मुंबईतील ऐतिहासिक स्थळे मराठी माहिती | Mumbaitil etihasik sthale marathi mahiti
नमस्कार शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशील पर्वानिमित्त दि. 12 मार्च 2021 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन केंद्र व राज्यशासनाने सुचविल्याप्रमाणे बृहन्मुंबई मनपा क्षेत्रातील शाळांमध्ये ऐतिहासिक स्थळांना भेटी
या विषयी माहिती आज पाहाणार आहोत.
मुंबईतील ऐतिहासिक स्थळे मराठी माहिती |
मुंबईतील ऐतिहासिक स्थळे मराठी माहिती
मनपा ऐतिहासिक स्थळांबाबत यादी उपलब्ध करून घ्यावी व त्यानुसार भेटीचे नियोजन करावे (यात शालेय विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीच्या भेटी देणे.) तसेच वारसा स्थळ, पुरातत्व इमारतीचे महत्व विशद करणे, अनसंग हिराबाबत / वारसा
स्थळांबाबत इतिहास या विषयातील तज्ज्ञ शिक्षकांमार्फत माहिती देणे.
मुंबईतील ऐतिहासिक स्थळे यादी
१) छत्रपती शिवाजी टर्मिनस
२) राजाबाई टॉवर
३) गेट वे ऑफ इंडिया
४) बृहन्मुंबई महानगरपालिका
५) फ्लोरा फाउंटन / हुतात्मा चौक
६) मुंबई उच्च न्यायालय
७) पॅगोडा
८) मुंबई विद्यापीठ
मुंबईतील ऐतिहासिक स्थळे व माहिती
१) छत्रपती शिवाजी टर्मिनस
ज्या स्थानकापासून मुंबईची लाइफलाइन अर्थात मुंबई रेल्वे धावते ते स्थानक म्हणजे छ. शिवाजी महाराज टर्मिइनस. मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंमध्ये या स्थानकाचा प्रथम क्रमांक लागतो. इ.स. १८८७ मध्ये राणी व्हिक्टोरियाने राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त या स्थानकाची निर्मिती केली होती. प्रथम हे स्थानक व्हिटी अर्थात व्हिक्टोरिया टर्मिनस या नावाने ओळखलं जायचं. मात्र, त्यानंतर या स्थानकाचं नामांतरण करण्यात आलं. आजच्या घडीला हे स्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे सीएसएमटी म्हणून ओळखलं जातं.
२. राजाबाई टॉवर -
मुंबईतील सर्वात चर्चेत राहणारी वास्तू म्हणजे राजाबाई टॉवर. लंडनमधील बिग बेन टॉवरप्रमाणे दिसणारी ही वास्तू ब्रिटीश अभियंता जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आली. १८७० मध्ये हा टॉवर उभारण्यात आला असून त्याची उंची २३० फूट इतकी आहे. हा टॉवर चर्चगेट स्थानकाजवळी परिसरात आहे.
३)गेट वे ऑफ इंडिया
पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असलेलं ठिकाण म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. अनेक भारतीयांप्रमाणेच विदेशी नागरिकदेखील खास या ठिकाणाला भेट देतात. इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स ऑफ वेल्स (नंतरचे पाचवे जॉर्ज) भारत भेटीला आल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी हे प्रवेशद्वार तयार करण्यात आलं होतं.
४. बृहन्मुंबई महानगरपालिका
-सामान्यांपासून राजकीय व्यक्तींपर्यंत सगळ्यांमध्ये कायमच मुंबई महानगरपालिकेची चर्चा रंगत असते. १८९३ मध्ये देशात पहिली बृहन्मुंबई महानगरपालिका स्थापन करण्यात आली. महानगरपालिकेची ही प्रचंड मोठी इमारत असून त्याची रचना अत्यंत कल्पकतेने करण्यात आली आहे.
५. फ्लोरा फाऊंटन/ हुतात्मा चौक -
मुंबईतील आकर्षण म्हणून ओळखलं जाणारं ठिकाण म्हणजे फ्लोरा फाऊंटन. आता ही वास्तू हुतात्मा चौक या नावाने प्रसिद्ध आहे. मुंबईतील फोर्ट विभागातील हा एक चौक असून इ.स.१८६४ मध्ये तो तयार करण्यात आला आहे.डेव्हिड ससून यांनी त्यांच्या मरण पावलेल्या फ्लोरा या मुलीच्या स्मणार्थ हे स्मारक तयार केलं होतं. याच ठिकाणी मुंबईचा समावेश महाराष्ट्रात व्हावा यासाठी बलिदान देणाऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठीदेखील स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे.
६. मुंबई उच्च न्यायालय-
मुंबईतील ऐतिहासिक वास्तू म्हणजे मुंबई उच्च न्यायालय. सर्वात जुन्या न्यायालयांपैकी एक म्हणून ते खासकरुन ओळखलं जातं.
७. पॅगोडा -
मुंबईपासून किंचित अंतरावर असलेल्या गोराई परिसरात ही वास्तू आहे. २००० साली ही वास्तू उभारण्यात आली असून गौतम बुद्धांच्या स्मृतीचिन्हांचा संग्रह आणि जपणूक करण्यासाठी याची निर्मिती करण्यात आली आहे. ही वास्तू प्रचंड मोठी आहे. त्यामुळे येथे एकाच वेळी हजारांपर्यंत लोक सहज बसू शकतात. तसंच या वास्तूचं वैशिष्ट्य म्हणजे ती कोणत्याही आधारस्तंभाशिवाय उभी आहे.
८) मुंबई विद्यापीठ -
भारतातील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी मुंबई विद्यापीठाचा समावेश करण्यात येतो. मुंबईतील फोर्ट परिसरात या विद्यापीठाची मुख्य वास्तू असून सांताक्रुझ येथे दुसरं संकुलदेखील आहे. फोर्टमधील मुख्य इमारत गॉथिक शैलीत बांधल्याचं म्हटलं जातं.
Inside wagers could be placed with both on line casino cheques or roulette chips. Only one participant per color is allowed to play on line casino checks on the within at any given time. The roulette wheel color scheme is purple, black and green. In American roulette, there are 18 purple spaces, 18 black spaces and two green spaces. In single zero—and European—roulette, there simply one|is solely one} green space. Roulette is a playing recreation, the place a little ball rolls round a wheel and people people|and folks} guess on 바카라사이트 what quantity it'll land on.
ReplyDelete