एसएससी एच एस सी मार्च 2023 परीक्षा वेळापत्रक |SSC HSC March 2023 Exam Time Table | दहावी बारावी मार्च २०२३ परीक्षा वेळापत्रक
एसएससी एच एस सी मार्च 2023 परीक्षा वेळापत्रक |
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मार्च मध्ये होणाऱ्या दहावी बारावी एसएससी एच एस सी मार्च 2023 परीक्षा वेळापत्रक SSC HSC March 2023 Exam Time Table दहावी बारावी मार्च २०२३ परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक आज जाहिर करण्यात आले .
चला तर मार्च मध्ये होणाऱ्या परीक्षा चे वेळापत्रक पाहू या व अभ्यासाचे नियोजन करूया.
एसएससी एच एस सी मार्च 2023 परीक्षा वेळापत्रक |SSC HSC March 2023 Exam Time Table | दहावी बारावी मार्च २०२३ परीक्षा वेळापत्रक
आज सर्व दहावी बारावी मुलांसाठी आनंदाची खुश खबर आहे .महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
दहावी बारावी मार्च २०२३ परीक्षा कधी ?
यावर्षी HSC एच एस सी बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीला होणार आहे .
एस एस सी SSC दहावीची परीक्षा २ मार्चला सुरू होणार आहे.
SSC HSC March 2023 Exam Time Table
राज्य मंडळाने जाहीर केलेले सविस्तर संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या 'www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
दहावी बारावी मार्च २०२३ परीक्षा वेळापत्रक
संभाव्य वेळापत्रकांची सुविधा फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि महाविद्यालयांना कळविण्यात येईल, असे ओक यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसाच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात, असेही राज्य मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.