Type Here to Get Search Results !

व्हॅलेंटाईन वीक दिवस डे ड्रेस कोड 2023 माहिती मराठी हिंदी इंग्लिश | Valentine week day dress code 2023 Information Marathi Hindi English

व्हॅलेंटाईन वीक दिवस डे ड्रेस कोड 2023 माहिती मराठी हिंदी इंग्लिश| Valentine week day dress code 2023 Information Marathi Hindi English

 नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपण व्हॅलेंटाईन वीक दिवस डे का साजरा करतात . व्हॅलेंटाईन वीक  ड्रेस कोड  2023 कोण कोणते आहेत तसेच त्या दिवशी कोणत्या भेट वस्तू दिल्या जातात  या विषयी माहिती पाहणार आहे. Valentine week day dress code 2023 Information Marathi Hindi English

प्रेम युगलांचा महिना म्हणून फेब्रुवारी महिना सगळ्यांच्या मनात घर करून बसला आहे .कारण की या महिन्यात प्रेमाचा हप्ता म्हणजे व्हॅलेंटाईन वीक  साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीक मध्ये  दोन मने या सात दिवसात एकत्र येणाचा प्रयत्न सात वेगवेगळ्या प्रकारे करतात असतात. म्हणून याला व्हॅलेंटाईन वीक म्हणतात. आजच्या लेखात आपण व्हॅलेंटाईन वीक दिवस डे ड्रेस कोड 2023 Valentine week day dress code 2023 माहिती पाहणार आहोत.

व्हॅलेंटाईन वीक दिवस डे ड्रेस कोड 2023 माहिती
Valentine week day dress code 2023 Information


व्हॅलेंटाईन वीक 2023(toc)
आपण जीवन जगत असताना सतत सहवासात येणाऱ्या कोणत्याही सजीव व निर्जीव  वस्तू बदल मनामधे निर्माण होणारी आपुलकी किंवा स्नेह म्हणजे प्रेम.

Valentine week व्हॅलेंटाईन वीक 2023 Marathi Hindi English माहिती information

जानेवारी महिना कधी संपतो आणि फेब्रुवारी महिना कधी येतो याची आतुरतेने प्रेम युगल वाट पाहत असतात . कारण आहे व्हॅलेंटाईन वीक. हा  साजरा करताना हा विक कधी पासून सुरू होत आहे हे माहित असणे गरजेचे आहे. चला तर पाहूया व्हॅलेंटाईन वीक कधी पासून सुरू होत आहे.

या मध्ये एकूण सात दिवस असतात .या  दिवशी प्रियसिस किंवा प्रियकर यांना इम्प्रेस करण्यासाठी  वेगवेगळ्या कल्पना करतात.

१) रोझ  डे (गुलाब फुल देणे)
२) प्रपोज डे ( मनातील प्रेमाची भावना व्यक्त करणे)
३) चॉकलेट डे ( प्रिय व्यक्तीस गोड पदार्थ देणे)
४) टेडी डे ( बाहुली भेट देणे )
५) वचन डे ( प्रॉमिस दिवस )
६) आलिंगन डे (प्रिय व्यक्तीस गळे भेट देणे)
७) किस डे ( चुंबन दिवस )
८) व्हॅलेंटाईन डे ( व्हॅलेंटाईन दिवस )

Valentine week day and date  व्हॅलेंटाईन आठवड्याचा दिवस आणि तारीख

१) रोझ डे - 7 फेब्रुवारी

या वर्षी व्हॅलेंटाईन वीक ची सुरुवात दिनांक 7 तारखेपासून पासून होत आहे. प्रेमाची सुरुवात गुलाबाचे फुल दिले जाते .कारण की प्रेम नेहमी फुलासारखे ताजेतवाणे व सुगंधित सतत राहावे. या साठी रोझ गुलाबाचे फुल दिले जाते.
' स्वप्नातील साज ती घेऊन आली 
न सांगताच ती माझ्या मनाची झाली ".

२) प्रपोज डे - 8 फेब्रुवारी 

    प्रेमाची सुरुवात ही फुलाने केली ते फुल असेच फुलत राहावे म्हणून आपल्या भावना पुढील व्यक्ती पर्यंत पोहचणे गरजेचे आहे . या साठी व्हॅलेंटाईन वीक मधील दुसरा  दिवस प्रपोज डे असतो. या दिवशी  प्रिय व्यक्तीस आपल्या मनातील भावना व्यक्त करून दाखवने.आपल्या प्रिय व्यक्तीस निसर्गरम्य ठिकाणी फिरायला घेऊन जाणे त्याच्या सोबत वेळ घालवणे .
हृदय  आता तिच्या
 शिवाय धडकेना ...
का माझ्या प्रियेला
प्रित कळेना ....

३) चॉकलेट डे ( प्रिय व्यक्तीस गोड पदार्थ देणे)-9 फेब्रुवारी

 मनातील भावना बोलून झाले की  एक नव्या जगात राहत असल्याचा आनंद मनात निर्माण झालेला असतो. आपल्या प्रिय व्यक्तींसाठी काय करावे असे वाटत असते. या पुढील दिवस म्हणजे चॉकलेट डे ( प्रिय व्यक्तीस गोड पदार्थ देणे) व्हॅलेंटाईन वीक मधील तिसरा दिवस  नात्यातील गोडवा सतत वाढत राहावा म्हणून या दिवशी चॉकलेट दिले जाते. 
 माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू
काय सांगू तू आहेस कोण 
फक्त हा देह माझा आहे 
त्यातील जीव  आहेस तू  ....

४) टेडी डे ( बाहुली भेट देणे ) - १० फेब्रुवारी 


व्हॅलेंटाईन वीक मधील चौथा दिवस टेडी डे म्हणजे आपले मन , शब्द , छाया प्रतिबिंब सतत आपल्या प्रिय व्यक्ती च्या नजरेसमोर राहावे क्षण क्षण आपल्या विचारात राहावे म्हणून या दिवशी एक छोटी सी बाहुली भेट दिली जाते.  
प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधी ही न हरवणारी जीवनाची वाट
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न ...

५) वचन डे ( प्रॉमिस दिवस ) - ११ फेब्रुवारी

व्हॅलेंटाईन वीक मधील पहिल्या दिवशी गुलाब देऊन प्रेमाच्या दुनियेत आलेल्या आपल्या प्रियकर व प्रियसीस आयुष्य भर आपण एक आहोत आणि जीवन भर असेच हसत  खेळत एकत्र राहू असे सांगण्याचा हा दिवस म्हणजे वचन डे ( प्रॉमिस दिवस ).

" तू ते प्रेम आहेस ज्याचा कधीच शेवट नाही होणार
आणि तुलाभेटण्याची वाट मी जन्म भर बघत राहणार "....

६) आलिंगन डे (प्रिय व्यक्तीस गळे भेट देणे) - १२ फेब्रुवारी

व्हॅलेंटाईन वीक मधील सर्वात महत्त्वाचा दिवस  या दिवशी राग , लोभ, एकमेकांच्या चूक विसरून  एकमेकांना मिठ्ठी मारतात. याला आलिंगन डे असे म्हणतात.

" पुरे झाले चंद्रसूर्य
 पुऱ्या झाल्या तारा
पुरे झाले नदीनाले 
पुरे झाला वारा ..

मोरासारखा छाती काढून उभा रहा 
जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा 
सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा"..

७) किस डे ( चुंबन दिवस ) - १३ फेब्रुवारी 

व्हॅलेंटाईन वीक मध्ये १३ फेब्रुवारी हा दिवस किस डे  चुंबन दिवस म्हणून साजरा करतात. या  मुळे नाते एकदम घट्ट बनते. आपुलकी चे बंध निर्माण होतात.
 
"तेज असावे सुर्यासारखे
प्रखरता असावी चंद्रासारखी
     शीतलता असावी चांदण्यासारखी
       प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी"..

८) व्हॅलेंटाईन डे ( व्हॅलेंटाईन दिवस ) - १४ फेब्रुवारी 

व्हॅलेंटाईन वीक मधील १४ फेब्रुवारी हा दिवस  ( व्हॅलेंटाईन दिवस ) म्हणून साजरा करतात . प्रेम युगलांसाठी हा दिवस अविस्मरणीय असतो. कारण या दिवशी  दोघेही मनाने ,विचाराने एकत्र आलेले असतात. एकमेकांना त्यांनी स्वीकारले ले असते.
आयुष्यभर कोणासाठी थांबणे 
म्हणजे प्रेम..
कोणीतरी असल्याचा आनंद
    म्हणजे प्रेम ..
                    आठवण आली की ओठांवर आलेले हसू 
म्हणजे प्रेम ..
त्या भावनांनी रात्रभर जागून राहणे 
  म्हणजे प्रेम ..
शेवटपर्यंत जे न विसरता येणारे 
  म्हणजे प्रेम ..
जिवापाड काळजी घेणारे म्हणजे प्रेम..

व्हॅलेंटाईन डे २०२३  दिवस म्हणजे काय ?

व्हॅलेंटाईन डे दिवस म्हणजे प्रेमाची कबुली होकार देणारा (डे)दिवस आहे .हा दिवस  संत व्हॅलेंटाईन यांचा बलिदान दिवस म्हणून ही साजरा करतात.

व्हॅलेंटाईन डे  का साजरा केला जातो .व्हॅलेंटाईन माहिती मराठी 

व्हॅलेंटाईन वीक , डे हा संत  व्हॅलेंटाईन यांच्या स्मरणार्थ हा दिवस दर वर्षी  साजरा केला जातो.

इ. स. तिसऱ्या शतकामध्ये रोम देशाचा राजा क्लॉडियस याचे शासन त्या ठिकाणी होते . शक्तिशाली देशाचे नेतृत्व ते करत होते आपला देश अधिक सामर्थ्यवान व शक्तिशाली बनवा या साठी  चपळ शिपाई ,सैनिक तयार करायचे होते. या साठी त्यांनी आदेश काढला की कोणताही अधिकारी ,शिपाई ,सैनिक लग्न करणार नाही . क्लॉडियस राजाचे म्हणणे होते की लग्न केले की पुरुष चांगले सैनिक होऊ शकत नाहीत. 
क्लॉडियस राजाचा हा आदेश संत व्हॅलेंटाईन यांना मान्य नव्हता. तसेच हा आदेश जनतेवर अन्यायकारक आहे.असे त्यांचे मत होते.या आदेशाला त्यांनी विरोध केला .

व्हॅलेंटाईन यांनी अनेक अधिकारी ,सैनिक ,शिपाई , तरुण प्रेम युगलांचे लग्ने लावून दिली. लोकांनी लग्ने करावी या साठी ते त्यांना प्रोत्साहन देत होते.

संत व्हॅलेंटाईन यांचे कार्य चांगले होते . त्यांच्या कार्याची ख्याती रोम देशात पसरली होते. असेच एक प्रेमी जोडपे त्यांना भेटायला आले आणि आमचे लग्न लावा असे सांगितले . संत व्हॅलेंटाईन यांनी या दोन प्रेमी युगलांचे लग्न लावून दिले.
 संत व्हॅलेंटाईन यांनी आपला आदेश मोडला असे राजाला समजल्या नंतर संत  व्हॅलेंटाईन  यांना अटक करण्यात आले. तरी लोक त्यांना भेटायला येत असे .येताना भेट वस्तू म्हणून फुल , मिठाई , इ . घेऊन येत असे.
एके दिवशी संत व्हॅलेंटाईन ज्या जेल मध्ये होते त्या जेलचा जेलर एस्टेरियस त्यांना भेटण्यास आला व म्हणाला की माझ्या  मुलीला तुम्हाला भेटायचे . 

जेलर ची मुलगी व्हॅलेंटाईन ला भेटीली त्या दिवसापासून दोघांमध्ये घट्ट मैत्री निर्माण झाली.त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये झाली . 

व्हॅलेंटाईन यांना १४ फेब्रुवारी २६९ इसवी ला फाशी देण्यात आली . त्यांच्या स्मरणार्थ १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करतात.

Valentine week day dress code 2023 Information Marathi Hindi English

व्हॅलेंटाईन डे वीक साजरा करत असताना आपण कोणते कपडे परिधान केले पाहिजेत ही माहिती असणे खूप गरजेचे आहे .  Dress code नुसार पुढील व्यक्तीच्या मनात काय चालले आहे हे परिधान केलेल्या रंगीत कपड्यावरून समजते.  प्रत्येक दिवसानुसार  Valentine week day dress code 2023 कोण कोण ते आहेत ते पाहूया.

१) लाल रंग -  Valentine week day dress code 2023
  नुसार लाल रंगाचा अर्थ तुम्ही पहिलेच प्रेमात आहे.
२) गुलाबी रंग - ड्रेस कोड 2023 नुसार गुलाबी रंग नुसार प्रिय व्यक्तीस  होकार दिला असेल .
३) हिरवा रंग - मी फक्त तुझीच वाट पाहत आहे.
४) निळा रंग - प्रेम स्वीकारायचे बाकी आहे.
५) काळा रंग - Valentine week day dress code 2023
  नुसार  प्रेमाचा स्वीकार केला नाही.
६) पांढरा रंग -  व्हॅलेंटाईन ड्रेस कोड 2023 नुसार पांढरा रंग मी पहिलेच नात्यामध्ये आहे.असे सूचित करतो.
७) जांभळा रंग - ड्रेस कोड 2023 नुसार जांभळा  रंग स्वारस्य नाही. असे सूचित करते.
८) पिवळा रंगतपकिरी रंग -व्हॅलेंटाईन ड्रेस कोड 2023 नुसार पांढरा व तपकिरी रंग नकार दर्शवण्यासाठी असतो.

FAQ 
प्रश्न १.- 2023 मध्ये व्हॅलेंटाईन डे कधी आहे व वार कोणता आहे .
उत्तर - 2023 मध्ये व्हॅलेंटाईन डे १४ फेब्रुवारी ला  आहे व वार मंगळवारी आहे.
प्रश्न.२. 2023 मध्ये व्हॅलेंटाईन डे साठी कोणते ड्रेस कोड आहेत .
उत्तर - 2023 मध्ये व्हॅलेंटाईन डे साठी लाल रंग ,गुलाबी रंग ,हिरवा रंग , निळा रंग, काळा रंग , पांढरा रंग  ,जांभळा रंग ,पिवळा रंग व तपकिरी रंग  .हे dress codBe आहेत.




 
 





  
  



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad