प्रो गोविंदा स्पर्धा | दही हंडीला खेळाचा दर्जा | गोविंदाना सरकारी नोकरी | dahi handila khelacha darja | govindana sarkari nokari | pro govinda spardha
आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व गोविंद पथकांना आनंदाची बातमी दिली आहे .दही हंडीला खेळाचा दर्जा दिला आहे अशी घोषणा त्यांनी केली . तसेच दही हंडी प्रो दही हंडीला खेळाचा दर्जा गोविंदाना सरकारी नोकरी dahi handila khelacha darja govindana sarkari nokari dahi handi pro होणार आहे व सरकारी नोकरीत 5 टक्के आरक्षण मिळणार असे सांगितले आहे. चला तर या विषयी माहिती थोडक्यात पाहूया .
प्रो गोविंदा दही हंडीला खेळाचा दर्जा गोविंदाना सरकारी नोकरी dahi handila khelacha darja govindana sarkari nokari pro govinda
राज्यात प्रो गोविंदा स्पर्धा होणार असल्याची घोषणाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना व त्यांच्या कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना
दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
- मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
- गंभीर जखमी झालेल्यांना 7.50 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
- हात-पाय जायबंदी झालेल्यांना 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
गोविंदा पथकांना सहाय्य
दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा उतरविण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल. या संदर्भात विम्याचा प्रिमियम भरण्याची योजना शासन तपासत असून दहीहंडी उत्सव उद्याच असल्याने विमा योजनेच्या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी कमी कालावधी असल्याने आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
अटी व शर्ती dahi handila khelacha darja govindana sarkari nokari pro govinda
- गोविंदांच्या सुरक्षेची सर्व काळजी संस्थांनी घेतलेली असावी.
- पथकातील सदस्यांनी औपचारिक किंवा अनौपचारिक प्रशिक्षण घेतलेले असणे गरजेचे.
- मानवी मनोरे तयार करण्याव्यतिरिक्त अन्य कारणांमुळे अपघात किंवा दुर्घटना झाल्यास सदर आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही .
- गोविंदांच्याबाबतीत वयोमर्यादेचे पालन करणे बंधनकारक असून 18 वर्षाखालील सहभागी गोविंदांना आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही.
- मानवी मनोरे रचताना अपघात झाल्यास गोविंदांना तात्काळ वैद्यकीय मदतीची कार्यवाही आयोजकांनी स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने करणे गरजेचे आहे.
- मनोरे रचताना झालेल्या अपघाताबाबत आयोजकांनी तात्काळ स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणेकडे तत्काळ अहवाल देणे आवश्यक आहे.
- दहीहंडीसाठी स्थानिक आवश्यक परवानग्या असणे गरजेचे आहे, न्यायालय, प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे आयोजक संस्था तसेच गोविंदा पथकांनी पालन करणे आवश्यक आहे.