Type Here to Get Search Results !

मैत्री दिन मराठी माहिती | Friendship Day|फ्रेण्डशिप डे व्हिडिओ स्टेटस marathi

मैत्री दिन मराठी माहिती|फ्रेण्डशिप डे|फ्रेण्डशिप डे व्हिडिओ स्टेटस marathi 

सर्वप्रथम सर्वांना मैत्रीदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा मैत्रीदिन म्हणून पाळला जातो. मित्रांची यादी करायला सांगितली, तरआपली प्रत्येकाची यादी खूप मोठी होईल. पण जेव्हा खरंच वेळ येते, तेव्हा त्यातले किती कामाला येतात? याचा विचार केला तर मात्र पदरात काहीच पडत नाही. आपल्याकडे एक म्हण आहे, 'सारा गाव मामाचा एक नाही कामाचा'. जो कामाला येतो तोच खरा मित्र. A Friend in need is a friend indeed ही इंग्रजी म्हण त्यासाठीच तर निर्माण झाली.

मैत्री दिन |फ्रेण्डशिप डे|फ्रेण्डशिप डे व्हिडिओ स्टेटस 


मैत्री दिन फ्रेण्डशिप डे

रक्ताच्या नात्याहूनही खास नात्याचा दिवस म्हणजे 'मैत्री दिन '. आपल्याकडे ऑगस्ट महिना आला की पहिल्या रविवारची आतुरतेने वाट पाहिली जाते ती याच मैत्री दिनाची... खरंतर युनायटेड नेशनने ३० जुलैला 'इंटरनॅशनल फ्रेण्डशिप डे' घोषित केला होता, परंतु आपल्याकडे दरवर्षीप्रमाणे ऑगस्टचा पहिला रविवार म्हणजे यंदा ७ ऑगस्टला फ्रेण्डशिप डे साजरा होणार आहे.....

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आयुष्यात या फ्रेण्डशिप डेचं महत्त्व अधिक. आपण स्वतः निर्माण केलेलं, एका जीवाला दुसऱ्या जीवाशी सहज जोडून घेणारं हे मैत्रीचं नातं. इथे कुठेही कोणाला विचारून मैत्री करावी लागत नाही वा आईवडिलांची परवानगी घ्यावी लागत नाही. मनापासून जोडलेली मैत्री साजरी करण्याची संधी देणारा 'फ्रेण्डशिप डे' म्हणूनच त्यांना महत्त्वाचा वाटतो.

 फ्रेण्डशिप डे व्हिडिओ स्टेटस 

आपल्या आयुष्यातील एखादी महत्त्वाची गोष्ट आपल्या घरच्यांव्यतिरिक्त एखाद्याकडे व्यक्त करावीशी वाटणं ही फार सहजभावना आहे. आपले राग-रुसवे, दुःखाचे-आनंदाचे क्षण त्याला किंवा तिला सांगून मन हलकं करावं किंवा एखाद्या गोष्टीबाबत मनात संभ्रम असल्यास आपल्याला समजून घेईल अशा मित्रमैत्रिणीकडून सल्ला घ्यावा, असं प्रत्येकालाच वाटतं. सुखात आणि दुःखातही आपल्याला जीव लावणाऱ्या मित्र-मैत्रिणींबरोबरचं हे गोड नातं साजरं करण्यासाठी म्हणून फ्रेण्डशिप डेची सुरुवात झाली. अर्थात आपल्याकडे हे वेड चित्रपट वा टीव्हीच्या माध्यमातूनच शिरलं आहे. आधी फक्त शाळा-कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुला-मुलींपुरता हा फ्रेण्डशिप डे मर्यादित होता. आता तर मोठी माणसंही आपल्या इतर सणांप्रमाणेच फ्रेण्डशिप डेही साजरा करू लागली आहेत. फ्रेण्डशिप डेला एकमेकांच्या मनगटावर फ्रेण्डशिप बॅण्ड (सॅटिन  रिबन) बांधला जातो. हा बॅण्ड म्हणजे आपण एकमेकांचे 'बेस्ट फ्रेंड फॉरेव्हर' (BFF) असणं  मानलं जातं. पण हल्ली फक्त बॅण्ड देऊन भागत नाही. आपल्या खास मित्रमैत्रिणींसाठी खास वस्तू, ग्रीटिंग कार्ड, पुष्पगुच्छ देऊन आपलं मैत्रीचं नातं अजून फुलवण्याचा प्रयत्न केला जातो.

friendship day video status

मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जाण्यासाठी या दिवसासारखं उत्तम निमित्त असूच शकत नाही. प्रत्येकाची फ्रेण्डशिप डे साजरी करण्याची आपापली पद्धत असते. एखादा मित्रमैत्रिणींचा मोठा ग्रुप एकत्र येऊन चौपाटीवर-बागेत फिरायला जातो, कोणी सिनेमा पाहायला जातात तर कोणी लंच किंवा डिनरचा प्लॅन करतात. सध्याच्या धावपळीच्या जीवनात रविवारच काय तो सुट्टीचा मिळतो आणि फ्रेण्डशिप डे रविवारीच येत असल्यामुळे काही जण दोन दिवस मस्त वीकएन्ड प्लॅनही करतात.

कॉलेजमधला फ्रेण्डशिप डे म्हणजे एक प्रकारचा सोहळाच असतो. यादिवशी मुलं-मुली बहुधा पांढऱ्या रंगाचे कपडे घालतात आणि त्यावर मित्र मैत्रिणी मार्करने आपली नावं लिहितात किंवा चित्र काढतात किंवा एकमेकांना चिडवण्यासाठी काही चारोळ्या-कविताही लिहिल्या जातात. काही जण टॉप-टीशर्ट ऐवजी हातावरच ही कलाकुसर करून घेतात. कॉलेजच्या गेटपासून ते कॅन्टीनपर्यंत फ्रेण्डशिप डेची सजावट, शुभेच्छा फलक पाहायला मिळतात. याशिवाय, काही कॉलेजेसमध्ये यानिमित्ताने स्पेशल स्पर्धा, गेम्स, नाच-गाण्यांच्या कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते.

फ्रेण्डशिप डे गिफ्ट्स

आजकाल फ्रेण्डशिप डेसाठी विविध प्रकारचे ला गिफ्ट्स बाजारात किंवा ऑनलाइन उपलब्ध  आहेत. फक्त बॅण्ड जरी बांधायचा झाल्यास त्यातही आपल्या मित्राचं नाव असलेला बॅण्ड  डिझाइन करून मिळतो. हॅन्डमेड गिफ्ट्समध्येही  बरेच पर्याय उपलब्ध आहेत. फोटोफ्रेम, कीचेन, स्तू, पर्स, शोपीस, घड्याळ इत्यादी गोष्टींमध्ये आपण तं आपल्या मित्राचे नाव किंवा फोटो टाकून त्याला गिफ्ट करू शकतो. शेवटी आपल्या भावना त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं हाच यामागचा उद्देश असतो. मग ते साधं फूल असो किंवा एखादं महागडं गिफ्ट. मैत्री ही मैत्री असते आणि आपल्या मनातील मैत्रीची भावना व्यक्त करण्यासाठीचा हा खास दिवस पुढच्या काही दिवसांसाठी, गी महिन्यांसाठी भरभरून उत्साह देऊन जातो. त्यामुळे बाकी काही साजरं करता येवो न येवो.... फ्रेण्डशिप डे मस्ट हे नक्की आहे.

 सर्वांना मैत्री दिन ,फ्रेण्डशिप डे हार्दिक शुभेच्छा 🌺🌼🌷🌷🌺
















Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad