Type Here to Get Search Results !

ध्वज संहिता मराठी माहिती पी डी एफ | dhwaj sanhita marathi mahiti pdf

 ध्वज संहिता मराठी माहिती पी डी एफ| dhwaj sanhita marathi mahiti pdf

१५ ऑगस्ट हा 'स्वातंत्र्य दिन' आपण सर्वांनी राष्ट्रीय सण म्हणून मोठया उत्साहात साजरा करावा, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशात डर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक घरावर तिरंगा लावण्यात येणार असला तरी ध्वजसंहितेचे पालन होणेही आवश्यक आहे. जिल्ह्यात 'घरोघरी तिरंगा लावताना काय काळजी घ्यावी,तिरंग्याचा मान राखला जावा  यासाठी काय करावे याबाबत  नागरिकांच्या मनात  अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरे मिळावी या साठी ध्वज संहिता मराठी माहिती  dhwaj sanhita marathi mahiti आज आपण पाहाणार आहोत.

ध्वज संहिता मराठी माहिती i pdf



ध्वज संहिता मराठी माहिती पी डी एफ  dhwaj sanhita marathi mahiti pdf


घरोघरी तिरंगा लावताना काय काळजी घ्यावी ?- ध्वज संहिता मराठी माहिती

  • १३ ते १५ ऑगस्ट या काळात नागरिकांनी आपल्या घरावर झेंडा लावावा.
  • ध्वज लावताना केशरी रंगाची बाजू काठीच्या वरच्या टोकाकडे असावी.
  • ध्वज उलटा फडकवला जाणार नाही याची काळजी घ्यावी.
  • तिरंगी ध्वजा चा आकार आयताकार असावा
  • झेंड्याची  लांबी रुंदीचे प्रमाण ३X२ असावे.
  • कातलेल्या, विणलेल्या मशिनद्वारे तयार केलेल्या सूत, पॉलिस्टर, लोकर, सिल्क किंवा खादीपासून बनविलेल्याध्वज असावा.
  • अर्धा तुटलेला फाटलेला, मळलेला राष्ट्र ध्यान कोणत्याही परिस्थितीत फडकावू नये.
  • घरोघरी तिरंगा फडकावताना तो दररोज  सायंकाळी उतरविण्याची गरज नाही.
  • राष्ट्रध्वजासमवेत इतर कोणताही ध्वज एका काठीवर फडकवू नये.
  • ध्वज उतरविल्यानंतर त्याची व्यवस्थित घडी  घालून तो जतन करून ठेवावा.
ध्वज उतरविल्यानंतर घडी कशी घालावी ?

शासकीय कार्यालये ठिकाणी ध्वज  फडकवताना कोणती काळजी घ्यावी ?dhwaj sanhita marathi mahiti 

कार्यालयांच्या ठिकाणी ध्वज फडकवल्यास ध्वज संहिता पाळावी . ध्वज सूर्योदयावेळी फडकवावा व सूर्यास्तावेळी उतरवाया.
दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहीमेअंतर्गत शाळांनी दररोज सकाळी ध्वजारोहण करून ध्वजसंहितेच्या नियमानुसार दररोज सायंकाळी पुन्हा ध्वज उतरवायचा आहे. घरोघरी ध्वजारोहण करताना 13 ऑगस्ट ला सकाळी ध्वजारोहण केल्यानंतर तो ध्वज 15 ऑगस्ट ला सायंकाळी उतरवायचा आहे.

ध्वज संहिता 












Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad