Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी | maharashtra police bharati 2022 chalu ghadamodi |Maharashtra Police Recruitment 2022 State National International Current Affairs

 महाराष्ट्र पोलीस भरती 2022     राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय  चालू घडामोडी | maharashtra police bharati 2022 rajya rashtriya antarashtriya chalu ghadamodi| Maharashtra Police Recruitment 2022 State National International Current Affairs

नमस्कार मित्रांनो आज आपण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा घटक महाराष्ट्र पोलीस भरती 2022    राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी maharashtra police bharati 2022 chalu ghadamodi Maharashtra Police Recruitment 2022 State National International Current Affairs पाहणार आहोत.

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय  चालू घडामोडी


महाराष्ट्र पोलीस भरती 2022 चालू घडामोडी(toc)

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी

भारताच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू :-


भारताच्या राष्ट्रपतीपदी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू यांची प्रचंड मताधिक्यांनी निवड झाली त्या भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती (15th President of India) ठरल्या आहेत. द्रोपदी मुर्मू यांनी यूपीए पुरस्कृत उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यावरती सहज विजय प्राप्त केला आहे. या सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला आणि भारताच्या दुसऱ्या महिला आहेत. याआधी प्रतिभाताई पाटील यांना पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला होता. स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या त्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. ६४ वर्षीय द्रौपदी राष्ट्रपती पदावर पोहोचणारी सर्वात तरुण व्यक्ती ठरली आहे. २५ जुलै २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्या. एन.व्ही. रमण यांनी त्यांना शपथ दिली.

या निवडणुकीसाठी ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला होता. देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान पार पडले होते. राष्ट्रपतीपदासाठी ७७१ खासदार आणि ४०२५ आमदारांसह ४७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत एकूण ४७५४ वैयक्तिक मते पडली, ज्यांचे मूल्य १०,७२,३७७ इतके होते. यापैकी द्रौपदी मुर्मू यांना २८२४ वैयक्तिक मते (मूल्य ६,७६,८०३) आणि यशवंत सिन्हा यांना १८७७ वैयक्तिक मते (मूल्य- ३,८०,१७७) मिळाली.

- २० जून १९५८ रोजी ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी क्षेत्रातील ऊपरबेडा गावात जन्मलेल्या द्रौपदी संथाल आदिवासी वांशिक गटातील आहे. त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू आहे. त्यांचा विवाह श्यामाचरण मुर्मू यांच्याशी झाला होता. द्रौपदी यांनी त्यांचा नवरा आणि दोन मुले गमावली आहेत. त्यांना इतिश्री मुर्मू नावाची मुलगी आहे.

- रायरंगपूर विधानसभेतून आमदार निवडून आल्यानंतर त्यांना ओडीशा सरकार मध्ये मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन विभागाचे राज्यमंत्री करण्यात आले होते.. मुर्मू या मे २०१५ ते जुलै २०२१ पर्यंत झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून कार्यरत होत्या.

• सर्वाधिक अंतराने विजय १९५७ राजेंद्र प्रसाद ९९.३% मते, सर्वात कमी

अंतराने विजय १९६९ व्ही. व्ही. गिरी ५०.३% मते.

- देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर व्यक्ती कितीही वेळा बसू शकते. मात्र, आतापर्यंत केवळ राजेंद्र प्रसाद यांनी एकापेक्षा जास्त वेळा हे पद भूषवले आहे. देशाचे पहिले राष्ट्रपती दोनदा निवडून आले. त्यांनी हे पद १२ वर्षांहून अधिक काळ सांभाळले.

- राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पध्दत: एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर

प्रतिनिधित्वाची पध्दत असते. - राष्ट्रपतीचे मतदार : संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे सदस्य तसेच सर्व राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य.

राष्ट्रपतींना दरमहा रू.५ लाख वेतन मिळतो. २०१७ पर्यंत राष्ट्रपतींना दरमहा रू.१.५ लाख वेतन मिळत होते. २०१८ मध्ये ते वाढवून ५ लाख केले गेले. 

maharashtra police bharati 2022 chalu ghadamodi Maharashtra Police Recruitment 2022 State National International Current Affairs 


 भारताच्या १४ व्या उपराष्ट्रपतीपदी जगदीप धनखड :-
 ऑगस्ट २०२२ मध्ये भारताच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत

भाजपप्रणित रालोआकडून (एनडीए) जगदीप धनखड (वय ७१ वर्षे) यांनी विरोधी पक्षांच्या संयुक्त आघाडीच्या मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. १६ व्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत जगदीप धनखड यांची भारताचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली.

- जगदीप धनखड (धनखर) यांनी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांची जागा घेतली. नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपला आणि नवीन उपराष्ट्रपती ११ ऑगस्ट रोजी शपथ घेतली.

- एकूण ७२५ खासदारांनी मतदान केले. ७१० मते वैध ठरली तर १५ मते अवैध ठरली. जगदीप धनखड यांना ५२८ मते मिळाली तर मार्गारेट अल्वा यांना १८२ मते मिळाली.

- धनखड हे मूळचे राज्यस्थानमधील झुंझुनूमधील किठाणा गावातील आहेत, ते राजस्थान उच्च न्यायालयात बार असोसिएशनचे अध्यक्ष होते. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीला उभे राहण्यापूर्वी ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते.

