स्वातंत्र्य दिन २०२२ मराठी निबंध लेखन | swatantra din 2022 marathi nibandha lekhan
स्वातंत्र्य दिन २०२२ मराठी निबंध लेखन |
नमसकार आज आपण आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या महान नेत्यांनी क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले अशा अनसंग हिरो स्वातंत्र्य दिन २०२२ निबंध लेखन पाहाणार आहोत.
स्वातंत्र्य दिन २०२२ मराठी निबंध लेखन
आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या महान नेत्यांनी क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले अशा सर्वांना वंदन करून मी माझ्या निबंधाला सुरुवात करत आहे . मित्रांनो ” भा ” या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे का ? ” भा ” म्हणजे तेज आणि ” रत ” म्हणजे रममाण झालेला . तेजात रममाण झालेला देश म्हणजे भारत देश होय . आपल्या भारत देशामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक एकजुटीने राहतात . त्यामुळे आपला देश सर्वधर्मसमभाव असलेला देश म्हणून ओळखला जातो .
भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत अशा प्रतिज्ञा आपण अभिमानाने आणि गर्वाने करतो . ही प्रतिज्ञा आपण आज म्हणू शकतो कारण आपल्या महान नेत्यांनी ,क्रांतिवीरांनी ब्रिटीशांशी लढून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतातील हजारो शूरविरांनी अथक संघर्ष करावा लागला होता .
गूंज रहा है दुनिया में भारत का नगाड़ा,
चमक रहा आसमान में देश का सितारा,
आजादी के दिन आओ मिलकर करें दुआ,
बुलंदी पर लहराता रहे तिरंगा हमारा।
देशातील हजारो शूर वीरांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली . या अन्यायाच्या व अत्याचाराच्या विरोधात लोकमान्य टिळक ,महात्मा गांधी ,पंडित जवाहलाल नेहरू ,भगतसिंग ,चंद्रशेखर आजाद ,सरदार वल्लभभाई पटेल ,वीर सावरकर ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक शूर वीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले . मंगल पांडे , सुभाष चंद्र बोस , राजगुरू ,सुखदेव , लाला लजपतराय , झाशी ची राणी लक्ष्मीबाई व अनके महिला क्रांतिकारक अश्या हजारो शूर वीरांनी , क्रांतीकारांनी देशासाठी खूप मोठे योगदान आहे. आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला .
swatantra din 2022 marathi nibandha lekhan
या संपूर्ण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दिल्लीवरुन टेलिविजन व रेडिओवर करण्यात येते . संपूर्ण देशातील शाळा, महाविद्यालय ,खाजगी आणि सरकारी कार्यालयांमध्ये राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो . या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये निबंध, भाषण, गायन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते . स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात येतात. विद्यार्थ्यांना खाऊ दिला जातो आणि त्यानंतर सुट्टी दिली जाते . संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण असते . अशाप्रकारे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. आज सर्व शहरात ,तालुक्यात ,गावात ध्वजारोहण केले जाते रा. ष्ट्रगीत गायले जाते . भारतात सर्वत्र भाषणे , प्रभातफेरी यांचे आयोजन केले जाते
आपण सर्वजण खूप नशीबवान आहोत की स्वतंत्र अशा भारत देशामध्ये आपला जन्म झाला आहे. त्या शूर वीरांच्या बलिदानामुळेच आपण आज शांत आणि सुंदर आयुष्य जगू शकत आहोत . आजचा हा सुवर्णकाळ आपण इथे आनंदाने उत्साहाने साजरा करत आहोत . कारण आपल्या देशाचे वीर जवान तिकडे सीमेवरती स्वतःचा जीव धोक्यात घालून शत्रूशी सामना करत आहेत. या सैनिकांना माझा सलाम . आज आपला भारत देश आणि शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान ,खेळ, व्यापार अशा अनेक क्षेत्रात मोलाचे काम करत आहे .
दिवसेंदिवस देश प्रगतीपथावर जात आहे . परंतु समाजात गुन्हेगारी ,भ्रष्टाचार ,गरिबी आणि अस्वच्छता यांचे प्रमाण वाढत आहे . भारताचे एक नागरिक म्हणून देशाच्या विकासासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत . वाईट लोकांपासून आणि वाईट गोष्टी पासून आपल्या देशाचे संरक्षण केले पाहिजे . सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने काम करून भारत देश जगातील सर्वोत्कृष्ट देश बनवणे हे आपले कर्तव्य आहे.