पोलीस भरती पुस्तके | Police bharati book list 2022 | पोलीस भरती अभ्यासक्रम 2022|Police Recruitment Syllabus 2022
महाराष्ट्र पोलीस 2022(Maharashtra Police) भरतीची तयारी करणारे मित्र मला नेहमीएकच प्रश्न विचारताना दिसतात. की तो म्हणजे Maharashtra Police भरतीसाठी कोणते पुस्तके चांगली आहेत? ( Best Books for maharshtra Police Bharti 2022)
महाराष्ट्र पोलीस Maharashtra Police भरतीची Book List बनवताना मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या पुस्तकांची यादी पाहिले असता कोणते पुस्तके विकत घ्यायचे असा प्रश्न निर्माण होतो ? कोणती पुस्तके चांगली आहेत हे ठरवताना खूप गोंधळ होतो.
त्या नंतर मंग आपण आपल्या आधी ज्यांनी तयारी सुरू केली आहे किंवा आपल्याला असे वाटते ज्यांचा अभ्यास चांगला आहे अशा मित्रांना कोणते पुस्तक विकत घेऊ असा प्रश्न विचारतो आणि या प्रश्नाचे उत्तर म्हणून प्रत्येकजण वेगवेगळ्या पुस्तकाचे नाव सांगतो असतो.परंतु म्हणून मी सर्व पुस्तकं विकत घ्यायची का? तर बिलकुल नाही.
मग नेमके कोणते पुस्तक विकत घ्यायचे हे कसं ठरवायचं? कोणीतरी सांगतो म्हणून पुस्तक विकत घेणे हे खरंतर चुकीचे आहे.
आपण अभ्यासाच्या कोणत्या पायरीवर आहोत याचा विचार करून जर तुम्ही पुस्तक विकत घेतले तरच त्या पुस्तकाचा तुम्हाला फायदा होईल.
तुमचा अभ्यास किती झाला आहे, तुम्ही नुकतीच सुरुवात केली आहे की अजून त्याच्यापुढे जाऊन तुमची तयारी सुरू आहे याचा विचार करून काही पुस्तकांची यादी तयार केलेली आहे. जेणेकरून तुम्हीला ते सहज उपलब्ध होतील.
महाराष्ट्र पोलीस भरती पुस्तके 2022(toc)
योग्य पुस्तकांची निवड अत्यावश्यक आहे. यामुळे आपला कमीतकमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास होतो. एक चांगले पुस्तक आपल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीला वेग प्रदान करते. या लेखात subject wise Maharashtra Police Bharti Book List 2022 दिली आहे ज्याचा अभ्यास करून आपण परीक्षेत चांगले मार्क्स मिळवू शकता.
महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम 2022 - विषय subject
महाराष्ट्र पोलीस भरती साठी कोण कोणत्या विषयांवर प्रश्न विचारले जातात ते पाहू.
१) अंकगणित; (एकूण प्रश्न 25, एकूण गुण 25)
२) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी; (एकूण प्रश्न 25,एकूण गुण 25 )
३) बुध्दीमत्ता चाचणी; (एकूण प्रश्न 25, एकूण गुण 25)
४) मराठी व्याकरण (एकूण प्रश्न 25, एकूण गुण 25)
एकूण = 100 गुण,
परीक्षा कालावधी 90 मिनिट
महाराष्ट्र पोलीस भरती पुस्तके 2022 | Police bharati book list 2022
१) अंकगणित -
(०५ ते ०८ पाठ्य पुस्तके महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ)
लेखक - १)पंढरीनाथ राणे
२) सामान्य ज्ञान -
लेखक - एकनाथ पाटील.
चालू घडामोडी -
लेखक - देवा जाधवर
३) बुध्दीमत्ता चाचणी -
लेखक - १) अनिल अंकलगी
२) नितीन महाले
४) मराठी व्याकरण -
लेखक - १) मो. रा. वाळंबे.