- धनखडे १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत झुंझुनू येथून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी १९९० मध्ये संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. १९९३ मध्ये ते अजमेरमधील किशनगडमधून आमदार झाले.

राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी 2022


महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे:- ३० जून २०२२ रोजी एकनाथ संभाजी शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ते महाराष्ट्राचे पदानुसार ३० वे तर व्यक्ती म्हणून २० वे मुख्यमंत्री बनले.

- एक रिक्षावाला ते राज्याचे ३० वे मुख्यमंत्री असा एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास हा राहिला आहे. ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा (२००९, २०१४ आणि २०१९) आणि तत्पूर्वी पूर्वीच्या एकत्रित ठाणे विधानसभा मतदारसंघातून एकदा (२००४) असे चार वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत. 

- शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. त्यांचे मुळ गाव साताऱ्यातील 'दरे' हे आहे. पुर्वी जावली तालुक्यात असलेले दरे गाव सध्या महाबळेश्वर तालुक्यात येते. 1

• सर्वाधीक काळ मुख्यमंत्री राहण्याचा मान वसंतराव नाईक यांना जातो (सलग ११ वर्षे २ महिने १८ दिवस).

- वसंतराव नाईक यांच्या नंतर ५ वर्षांचा कार्यकाल पुर्ण करणारे देवेंद्र फडणवीस दुसरे मुख्यमंत्री ठरले.

• सर्वात कमी काळ मुख्यमंत्री पद भूषविणारी व्यक्ती देवेंद्र फडणवीस (३ दिवस) • सर्वाधीक ४ वेळा मुख्यमंत्री पद भूषविणारे शरद पवार ठरले आहे. महाराष्ट्राचे सर्वात तरूण मुख्यमंत्री शरद पवार (३८ व्या वर्षी) ठरले. -

 State National International Current Affairs 2022

• महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणीस:-
 ३० जून २०२२ रोजी भाजपा नेते देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते महाराष्ट्राचे पदानुसार १० वे उपमुख्यमंत्री बनले. हे नागपूर शहरातील नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत.

फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी नागपूर येथे झाला. महाराष्ट्रात पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेले नेते उपमुख्यमंत्री झाले आहेत. 
• १९७८ मध्ये महाराष्ट्राला पहिले उपमुख्यमंत्री नासिकराव तिरपुडे लाभले -होते. त्यानंतर सुंदरराव सोळंके, रामराव आदिक, गोपीनाथ मुंडे, भुजबळ, विजयसिंह मोहित पाटील, आर आर पाटील आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आहे. अजित पवार यांनी सर्वाधिक चार वेळा उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आहे. 

maharashtra police bharati 2022 chalu ghadamodi

औरंगाबाद व उस्मानाबादचे नामांतर :-

.औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाला आहे. याशिवाय उस्मानाबाद शहराचे नावही धाराशिव केले जाणार आहे.

• नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील नाव :- 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील

आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यास मान्यता देण्यात आली. 
1 दि. बा. पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. ते रायगड जिल्हातील असून उत्तर कोकणातील शेकापचे नेते होते. २०१३ मध्ये त्यांचे निधन झाले होते. 

• सर्वोच्च न्यायालयाची ओबीसी आरक्षणास मंजूरी :


:- राज्य सरकारने सादर केलेला बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारत सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास मंजुरी दिली आहे. डिसें. २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केले होते.

- बांठिया आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसी राजकीय आरक्षण लागू झाल्याने ओबीसी प्रवर्गातील लोकप्रतिनिधींना महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायतीच्या प्रमुख पदावर काम करण्याची संधी मिळेल. 
महाराष्ट्र राज्याच्या २०२१-२२ च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्यातील ३४ जिल्हा परिषदा, ३५१ पंचायत समित्या, २४१ नगरपालिका, २७ महापालिका, १२८ नगरपंचायती आणि २७, ८३२ ग्रामपंचायती आहेत. 

• सरपंच नगराध्यक्षांची थेट जनतेतून निवड :-

जुलै २०२२ मधील शासन निर्णयानुसार सरपंच व नगराध्यक्षांची निवड ही थेट जनतेतून होणार आहे. ग्रामपंचायत अधिनियम १९५८ यात राज्य सरकारने सुधारणा केली आहे. तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती, व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ सुधारणा करण्यात आली. यापूर्वी ही निवड निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्य/नगरसेवक यांच्यामधून केली जात होती. - महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर येताच नगराध्यक्ष आणि सरपंच यांची
निवडून आलेल्या सदस्यांमधून निवड करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शिंदे- फडणवीस सरकारने हा निर्णय बदलत नगराध्यक्ष आणि सरपंचाची थेट निवड करण्याचा निर्णय घेताना त्यांचा कार्यकालही पाच वर्षांपर्यंत वाढविला आहे. तसेच अडीच वर्षात नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणता येणार नाही. याशिवाय तीन चतुर्थाश सदस्यांनी मागणी केल्याशिवाय नगराध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही, ही सुधारणा या विधेयकाच्या माध्यमातून करण्यात आली. 
- नगराध्यक्षाचा अविश्वास ठरावाचा कालावधी एक वर्षांहून अडीच वर्ष करण्यात येईल. अडीच वर्षानंतरच थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षावर अविश्वास ठरावआणता येईल.











Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad