हर घर तिरंगा घरोघरी तिरंगा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव har ghar tiranga gharoghari tiranga swatantryacha amrut mohatsav
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती ठेवत राहाव्यात. स्वातंत्र्यसंग्रामातील अज्ञात नायक / क्रांतिकारक स्वातंत्र्यसंग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे. तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम ठेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी. या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते दिनांक 15 ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
अतिमहत्वाचे
➡️ दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहीमेअंतर्गत शाळांनी दररोज सकाळी ध्वजारोहण करून ध्वजसंहितेच्या नियमानुसार दररोज सायंकाळी पुन्हा ध्वज उतरवायचा आहे. घरोघरी ध्वजारोहण करताना 13 ऑगस्ट ला सकाळी ध्वजारोहण केल्यानंतर तो ध्वज 15 ऑगस्ट ला सायंकाळी उतरवायचा आहे.
शासन निर्णय pdf
शासन निर्णया २१ /०७/२२ नुसार दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२२ ध्वजारोहण करायचे आहे .त्याबाबत अधिक माहिती खालील pdf मध्ये मिळेल.⬇️
21 जुलै निर्णय pdf.
ग्रामविकास विभागाने दि २१ जुलै 2022 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार....
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती ठेवत राहाव्यात. स्वातंत्र्यसंग्रामातील अज्ञात नायक / क्रांतिकारक स्वातंत्र्यसंग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे. तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम ठेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी. या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते दिनांक 15 ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या अनुषंगाने खालील संदर्भीय पत्र क्रमांक दोन व तीन अन्वये सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आले आहेत. या संदर्भात दिनांक 17 2022 रोजी मान्य केंद्रीय गृहमंत्री यांच्या
ध्वज फडकवताना कोणती काळजी घ्यावी ?
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घरोघरी तिरंगा कार्यक्रम दिनांक १३ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर, तसेच सर्व शासकीय/निमशासकीय / खाजगी अस्थापना/सहकारी संस्था/शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करणे अपेक्षित आहे,
२. घरोघरी तिरंगा कार्यक्रमात दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२२ हे तीन दिवस घरोघरी तिरंगा फडकवताना दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरावयाची आवश्यकता नाही.
कार्यालयांना यासंबंधी ध्वज संहिता पाळावी लागेल.
३. राज्याच्या मागणीनुसार केंद्र सरकारकडून केवळ तिरंगा झेंडा उपलब्ध होणार असून, त्यासोबत काठीमिळणार नाही. काठीची व्यवस्था स्थानिक स्तरावर करावयाची आहे.
४. घरोघरी तिरंगा🇮🇳 कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सुचना व नियमावलीबाबत लोकांमध्ये जनजागृतीसाठी स्थानिक स्तरावर माहिती, शिक्षण व संवाद उपक्रमांचे आयोजन करावे, त्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा माहिती अधिकारी यांची मदत घेऊन स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये बातम्या, लोकल केबल, रेडीओ चॅनल, सोशल मीडिया, होर्डिंग्स, बॅनर इ. मार्फत प्रचार प्रसिध्दी करावी.
घरोघरी तिरंगा कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिध्दीसाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वेबसाईटवर IEC साहित्य उपलब्ध असून, https://mahaamrut.org/Downloads.aspx या लिंकवरून माहिती, शिक्षण व संवाद (TEC) साहित्य डाउनलोड करावे व त्याचा यथोचित उपयोग करावा.