महाशिवरात्री 2023 संपूर्ण माहिती मराठी Mahashivratri 2023 Full Information Marathi
'शिव' म्हणजे शंकर, 'शिव' म्हणजे चांगले, 'शिव म्हणजे मंगल, ' शिव म्हणजे कल्याण. अशा शिवाच्या आराधनेने कल्याणप्रद होणारे व्रत पाळावयाच्या महाशिवरात्रीला शिव आपल्या भक्तांना ज्योतिर्लिंगाच्या रूपाने दर्शन देतो. म्हणूनच आजच्या लेखात आपण महाशिवरात्री 2023 संपूर्ण माहिती मराठी Mahashivratri 2023 Full Information Marathi पाहणार आहोत.
महाशिवरात्री 2023 संपूर्ण माहिती मराठी | Mahashivratri 2023 Full Information Marathi |
महाशिवरात्री 2023(toc)
महाशिवरात्री 2023 संपूर्ण माहिती मराठी कथा
शिव शिव म्हणता वाचे।
मूळ न राहे पापाचे।
ऐसे माहात्म्य शंकराचे।
निगमागम वर्णिती ।।
माघ महिन्यातील अत्यंत मह त्त्वाचा आणि पवित्र दिवस म्हणजे महाशिवरात्र महाशिवरात्र माघ महि न्यात वद्य चतुर्दशीला येते. उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची तीन अंगे आहेत. या दिवशी भगवान शंकराचे माहात्म्य असून याबाबत पुढील कथा प्रचलित विंध्य पर्वताच्या घनदाट अरण्यात एक शिकारी राहत तो शिकार करून आपल्या बायकोमुलांचे पालन- पोषण, उदरनिर्वाह करीत असे.
एके दिवशी हरणांची शिकार करण्यासाठी तो एका झाडावर लघून बसला होता. त्या झाडांच्या पानामुळे त्याला डोळ्यांसमोर काही दिसत नव्हते. म्हणून त्याने नजरेसमोरची बिल्वदले खुडली, आणि योगायोग असा की, त्या झाडाखाली शिवाचे एक मंदिर होते व ते झाडदेखील बेलाचे होते. एवढ्यात समोरून एक हरिणी पाणी पिण्यासाठी आली, तिची चाहूल त्या शिकाऱ्याला लागली.
तो शिकार करण्यासाठी सज्ज झाला. तो बाण सोडणार इतक्यात त्या हरिणीचे लक्ष त्या शिकाऱ्याकडे गेले व तिने त्याला विनवून सांगितले की, ' अरे व्याधा, जरा थांब! मला मारू नकोस. कारण, माझी पाडसे घरी वाट पहात असतील. त्यांची भेट घेऊन येते. मग खुशाल मला मार. 'त्या शिकाऱ्याने हरिणीचे म्हणणे मान्य केले. दुसऱ्या दिवशी ती हरिणी आपल्या छकुल्या बछड्यांसह आली व सांगू लागली, की आता आम्हाला सर्वांना मार. त्या शिकाऱ्याचे मन हेलावले, हृदय द्रवले, त्याला दया आली व त्याने तो विचार सोडून दिला, तेव्हा भगवान शंकर त्या व्याधावर प्रसन्न होऊन घेऊन आले. व त्या व्याधाला हरिणीला व तिच्या बछड्यांना स्वर्गात घेऊन गेले. ते सर्वजण तिथे अत्यंत सुखात राहू लागले. योगायोगाने त्या व्याधाकडून शिवाला बेलाच्या पानांचा अभिषेक झाला होता, आणि शिकार न मिळाल्यामुळे त्याला उपवास घडला होता. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण चतुर्थीस शिवरात्र येते. त्यापैकी माघ वद्य चतुर्दशी मुख्य मानली जाते.
Mahashivratri 2023 Full Information Marathi
चतुर्दशीला शंकराची पूजा करतात. त्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन एकशेआठ कमळे किंवा बेलाची पाने नाममंत्राने वहावी. पूजा झाल्यावर शिवाच्या मस्तकावरील फूल काढून आपल्या मस्तकावर ठेवून क्षमायाचना करावी. या दिवशी सर्व शिवमंदिरात शंकर भोले हर हर महादेव' असा नामघोष निनादत असतो. महादेवाचे व्रत करील त्याला अक्षय सुख मिळेल. शिवरात्रीचे व्रत मानवाला शिव बनण्याची प्रेरणा देते. सकल सुशीला शिवत्वाचा विचार देते. शिव ही ज्ञानाची देवता आहे. महाशिवरात्रीच्या कथेपासून शरण देणाऱ्यांना अभय द्यावे, दुसऱ्याचे वाईट चिंतू नये, सत्याने व न्यायाने वागावे, जे चांगले विचार असतात ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा, दुसऱ्याची निंदा करू नये, सर्वांना मुक्तपणे प्रेम यावे, प्रेम ध्यावे. 'एकमेका करू सहाय्य, अवघे धरू सुपंथ हा बोध घ्यावा.
सोरटी सोमनाथ, श्री शैल महाकालेश्वर, ओंकार मांधाता, परळी वैजनाथ, भीमाशंकर, रामेश्वर या नागनाथ काशीविश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, घृष्णेश्वर ही बारा ज्योतिर्लिंगे भारताच्या पूर्व- पश्चिम, दक्षिण-उत्तर या वेगवेगळ्या भागात आहेत. त्यापैकी भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ व घृष्णेश्वर ही पाच स्थाने आपल्या महाराष्ट्रात आहेत. आपल्या या देशात विविध भाषा, चालीरिती आहेत, पण आमची सांस्कृतिक एकात्मता समान आहे. हेच आमचे राष्ट्रीयत्वाचे प्रतीक आहे, आणि ही बारा ज्योतिर्लिंगे ही आमच्या एकरस समाज- जीवनाची दर्शने आहेत. यातच आमच्या देशाची महानता आहे. 'हर हर महादेव' हा आमच्या अस्मितेच्या जयघोषाचा मंत्र ठरला आहे. 'शिव' म्हणजे शंकर, 'शिव' म्हणजे चांगले, 'शिव म्हणजे मंगल, ' शिव म्हणजे कल्याण. अशा शिवाच्या आराधनेने कल्याणप्रद होणारे व्रत पाळावयाच्या महाशिवरात्रीला शिव आपल्या भक्तांना ज्योतिर्लिंगाच्या रूपाने दर्शन देतो.
शिव शिव म्हणता वाचे।
मूळ न राहे पापाचे।
ऐसे माहात्म्य शंकराचे।
निगमागम वर्णिती ।।