महाराष्ट्र पोलीस भरती 2022 संपूर्ण परीक्षा माहिती | maharashtra police bharati 2022 sampurna Exam information
नमस्कार मित्रांनो या महिन्यापासून ज्याची आपण सर्व वाट पाहत होता ते म्हणजे पोलीस भरती चे फॉर्म भरणे ९ नोव्हेंबर पासून सुरू झाले आहे . फॉर्म भरून झाल्या नंतर महत्वाचे म्हणजे परीक्षा. Maharshtra police bharati 2022Exam information महाराष्ट्र पोलीस भरती 2022 परीक्षा स्वरूप माहीत असणे गरजेचे आहे . या विषयी माहिती आज आपण पाहणार आहोत.
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 संपूर्ण परीक्षा माहिती |
महाराष्ट्र पोलीस भरतीचे दोन टप्पे असतात एक म्हणजे शारीरिक चाचणी व दुसरी लेखी परीक्षा. महाराष्ट्र पोलिस भरती 2022 साठी परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 संपूर्ण परीक्षा माहिती (toc)
१) शारीरिक चाचणी
२) लेखी परीक्षा
शारीरिक चाचणी - महाराष्ट्र पोलीस भरती 2022 संपूर्ण परीक्षा माहिती
पोलीस शिपाई :
पुरुष :
1600 मीटर धावणे : 20 गुण
100 मीटर धावणे : 15 गुण गोळाफेक : 15 गुण
एकूण गुण : 50 गुण
महिला :
800 मीटर धावणे : 20 गुण
100 मीटर धावणे : 15 गुण
गोळाफेक : 15 गुण
एकूण गुण - 50
चालक पोलीस शिपाई :maharashtra police bharati 2022 sampurna Exam information
चालक पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालीलप्रमाणे ५० गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल.
पुरुष उमेदवार :
1600 मीटर धावणे : 30 गुण
गोळाफेक : 20 गुण
पोलीस शिपाई चालक पदाकरीता कौशल्य चाचणी :
शारीरिक चाचणी झाल्यानंतर शारिरीक चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना, वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी खालीलप्रमाणे द्यावी लागेल. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल.
महाराष्ट्र पोलीस भरती पुस्तके व त्यांची नावे.
कौशल्य चाचणीमध्ये पुढील चाचण्यांचा समावेश असेल : :
(अ) हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी : २५ गुण .
(ब) जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी : २५ गुण
कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकुण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत.
एकूण गुण : 50 गुण
महिला :
800 मीटर धावणे : 30 गुण
गोळाफेक : 20 गुण
एकूण गुण : 50 गुण
लेखी परीक्षा 2022 पोलीस भरतीmaharashtra police bharati 2022 sampurna Exam information
लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल:
१) अंकगणित; (एकूण प्रश्न 25, एकूण गुण 25)
२) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी; (एकूण प्रश्न 25,
एकूण गुण 25 )
३) बुध्दीमत्ता चाचणी; (एकूण प्रश्न 25, एकूण गुण 25)
४) मराठी व्याकरण (एकूण प्रश्न 25, एकूण गुण 25)
विषय : गणित
महत्वाचे घटक : संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, मसावि आणि लसावि, दशांश अपूर्णांक, वर्गमूळ घनमूळ, गुणोत्तर प्रमाण, पदावली, काळ-काम-वेग, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, नफा-तोटा, वयवारी, बेरीज, वजाबाकी,व्यवहारी अपूर्णांक, घातांक, काळ-काम-वेग, सरासरी,
शेकडेवारी, भूमितीतील संकल्पना, परिमाणे.
विषय : मराठी व्याकरण
महत्वाचे घटक : मराठी व्याकरण (वाक्यरचना, शब्दार्थ,प्रयोग, समास, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द म्हणी व वाकप्रचार वाक्यात उपयोग, शब्दसंग्रह,समूहदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे, ध्वनीदर्शक शब्द, प्राणी व त्यांची पिल्ले ,प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक
विषय : सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी
महत्वाचे घटक : इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक
विषय : बौद्धिक चाचणी
महत्वाचे घटक : क्रमबध्द मालिका, संख्या संचातील अंक शोधणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्यांमधील अंक शोधणे, वेन आकृती, कालमापन (दिनदर्शिका), रांगेवर आधारित प्रश्न, सांकेतिक लिपी किंवा भाषा, विसंगत पद ओळखणे, विधाने व अनुमाने, आकृतीची आरशातील प्रतिमा, आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब, दिशा व अंतर, घड्याळ, नाते संबंधांची ओळख, निरीक्षण आणि आकलन.