Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र आर.टी. ई 2023 24 ऑनलाइन अर्ज कसा भरावा संपूर्ण मराठी हिंदी इंग्लिश माहिती | Maharashtra RTE 2023 24 How to Fill Online Application Complete Marathi Hindi English Information

महाराष्ट्र आर .टी. ई 2023 24 ऑनलाइन अर्ज कसा भरावा संपूर्ण मराठी हिंदी इंग्लिश माहिती | Maharashtra RTE 2023 24 How to Fill Online Application Complete Marathi Hindi English Information

 

आरटीईअंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खाजगी व्यवस्थापणाच्या शाळेत उत्तम दर्जाचे मोफत शिक्षणाची संधी शासनाने उपलब्ध केली आहे .शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी आरटीई  (RTE Admission2023 24) 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक (Time Table) प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार  फेब्रुवारी 2023 पासून पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कळविण्यात आले होते. 

काही अपरिहार्य कारणास्तव आरटीई RTE Admission 2023 24   पोर्टलवर सदरचे अर्ज येत्या दोन दिवसा पासून भरता येतील.
आर .टी. ई 2023 24 माहिती



आर. टी. ई 2023 24(toc)

शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया  पासून ऑनलाईन सुरू होत आहे.

RTE आर .टी .ई 2023 24 प्रवेश साठी अर्ज कसा करावा How to Apply for RTE 2023 24 Admission.


मागील महिन्यापासून राज्यातील सर्व पात्र शाळांची RTE आर .टी .ई 2023 24 साठी माहिती मागवली होती. ही माहिती  8828 शाळांनी भरली आहे त्या मध्ये एकूण 101998 RTE 2023 23 च्या जागा उपलब्ध आहेत.

१.प्रवेश अर्ज भरण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्यावी

https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex

२. सर्व प्रथम वरील लिंक  क्लिक करा.त्या नंतर तुम्हाला खालील प्रमाणे मोबाईल किंवा लॅपटॉप ची स्क्रिन दिसेल.
या मध्ये तुम्ही ऑनलाईन अँप्लिकेशन वर क्लिक  करायचे आहे. त्या नंतर new ragister वर click करा.
Log इन करताना ऑनलाइन

महाराष्ट्र RTE Admission 2023 24 आर .टी.ईऑनलाइन अर्ज कसा भरावा संपूर्ण मराठी हिंदी इंग्लिश माहिती

  ऑनलाईन २५%  प्रवेशासाठी कोणती बालके पात्र आहेत  ?

  • दुर्बल घटकांतर्गत ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. एक लाखापर्यंत आहे.
  •   पालकांची बालके, वंचित गटांतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती
  •  सर्व जाती धर्मातील विकलांग बालके.

वंचित गट कोणता 

 वंचित गटामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांग बालकांव्यतिरिक्त वि.जा.(अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागासवर्ग (SBC), एच. आय. व्ही. बाधित / एच. आय. व्ही. प्रभावित बालके यांचा समावेश आहे.

 दुर्बल गटा कोणता 

दुर्बल गटामध्ये ज्या बालकांच्या पालकांचे / ज्या बालकांचे पालन पोषण करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न १ लाखाच्या आत आहे अशा बालकांचा सामावेश आहे.

SEBC प्रवर्ग - 

SEBC प्रवर्गाच्या बालकांना आर्थिक दुर्बल (१ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ) गटामधून प्रवेश अर्ज भरता येईल.


 RTE Admission 2023 24  प्रवेश अर्ज भरताना कोणती काळजी घ्यावी.

  • शैक्षणिक वर्ष 2023 -24 साठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया दिनांक १/०३/२०२३पासून ऑनलाईन सुरू होत आहे. 
  • शैक्षणिक वर्षासाठी ठरवून दिलेल्या कालावधी मध्येच अर्ज करता येईल.
  • पालकांना अर्ज एकदा भरता येईल.

RTE Admission 2023 24 ऑनलाईन फॉर्म कसा भरावा माहिती ⬇️

Rte 2023 24 Online अर्ज भरताना तो कसा भरावा याची संपूर्ण माहिती खालील pdf मध्ये दिली आहे.

कोणत्या शाळेमध्ये  प्रवेश घेता येतो Schoo Admission 2023 24 

  •  सर्व माध्यमाच्या व सर्व बोर्डाच्या (राज्यमंडळ, सी.बी.एस.ई.,आय.सी.एस.ई. व आय.बी.सह) विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक सर्व शाळा जेथे वर्ग १ ली किंवा पूर्व प्राथमिक स्तरावरील आहे. 
  • (मदरसा, मक्तब, धार्मिक पाठशाळा, अल्पसंख्यांक शाळा वगळून)

RTE Admission 2023 24 Document आर .टी. ई 2023 24 साठी आवश्यक कागदपत्रे

प्रवेश अर्ज भरताना 
खालील कागदपत्रे अपलोड करावीत.
  • रहिवासी दाखला पुरावा अर्ज भरताना रहिवाशी दाखल्यावर जो पत्ता आहे तोच लिहावा.
  • जन्माचा दाखला.
  • जात प्रमाणपत्र (बालक वंचित घटकातील असल्यास).
  • उत्पन्नाचा दाखला.

