस्पती पशुपक्षांचे आश्रयस्थान जैवविविधता जळून खाक होते परत तिथे तशीच जैवविविधता निर्माण होण्यासाठी साधारणता 15 ते 20 पिढ्या अर्थात पाचशे वर्षांचा कालावधी जावा लागतो

   आज अनेक योजनांसाठी वृक्षतोडीचे प्रमाण कमी झालेले नाही रस्ते लोहमार्ग नवीन खाणी मेट्रो विमानतळ शिवाय औद्योगिक कारखाने रासायनिक प्रकल्प यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड केली जाते. पर्यायी व्यवस्था म्हणजे जेवढी झाडे तोडली तेवढी झाडे दुसऱ्या ठिकाणी लावू अशी आश्वासने दिली जातात पण ती आश्वासने पाळली जातात का? त्यावर कोणत्यातरी संस्थेची देखरेख असते का हे सर्व न समजणारे प्रश्न आहेत?

vansanvardhan din marathi  mahiti

 वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे आमच्या संतांनी सांगून ठेवले आहे आमच्या  पूर्वजांनी वड, पिंपळ, तुळस ,आंबा, लिंब अशा अनेक ना विविध प्रकारच्या झाडांना महत्व दिले व त्यांचे वृक्षारोपण केले झाडांमुळे पाऊस पडतो पाणी मिळते सावली मिळते बाष्प टिकून राहते ऑक्सिजन मिळतो भूजल पातळी वाढते तापमानात घट होते त्यामुळे वृक्षरोपण किंवा वनसंवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. कोरोना काळामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे की ऑक्सिजन चे महत्व किती होते ते ऑक्सिजन जर हवा असेल तर आपणा सर्वांना प्रत्येकी एक एक झाड लावणं गरजेचं आहे.

झाडांशिवाय निसर्ग नाही आणि निसर्गाशिवाय प्राणी जीवन नाही जन्मानंतर व मृत्यूपर्यंत चालणारा श्वास हा आपल्या पृथ्वीतलावर वनस्पती पासून मिळतो सर्व प्राणीमात्रांना जीवन आवश्यक प्राणवायू हे झाड देत असते व आपणास अपयकारक असणारा शेवटू कार्बन डाय-ऑक्साइड हा विशाल वायू स्वतः शोषून घेऊन सर्व प्राणीमात्रांवर ही वृक्ष संपत्ती दया करत आहे परंतु आमच्या प्राण्यांचे रक्षण करणाऱ्या वनदेवतेचा आम्ही सतसहहार करतो आहोत ते सुद्धा प्राथमिक गरजे पोटी नसून अधिकाधिक लालसे पायी मानव जात जगलांचा नाश करत आहे .

वनसंवर्धन व वृक्षारोपण दिनासाठी घोषवाक्य व चारोळ्या

 वृक्ष संवर्धन दिनाचा दिवस खास वृक्ष रक्षणाच्या घेऊन ध्यास तुम्हा साऱ्यांच्या सहकार्याची आस पृथ्वीला देव मोकळा श्वास

 झाडे लावा सृष्टी वाचवा पर्यावरणाचा साधा समतोल लाभेल आरोग्य संपन्नता जीवन आहे अनमोल

भविष्य उद्याचे नव्या पिढीचे संकटात टाकू नका वनांचे करारक्षण उज्वल भविष्याचे हेच धोरण

 जंगल करा घनदाट सळसळेल रक्त मनगटात वृक्षतोड करू नका जीवन धोक्यात टाकू नका.


हे नक्की वाचा ⬇️













Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad