तलाठी भरती 2023 संपूर्ण माहिती | talathi bharati 2023 sampurn mahiti
महसूल विभागामार्फत राज्यातील तलाठी पदाच्या ४१२२ रिक्त पदांची भरती लवकरच होणार आहे .त्यामध्ये रिक्त असलेली १०१२ आणि नव्याने निर्माण करण्यात आलेली ३११०या पदांचा समावेश असणार आहे.
तलाठी भरती 2023 संपूर्ण माहिती
प्रत्येक गावासाठी एक तलाठी असणे गरजेचे आहे पण सध्या एक तलाठी दोन ते तीन गावांसाठी काम करत आहेत.त्यामुळे ग्रामस्थ व शेतकरी बळीराजा यांचे खूप नुकसान होत आहे तसेच इतर कामांवर त्याचा परिणाम होत आहे ,तसेच तलाठी यांनाही कामाचा बोज्या जास्त होत आहे.
talathi bharati 2023 sampurn mahiti
राज्याचे महसूलमंत्री यांनी ग्रामस्थ व शेतकरी येणाऱ्या समस्यांचा विचार करून हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी मुंबई येथे बैठक घेतली या बैठकीसाठी राज्यातील तलाठी यांना निमंत्रित केले होते.समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आवश्यक ती कार्यवाही करून तलाठी भरती 2023 राबवण्याची सूचना मा. महसूल मंत्री यांनी वरिष्ठ अधिकारी यांना दिली आहे.
विभागनिहाय तलाठी रिक्त पदे
प्रत्येक विभाग निहायरिक्त असलेली पदे खालील प्रमाणे आहेत.
१) नाशिक विभाग - १०३५.
२) औरंगाबाद विभाग - ८४७.
३)कोकण विभाग - ७३१.
४)नागपूर विभाग - ५८०.
५)अमरावती विभाग - १८३
६) पुणे विभाग - ७४६
नाशिक विभागात १०३५, औरंगाबाद विभागात ८४७, कोकण विभागात ७३१, नागपूर विभागात ५८०, अमरावती विभागात १८३ तर पुणे विभागात ७४६ अशा एकूण ४१२२ पदांची
तलाठी जिल्ह्यानुसार रिक्त जागा पाहण्यासाठी खालील pdf Download करा ⬇️