प्रवेश अर्ज शुल्क RTE Admission 2023 24 RTE 2023 24 How to Fill Online Application 

शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी आरटीई RTE Admission 2022 23  25 टक्के प्रवेश प्रक्रियेच्या अर्ज मोफत उपलब्ध आहेत प्रवेश अर्ज संकेत स्थळावर जाऊन भरायचे आहेत.

शाळा व माध्यम निवड School And Medium

  •  शाळा निवडताना पालक  १ (एक) किलो मीटर , ३(तीन) किलो मीटर किंवा त्यापेक्षा अधिक किलोमीटर अंतरावरील शाळा निवडू शकतात .
  • पालकांना माध्यम निवडण्याचे स्वतंत्र असेल.
  • शाळा परिसरातील एक किलोमीटर अंतरावरील अर्जदारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल .
  • तीन किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असल्यास प्रवासभाडे पालकांना द्यावे लागेल

आर .टी . ई 2023 24 दिव्यांग बालकाच्या प्रवेशाचे निकष व आवश्यक कागदपत्रे

 प्रवेश निकष 

जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक यांचे   दिव्यांग प्रमाणपत्र  ४०% पेक्षा अधिक असल्याबाबतचे 

आवश्यक कागदपत्रे

 सर्व जाती धर्मातील दिव्यांग बालके प्रवेशास पात्र त्यांनी खालील कागदपत्रे अपलोड करावीत.
  •  दिव्यांग प्रमाणपत्र.
  •  जन्माचादाखला.
  • रहिवासीपुरावा (आधारकार्ड/पासपोर्ट/मतदार ओळखपत्र/वीजबिल टेलिफोनबिल/पाणी पट्टी/घर पट्टी/वाहन चालविण्याचा परवाना भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनाम्याची प्रत / यापैकी कोणतेही एक )

प्रवेश अर्जासाठी संकेतस्थळ RTE Admission 2022 23   Website 

प्रवेश अर्ज भरण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्यावी

https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex

घटस्फोटीत महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे


1) न्यायालयाचा निर्णय. 
२) घटस्फोटित महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. ३) बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या
वडिलांचे जातीचे प्रमाण पत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.

 न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागद पत्रे .

1 ) घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा.
 २) घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. 
३) बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाण पत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.

 विधवा महिलेच्या बालकांसाठी आवश्यक कागद पत्रे  

 1 ) पतीचे मृत्यूपत्र. 
२) विधवा महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. 
3) बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाण पत्र .
४) बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.

 अनाथ बालकांसाठी आवश्यक कागद पत्रे 

1) अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत.

२) जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्याचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील.

३) पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना single parent पर्याय पर्याय निवडला असेल तर 

४) संबंधित बालकाचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागद पत्रे ग्राहय धरण्यात यावीत.

खुला प्रवर्ग, अल्पसंख्यांक, यांना प्रवेशासाठी कागदपत्रे

  •  जन्माचादाखला.
  • रहिवासी, पुरावा, (आधारकार्ड/पासपोर्ट / मतदार ओळखपत्र, वीज बिल / टेलिफोन बिल/पाणी पट्टी / घर पट्टी/वाहन चालविण्याचा परवाना / रेशनिंग कार्ड,/ गॅस कार्ड/ बँक पासबुक/ भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनाम्याची प्रत यापैकी कोणतेही एक)
  • कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. एक लाखापेक्षा कमी असल्याचा उत्पन्नाचा दाखला.

उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला कोणत्या ठिकाणचा पाहिजे ?

  •  उत्पन्नाचा आणि जातीचा दाखला परराज्यातील ग्राहय धरण्यात येणार नाही. 
  • ज्या ठिकाणी वास्तव्य आहे त्याच ठिकाणचा असावा.

 जन्माचा दाखला / प्रमाणपत्र कोणते पाहिजे?

  •  आर.टी.ई. अधिनियम २००९ मधील भाग ४ मधील नियम ९ नुसार कलम १४ च्या प्रयोजनार्थ वयाचा पुरावा म्हणून स्वीकार करण्याजोगे दस्तऐवज.
  •  जन्म व मृत्यू अधिनियम १९६९ (१९६९ चा १८) अन्वये जन्माचा दाखला .
  • उपलब्ध नसेल तेथे पुढील दस्तऐवजांपैकी कोणताही एक दस्तऐवज हा शाळांमध्ये प्रवेश घेण्याच्या प्रयोजनासाठी बालकाच्या वयाचा पुरावा असल्याचे मानण्यात येईल.
  •  अ) बालकाच्या जन्म ठिकाणच्या संबंधात किंवा सहाय्यकारी परिचारिका व प्रसविका यांनी केलेली नोंद किंवा ठेवलेला अभिलेख.
  • आ) अंगणवाडी अभिलेख
  • ई) हा अभिलेख उपलब्ध नसेल तर, वंचितगटातील तसेच दुर्बल घटकांतीबालकाच्या बाबतीत जन्मदिनांक नमूद करणारे बालकाच्या एकतर मातेचे किंवा पित्याचे प्रतिज्ञापत्र, गावच्या सरपंचाने किंवा स्थानिक शाळेच्या मुख्याध्यापकाने किंवा शहरी वा निमशहरी क्षेत्राच्या बाबतीत शासनाने या संबधात अधिसूचित केलेल्या अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले आई-वडिलांचे किंवा पालकांचे बालकाच्या वयाचे प्रतिज्ञापत्र.

गुगलमॅपवर अचूक  पत्ता / Google Address नोंद

पालक गुगलमॅपवर अचूक  पत्ता / Address नोंद करण्यासाठी इतर साधनांची मदत घेऊ शकता.
घराचे व शाळांचे अचूक Latitude व
Longitudeमोजण्यासाठी गुगलवर प्लेस्टोअरवर पुढील अॅप्स (Apps) आहेत. 
१) my current location

२) Sea level

३) Address 2 lat.lon.

४) Latitude and longitude

५) Latitude coordinates ६) Gpslat long viewer

७) Latitude tracker

८) Latitude and longitude match

९) Gps coordinates

F.A.Q. 

आर.टी.ई. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२३-२०२४
 F.A.Q. (वारंवार विचारण्यात येणारे/उदभवणारे प्रश्न)

१) शाळा निवडताना कोणती काळजी घ्यावी?

उत्तर शाळा निवडताना आपल्या रहिवासाचे ठिकाण आणि शाळा •यातील हवाई अंतर (Aerial Distance) प्रवेशासाठी ग्राहय धरण्यात येणार असल्याने रस्त्याने शाळा व घर यातील प्रत्यक्ष अंतरात फरक पडू शकतो त्यामुळे शाळा निवडताना दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे.

२) प्रवेशाची कार्यपद्धती कशी असेल? 
उत्तर- शाळेच्या प्रवेशक्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास
सोडत / लॉटरी काढून प्रवेश निश्चित केले जातील . शाळेच्या प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाल्यास प्राप्त झालेल्या अर्जांपैकी सर्व पात्र अर्जदारांचा प्रवेशासाठी विचार केला जाईल.

३) ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाबाबतची पुढील कार्यवाही पालकांना कशी कळणार?

उत्तर- याबाबत पालकांना अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर एस.एम.एस. ( msg) द्वारे सूचित केले जाईल. त्यामुळे अर्जात दिलेला मोबाईल क्रमांक अर्जदारांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यत सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.
 परंतु पालकांनी फक्त एस. एम. एस ( msg ) वर अवलंबून राहू नये आर.टी.ई. पोर्टल वर आर.टी.ई. पोर्टल वर Application wise details या tab वर क्लिक करून आपला अर्ज क्रमांक लिहून अर्जाची स्थिती पहावी. 

४) प्रवेशासाठी निवड झाल्यानंतर प्रवेश कसा घ्यावा?

उत्तर- प्रवेशासाठी निवड झाली आहे असा msg प्राप्त झाल्यानंतर rte पोर्टल वरील Application wise details या tab वर क्लिक करून आपला अर्ज क्रमांक लिहून अर्जाची स्थिती पहावी लॉटरी लागली असेल तर allotment letter ची प्रिंट काढावी आणि हमीपत्र या या tab वर क्लिक करून त्याची प्रिंट काढावी.Allotment letter वर आपल्या विभागात पडताळणी समितीचा पत्ता (address) दिलेला असेल त्या ठिकाणी allotment letter, हमी पत्राची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन जावे आणि आपला प्रवेश निश्चित झाल्याची प्रिंट पडताळणी सामितीकडून घ्यावी
निवड झालेल्या बालकाने विहित मुदतीत पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश निश्चित न केल्यास ती जागा रिक्त राहील आणि त्या जागेवर लॉटरी द्वारा निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यास अनुक्रमे संधी मिळेल.

५) आर.टी.ई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रीये अंतर्गत प्रवेश मिळाला अथवा नाही हे कसे समजेल ?

उत्तर :- प्रवेशासाठी निवड झाली आहे असा msg प्राप्त झाल्यानंतर पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे सबमिट केल्यावर त्यांना पडताळणी समितीकडून रसिट (Receipt) पावती दिली जाईल. 
प्रवेश मिळालाअथवा नाही ते समजेल.

पालकांचे हमी पत्र RTE 2023 24 How to Fill Online Application Complete Marathi Hindi English Information

ऑनलाईन प्रवेश नोंदणी कशी  करावी याचा व्हिडिओ आर.टी. ई 2023 24 ऑनलाइन अर्ज कसा भरावा संपूर्ण मराठी हिंदी इंग्लिश माहिती





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad