आर .टी. ई 2023 24 मोफत प्रवेश उद्या पासून सुरू होणार |RT E 2023 24 free admission starts from tomorrow
सर्व पालकांसाठी आनंदाची बातमी सन 202324 आर टी ई मोफत प्रवेश उद्या दिनांक १/३/२०२३ दुपारी 3 नंतर सुरू होणार आहे.
दरवर्षी प्रमाणे सन २०२३-२४ या वर्षाची बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसाहीत शाळा, खाजगी विनाअनुदानित व खाजगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत आहे. शासनाने संदर्भ क्र. ३. ७ व ८ मध्ये दिलेल्या सुचना विचारात घेऊन सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेबाबत संचालनालयाचे संदर्भ क्र.९ च्या पत्रान्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पुर्ण झालेली आहे. सबब, बालकाच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविणेची प्रक्रिया दि. ०१/०३/२०२३ दुपारी ०३:०० ते दि. १७/०३/२०२३ रात्री १२:०० वाजेपर्यंत सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
RTE प्रवेश सुरू |
RTE 2023 24 ऑनलाईन प्रवेश अर्ज स्वीकारणे
बालकाच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविणेची प्रक्रिया
दि. ०१/०३/२०२३ दुपारी ०३:०० ते अंतिम दि. १७/०३/२०२३ रात्री १२:०० वाजेपर्यंत सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सुचना - RTE प्रवेश 2023 24
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसाहीत शाळा, खाजगी विनाअनुदानीत व खाजगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये इ. १ ली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता पालकांनी https://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया विहित मुदतीमध्ये पुर्ण करावी.
वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो.RTE 2023 24
वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो.
१.अनुसूचित जाती
२. अनुसूचित जमाती
३. विमुक्त जाती (अ)
४.भटक्या जमाती (ब)
५.भटक्या जमाती (क)
६.भटक्या जमाती (ड)
७.इतर मागास वर्ग (ओ.बी.सी)
८. विशेष मागास वर्ग (एस.बी.सी)
९. दिव्यांग बालके
१०.एच. आय. व्ही. बाधित किंवा एच. आय. व्ही. प्रभावित बालके
११.अनाथ बालके
१२.कोव्हीड प्रभावित बालक (ज्याचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च, २०२२ या कालावधीत कोव्हीड प्रादुर्भावामुळे झाले)
वंचित गटातील बालकांच्या प्रवेशाकरीता वार्षिक कमाल उत्पन्नाची मर्यादा लागू नाही.
III. आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या बालकांचाआर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो.
IV. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता विचारपुर्वक १० शाळांची निवड करण्यात यावी.
V. पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावयाचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेवून पालकांनी बलूनद्वारे निवास स्थानाचे
ठिकाण निश्चित करण्याकरीता तो बलून जास्तीत जास्त ५ वेळाच निश्चित करता येईल यांची नोंद
घ्यावी. त्यामुळे पालकांनी निवास स्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे.
VI. प्रवेश प्रक्रियेबाबत विहित मुदतीमध्ये परिपुर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यावी. अर्ज सादर करण्याच्या अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट अथवा इतर तांत्रिक अडचणींमुळे परिपुर्ण अर्ज सादर करण्यामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सबब, शक्य तितक्या लवकर परिपुर्ण अर्ज सादर केला जाईल याची दक्षता घेण्यात यावी.
VII.प्रवेश प्रक्रियेबाबत आपणास काही समस्या असल्यास आरटीई पोर्टल वरती मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे. त्यांच्याशी संपर्क करुन समस्याचे निराकरण करण्यात यावे.
पालकांनी ऑनलाईनन अर्ज करतांना अचुक व खरी माहिती भरावी. (उदा. घरचा पत्ता, जन्म ,दिनांक, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, इतर).
ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही.
यापूर्वी २५ टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकाचा चुकीची माहिती भरुन पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच