देशाचे नवे सरन्यायाधीश उदय उमेश ललित संपूर्ण मराठी माहिती |deshyache nav sarnyayadish Uday Umesh Lalit sampurn marathi mahiti
नमस्कार आज आपण देशाचे ४९ वे सरन्यायाधीश उदय उमेश ललित हे शपथ घेणार आहेत. चला तर देशाचे नवे ४९ वे सरन्यायाधीश उदय उमेश ललित संपूर्ण मराठी माहिती |deshyache nav sarnyayadish Uday Umesh Lalit sampurn marathi mahiti पाहाणार आहोत .
४९ वे सरन्यायाधीश उदय उमेश ललित |
आज दिनांक २७/०८/२०२२ रोजी न्यायमूर्ती उदय उमेश ललित भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांना सरन्यायाधीशांची शपथ देणार आहेत . CJI NV रमना 26 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी न्यायमूर्ती उदय रमेश यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन सरन्यायाधीश उदय उमेश ललित यांचा कार्यकाळ हा एकूण तीन महिन्यांपेक्षा कमी आहे . ते 8 नोव्हेंबर रोजी आपल्या पदावरून निवृत्त होणार आहेत.
देशाचे नवे सरन्यायाधीश उदय उमेश ललित संपूर्ण मराठी माहिती.
वैयक्तिक माहिती - सरन्यायाधीश उदय ललित
सरन्यायाधीश उदय ललित हे महाराष्ट्र राज्याचे सुपुत्र आहेत . उदय ललित हे कोकणामधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत .देवगड तालुक्यातील गिर्ये कोठारवाडी हे त्यांचे मूळ गाव आहे.त्यांचे वडील वकील होते.वडीलांनी वकीलीसाठी गाव सोडून ते सोलापूरला स्थायीक झाले होते.
जन्म -
त्यांचा जन्म सोलापूर येथे दिनांक - ९ नोव्हेंबर १९५७ रोजी झाला होता.
उदय ललित यांनी आपले शिक्षण आणि वकीलीची प्रॅक्टीस मुंबईतून केली आहे.
➡️ उदय ललित यांची ही तिसरी पिढी कायद्याच्या क्षेत्रात आहे.
➡️ जून 1983 मध्ये त्यांची महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी झाली.
➡️ जानेवारी 1986 मध्ये दिल्लीत येण्यापूर्वी डिसेंबर 1985 पर्यंत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली.
महत्वाचे खटले - सरन्यायाधीश उदय ललित
सरन्यायाधीश पदा ची जबाबदारी घेण्यापूर्वी त्यांना भारताचे राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांनी त्यांना शपथ आज दिली आहे. सरन्यायाधीश पदावर विराजमान होणारे उदय ललित यांनी देशातील अनेक महत्वाचे खटले त्यांनी चालवले आहेत. टू जी स्पेक्ट्रमसारख्या मोठ्य घोटाळ्यात त्यांनी ईडीकडून अभियोगाची महत्वाची जबाबदारी सांभाळली होती.
भारतातील सरन्यायाधीश यांची माहिती ⬇️ साठी खाली क्लिक करा.
गुन्हे कायद्यातील तज्ञ - सरन्यायाधीश ललित
भारताचे नवे सरन्यायाधीश ललित हे फौजदारी कायद्यातील तज्ञ आहेत. 2G प्रकरणांमध्ये त्यांनी सीबीआयचे विशेष सरकारी वकील म्हणून काम केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे ते सलग दोन वेळा सदस्यही राहिले आहेत. अतिशय सौम्य स्वभावाचे उमेश ललित हे भारताच्या इतिहासातील दुसरे सरन्यायाधीश आहेत जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यापूर्वी कोणत्याही उच्च न्यायालयात न्यायाधीश झाले नाहीत. वकिलीतून ते थेट या पदापर्यंत पोहोचले आहेत. त्यांच्या आधी देशाचे १३ वे सरन्यायाधीश एसएम सिक्री यांनी १९७१ मध्ये ही कामगिरी केली होती.
अयोध्या-बाबरी खटल्यात सहभागी नव्हते ?
दिनांक - १० जानेवारी २०१९ रोजी न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांनी अयोध्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठापासून स्वत:ला वेगळे ठेवले या मुळे ते चर्चेत होते.
त्याचे कारण असे की . त्यांनी असा युक्तिवाद केला होता की सुमारे 20 वर्षांपूर्वी ते अयोध्या वादाशी संबंधित एका फौजदारी खटल्यात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे वकील होते.
महत्त्वाचे निर्णय
भारताचे नवे सरन्यायाधीश ललित यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून अनेक महत्त्वाचे निर्णय दिले आहेत. यातील काही सर्वात महत्त्वाचे म्हणजे
➡️ तिहेरी तलाक
➡️ केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिरावरील त्रावणकोर राजघराण्याचा दावा .
➡️ POCSO संबंधित कायदा, त्यांनी निर्णय घेतले.