Type Here to Get Search Results !

स्वराज्य महोत्सव उपक्रम मराठी माहिती | swaraj mahotsav upkram marathi mahiti

 स्वराज्य महोत्सव उपक्रम मराठी माहिती | swaraj mahotsav upkram marathi mahiti

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशील पर्वानिमित्त दि. 12 मार्च 2021 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन केंद्र व राज्यशासनाने सुचविल्याप्रमाणे बृहन्मुंबई मनपा क्षेत्रातील शाळांमध्ये आयोजित करण्यात येत आहेत. जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढयाच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरुपी मनात राहावी व त्यांचे संस्मरण व्हावे या उद्देशाने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दि. 9 ऑगस्ट 2022 ते दि. 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये महापालिका क्षेत्रात "स्वराज्य महोत्सव" अंतर्गत विविध स्तरावर नियोजनबद्ध उपक्रम आयोजित करावयाचे आहेत.

स्वराज्य महोत्सव उपक्रम मराठी माहिती


स्वराज्य महोत्सव उपक्रम मराठी माहिती  

उपक्रम 

1. शालेय स्पर्धाचे आयोजन - शालेयस्तरावरुन विविध स्पर्धा, निबंध / वक्तृत्व/चित्रकला, प्रश्नमंजूषा, वादविवाद, पारंपरिक खेळ, रांगोळी, गायन स्पर्धाचे उपरोक्त कालावधीत आयोजन करण्यात यावे. 

2. वारसा स्थळ भेटी - वारसा स्थळ भेटी समितीच्या भेटी द्याव्यात. मनपा क्षेत्रातील ऐतिहासिक स्थळांना शालेय विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन

3. प्रदर्शने मनपा क्षेत्रातील स्वातंत्र्य चळवळींशी निगडीत चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात यावे.

4. हर घर तिरंगा - दि.11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत स्वराज्य, महोत्सवानिमित्त प्रत्येक नागरिकाने आजादी का अमृत महोत्सवमधील 'हर घर तिरंगा' या उपक्रमात सहभागी होणे आवश्यक राहिल.

5. सांस्कृतिक कार्यक्रम -  दि. 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत स्वराज्य महोत्सवानिमित्त मनपाशाळांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. त्यासोबतच देशभक्तीपर विचारांचा कार्यक्रम सादर करावा. 

swaraj mahotsav upkram marathi mahiti

स्फुर्तीदायी गीतगायनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे.. 

6. प्रभात फेरी  - दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीचे आयोजन करण्यात यावे. सकाळी 7.00 वा. सदरील प्रभातफेरी सुरु होईल. शालेय परिसरातील मुख्य रस्त्यावरुन ही प्रभातफेरी मार्गक्रमण करेल, यावेळेस विद्यार्थ्यांच्या हातात क्रांतीकारकांचे नावे असलेले फलक, अनसंग हिरो यांची नावे / फोटो असणारे फलक देण्यात यावे.

7. आजादी का अमृत महोत्सव आकाम (AKAM) लोगो शालेय इमारतीच्या दर्शनी भागावर लावणे. 

8. कार्यालय / शाळा/परिसर स्वच्छता दि. 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत स्वराज्य महोत्सवानिमित्त कार्यालय/ शाळा/परिसर आदींची स्वच्छता करण्यात यावी.

9. शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात यावे..

🇮🇳घरोघरी तिरंगा हर घर तिरंगा🇮🇳

10. शालेय व्यवस्थापन समिती मातापालक संघ यांची विशेष बैठक दि. 8 ऑगस्ट 2022 रोजी शालेय स्तरावर आयोजित करावी. यावेळी दि.9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य महोत्सव' तयारीबाबत चर्चा करावी. शालेय स्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन करावे. अमृत महोत्सवाचे महत्त्व विशद करून त्यामध्ये विशेषत्त्वाने ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी यांनी सहभाग घेण्याबाबत आवाहन करण्यात यावे,

11. पर्यावरण संवर्धन शपथ पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असल्याने पर्यावरणाचा -हास होऊ नये वृक्ष लागवड करावी आणि प्लास्टिक बंदी करावी यासाठी सर्वांनी शपथ घेणे अपेक्षित आहे. आम्ही नागरिक शपथ घेतो की, "आम्ही निसर्गाचे रक्षण करु, प्लास्टिक वस्तू वापरणार नाही, वृक्ष लागवड करुन आणि त्यांचे संवर्धन व जतन करू."


12. किशोरी मेळावे शाळेतील अंगणवाडी सेविका / मदतनीस, आशा वर्कर, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ यांच्या सहकार्यातून किशोरी मेळाव्यांचे आयोजन करावे. आरोग्य विषयक माहिती तसेच समुपदेशन यामध्ये अंतर्भूत असावे. योग्य व सकस आहार, बालविवाहाचे दुष्परिणाम यावरही अशा मेळाव्यातून चर्चा करण्यात यावी.

13. दि. 17 ऑगस्ट 2022 स्वराज्य महोत्सव सांगता समारोप स्वराज्य फेरी, देशभक्तीपर चित्रपट दाखविणे, स्वराज्य महोत्सव सांगता समारोप करताना प्रभात फेरीचे आयोजन करावे. वरीलप्रमाणे सर्व शाळांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करून त्याबाबतचा अहवाल शाळांनी शहर साधन केंद्रास सादर करावा व शहर साधन केंद्र स्तरावरुन संकलित अहवाल जिल्हा कार्यालयास वि. 20.08.2022 पर्यंत सादर करावा.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad