Type Here to Get Search Results !

मकर संक्रांत संपूर्ण मराठी माहिती | makar sankrant sampurn marathi mahiti

 मकर संक्रांत संपूर्ण मराठी माहिती makar sankrant sampurn marathi mahiti 

नमस्कार मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा . येणार सण हा गोडवा घेऊन येतो असाच गोडवा तुमच्या आमच्या जीवनात असाच राहावा ही ईश्वर चरणी प्रार्थना .  आजच्या लेखामध्ये आपण मकर संक्रांतीची संपूर्ण मराठी माहिती पाहणार आहोत. 

मकर संक्रांत संपूर्ण मराठी माहिती


मकर संक्रांत (toc)
जानेवारी महिन्याच्या १४ तारखेला सूर्य धन राशीतून मकर राशीत जातो. संक्रांत ठराविक तिथीलाच येत नाही; पण शुद्ध त्रयोदशीला व चतुर्दशीला बहुधा ती येते. एक पुण्य पर्व व सण या दोन्ही दृष्टींनी या दिवसाला आगळे महत्त्व आहे. या दिवशी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणे, याला संक्रमण किंवा संक्रांत म्हणतात. बारा वेळा संक्रमण होते, पण मकर व कर्क या दोन राशीतून सूर्य गेला म्हणजे बरेच स्थित्यंतर होते . म्हणजे या संक्रमणाला अधिक महत्त्व असते. 

मकर संक्रांत संपूर्ण मराठी माहिती

या दिवशी सूर्याची गती उत्तरेकडे वळते. त्या वेळेपासून दिवस थोडा  थोडा वाढतो, व रात्र लहान होते. त्याच्या उलट कर्क संक्रांतीपासून सूर्याची गती दक्षिणेकडे वळते. या दिवसापासून दिवस लहान व रात्र मोठी होत जाते. 

दक्षिणायन व उत्तरायण म्हणजे काय ? 

कर्कसंक्रांतीपासून मकर संक्रांतीपर्यंतच्या काळास 'दक्षिणायन' म्हणतात. 
मकर संक्रांतीपासून कर्कसंक्रांतीपर्यंतच्या काळास उत्तरायण' म्हणतात. उत्तरायणाला ' देवयान ' असेही म्हणतात. 

makar sankrant sampurn marathi mahiti पौराणिक कथा 

उत्तरायण हा देवांचा एक दिवसांचा काल असतो, आणि दक्षिणायन ही त्यांची एक रात्र समजली जाते. म्हणजेच सहा महिन्यांचा काल हा देवांच्या दृष्टीने एक दिवसाचा आहे, आणि तसाच तितकाच काल म्हणजे एका रात्रीचा होतो, ज्ञानी, तपस्वी, योगी, मुमुक्षू लोक उत्तरायणास ज्ञानमार्ग समजतात. याच काळात आपल्याला मृत्यू यावा, अशी त्यांची इच्छा असते. याबाबतीत महाभारतात भीष्माचार्यांचे ठळक उदाहरण आहे. ते युद्धात पराजित होऊन  पडले होते तरी, केवळ आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या सामर्थ्यावर उत्तरायण येण्याची प्रतीक्षा करीत होते, आणि उत्तरायणातच त्यांनी आपले प्राण सोडले.
 मकर-संक्रांतीची पुराणात अशी कथा सांगितली आहे की, संकरासुर नावाचा राक्षस जनतेचा फार छळ करीत असे. यामुळे लोक हैराण झाले होते. या राक्षसाचा निःपात करण्यासाठी परमेश्वराने संक्रांती  देवीचा अवतार धारण करून संकरासुराचा वध केला. 

किंक्रांत म्हणजे काय - 

लोकांचे संकट निवारण होऊन सर्व जनता शांत जीवन जगू लागली. संकरासुराचे अरिष्ट नष्ट झाल्यामुळे लोक मनस्वी सुखावले होते. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला 'किंक्रांत ' म्हणतात. त्या दिवशी देवीने किंकरासुराचा वध केला. हा दिवस पंचांगात 'करि-दिन' म्हणून दाखविलेला असतो.

मकर संक्रांती आकृती व पंचांग 

संक्रांतीला देवता मानून तिचे चित्र प्रत्येक पंचांगात दिलेले असते. साठ योजने पसरलेली, लांब ओठ, दीर्घ नासिका, एक तोंड व नऊ हात असलेली संक्रांती ही पुरुषाच्या आकृतीसारखी आहे. प्रत्येक वर्षी तिचे वाहन, आयुध, तिलक, ज्योती, वय, अवस्था, भूषण, भोजनपात्र व नाव वेगवेगळे असते. ती कोणत्या तरी दिशेने येते, कोणत्या तरी दिशेने पाहते. संक्रांती ज्या गोष्टींचा स्वीकार करते, त्या वस्तूंचा विनाश तरी होतो किंवा त्या दुर्मिळ, महाग तरी होतात. ती ज्या दिशेकडून येते, त्या दिशेला समृद्धी होते, व ज्या दिशेला जाते व पाहते त्या दिशेला उत्पात करते, अशी एक समजूत आहे.

मकर संक्रांत 'माधी' अथवा 'लोहडी पोंगल सण Makar Sankrant 'Madhi' or 'Lohdi Pongal Festival

पंजाब, हिमाचल प्रदेशात 'माधी' अथवा 'लोहडी ' म्हणतात. गुजराथमध्ये उत्तरायण म्हणतात. दक्षिण भारतात विशेषत: तामिळनाडू प्रांतात हा सण अपूर्व उत्साहात साजरा करतात. या सणाला तिकडे पोंगल' म्हणतात. संक्रांतीला तळलेले पदार्थ करायचे नाही, असा एक संकेत आहे. म्हणून कोकणात त्या दिवशी इडली व गूळ घालून नारळाचा रस हे पक्वान्न करतात, देशावर गुळाच्या पोळ्या करण्याची पद्धत आहे. दक्षिणेत या दिवशी खीर करतात. उत्तरेत खिचडी बनवितात. बंगालमध्ये काकवीत तीळ घालून तिळुवा नावाचा पदार्थ करतात.

मकरसंक्रांतीच्या दिवशी गंगास्नानासाठी प्रयाग येथे मोठी यात्रा भरते. दक्षिणेतही तिन्नवेली जिल्हयातून वाहणाऱ्या ताम्रपर्णी नदीत स्नान करण्यासाठी व वेदारण्यम येथे समुद्रस्नानासाठी मोठी यात्रा भरते.

तिळाचे तेल गुणकारी औषध व फायदे Medicinal properties and benefits of sesame oil

तिळाचे स्नान, तिळाचे दान, तिळाचे सेवन व तिळगूळ हे या सणाचे वैशिष्टच आहे. तीळ आणि तिळाचे तेल अतिशय औषधी आहे. तिळाच्या सेवनाने मेहनतीचे, कष्टाचे, श्रमाचे काम करण्यास ताकद ब बळ वाढते. शरीराच्या कोणत्याही भागास सूज येऊन बेदना होत असल्यास, तीळ वाटून ते गरम फरून शेकावे, म्हणजे सूज ओसरते. लघवी जर जास्त वेळा होत असेल, तर ओवा व तीळ सकाळ- संध्याकाळ खावे. लघवी साफ होण्यासाठी तीळ वाटून गरम करून ओटीपोटावर बांधावे. रात्री झोपताना तीळ खाऊन त्यावर गरम पाणी प्यावे. म्हणजे लकाळी शौचास साफ होते. मूळव्याधीवर तीळ हे अत्यंत गुणकारी औषध आहे. तीळ गरम पाण्यात वाटून ताजे लोणी घालून रोज सकाळी खाल्ल्यास रक्ती मूळव्याधी बरी होते. भाजलेल्या जागी तिळाचे तेल लावल्यास दाह कमी होतो. तिळाचे तेल केसास लावले असता केस काळे राहून वाढ होते. तिळाचे तेल अग्नीवर्धक असल्यामुळे भूक चांगली लागते. अल्सर असणान्या लोकांनी तिळाचे तेल पोटात घेतल्यास पोटातील व्रण बरा होतो. तिळाचे इतके गुणधर्म असल्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तिळगूळ देण्याची व सेवन करण्याची प्रथा पडली आहे.अशा या कणभर असलेल्या तिळाचे माहात्म्य संतशिरोमणी तुकाराम महाराजांनी आपल्या खालील अभंगात व्यक्त केले आहे.

तिळा इतुके हे बिंदुले
 तेणे त्रिभुवन कोंदटले । 
हरिहरांच्या मूर्ती बिंदुल्या येती जाती।
 तुका म्हणे हे बिंदु तेणे त्रिभुवन कोंदटले ।

FAQ 

१) पंजाब, हिमाचल प्रदेशात , गुजरात व तामिळनाडू मध्ये मकर संक्रांत या सणाला काय म्हणतात .
उत्तर- पंजाब, हिमाचल प्रदेशात 'माधी' अथवा 'लोहडी ' म्हणतात. गुजराथमध्ये उत्तरायण म्हणतात. दक्षिण भारतात विशेषत: तामिळनाडू प्रांतात हा सण अपूर्व उत्साहात साजरा करतात. या सणाला तिकडे पोंगल' म्हणतात. 
२) दक्षिणायन  म्हणजे काय ? 
उत्तर -- कर्कसंक्रांतीपासून मकर संक्रांतीपर्यंतच्या काळास 'दक्षिणायन' म्हणतात. 
३) उत्तरायण म्हणजे काय ? 
उत्तर - मकर संक्रांतीपासून कर्कसंक्रांतीपर्यंतच्या काळास उत्तरायण' म्हणतात. उत्तरायणाला ' देवयान ' असेही म्हणतात. 
४) किंक्रांत म्हणजे काय ?
उत्तर - लोकांचे संकट निवारण होऊन सर्व जनता शांत जीवन जगू लागली. संकरासुराचे अरिष्ट नष्ट झाल्यामुळे लोक मनस्वी सुखावले होते. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला 'किंक्रांत ' म्हणतात. 










Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad